मोबाईल खराब झालाय ? सर्विस सेंटरला ( Service Center ) देताय ? तर सावधान त्या आधी हे 5 काम करून घ्या, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान.

तुमचा फोन खराब झालाय, सर्विस सेंटर ( Service Center ) मध्ये फोन देताय, तर त्याआधी तुम्हाला या ५  गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, नाहीतर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

अन्न वस्त्र निवारानंतर स्मार्टफोन सुद्धा आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा घटक बनला आहे. स्मार्ट फोन शिवाय काही तास सुद्धा घालवणे आपल्याला अवघड वाटते. तसेच स्मार्टफोन आपल्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा घटक बनलेला आहे. आजकाल आपले अर्ध्यापेक्षा जास्त काम हे मोबाईल द्वारे घरबसल्या बसल्या पूर्ण होऊन जातात. केव्हातरी आपल्यावर अशी परिस्थिती येते की, आपला स्मार्टफोन खराब होतो. अशा परिस्थितीत आपल्याला फोन रिपेअर करायला सर्विस सेंटरमध्ये जावे लागते, त्यामध्ये बहुतास वेळा आपल्याला आपला फोन काही तासांसाठी अथवा काही दिवसासाठी सर्विस सेंटर मध्ये फोन रिपेअरिंगसाठी  जमा करावा लागतो, परंतु सर्विस सेंटरमध्ये फोन देण्याच्या आधी आपल्याला काही विशेष गोष्टींकडे  लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्ही  लक्ष देण्यास आळसपणा केला तर यात तुम्हाला  खूप मोठे नुकसान होऊ शकते.

आपण आपल्या स्मार्ट फोन मध्ये खूप महत्वाच्या गोष्ठी सेव करून ठेवतो. अश्या वेळी  आपली प्रायव्हसी लीक होण्याचाही धोका असतो. जर फोन सर्विस सेंटरला घेऊन जायचे आहे तर आपल्याला खूप काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर तुमची  एक छोटीशी चुक, तुमची परेशानी वाढवू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

1.   Authorized Service Center :-

काही वेळा स्मार्टफोन दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही जवळच्या सर्विस सेंटर मध्ये फोन देतात, परंतु तुमच्या थोड्याश्या आळसपणामुळे  तुमच्या प्रायव्हसीचा धोका निर्माण होऊ शकतो आणि काही वेळा तर तुम्ही दिलेला फोन दुरुस्त पण होत नाही,  तुम्हाला तुमचा  स्मार्टफोनला जेव्हा पण दुरुस्ती करायचं असेल तर तुम्ही जिथे फोन दिलाय किंवा देताय,  ते सर्विस सेंटर Authorized आहे कि नाही या विशेष गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. या मुळे तुमच्या स्मार्ट फोन मधील सेव्ह असलेल्या डेटाचा  गैरवापर होण्याची संभावना खूप कमी होऊन जाते.

2.   बँकिंग डिटेल्स डिलीट करणे :-

बदलत्या काळानुसार आता जवळ जवळ सगळेच मोबाईल द्वारे बँकिंग सेवेचा फायदा उचलत आहे. जसे कि यूपीआय वरील चालणाऱ्या ॲप फोन पे, गुगल पे, पेटीएम या सारख्या इत्यादी ॲप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असतात. बँकेमधील काही कागदपत्रे जसे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड डिटेल्स, बँक-आयडी, एटीएम किंवा इंटरनेट ट्रांजेक्शन चे पासवर्ड या पैकी कोणती ना कोणती  डिटेल्स आपल्या फोनमध्ये सेव असतेच, अशावेळी सर्विस सेंटर मध्ये फोन द्यायच्या आधी आपल्या फोनमध्ये सर्व बँकचे डिटेल्स डिलीट करणे आवश्यक आहे.

3.   सोशल मीडिया अकाउंट लॉग आउट  करणे :-

जर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे सोशल मीडिया ॲप वापरत असाल, आणि तुमचा फोन पूर्णपने बंद नसेल, आणि तुमचे सोशल मिडिया अकाऊंट ओपन राहिले तर त्याचा मिस युज होऊ शकतो. त्यामुळे मोबाईला सर्विस सेंटरला देण्याअगोदर सर्व ॲप लॉग आऊट करून घ्या किंवा एकदा सर्व ॲप लॉग आऊट आहे किं नाही पडताळून बघा.

4.   डाटा बॅकअप :- 

काही तांत्रिक प्रॉब्लेमुळे तुम्ही तुमचा फोन सर्विस सेंटर मध्ये रिपेअर करण्यासाठी घेऊन जात असाल आणि तुमचा फोन पूर्ण पणे बंद  झाला नसेल, तर अशा वेळेस मोबाईल सर्विस सेंटर मध्ये देण्याअगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलचा बॅकअप काढणे विसरू नका.

जर तुमच्या फोनमध्ये फोटो असेल तर बॅकअप काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन क्लाऊड सर्विस किंवा गुगल फोटोज चा वापर करू शकतात किंवा फोटो व्हिडिओ किंवा अन्य कोणत्याही फाइल्स तुम्ही  पेनड्राईव मध्ये किंवा हार्ड डिस्क मध्ये कॉपी करू करू शकतात. सोप्या  भाषेत म्हटलं तर आपल्याजवळ जे स्टोरेज ऑप्शन असेल, त्यामध्ये फोनचा बॅकअप कॉपी करून घ्या. तुम्ही तुमच्या मोबाईला कॉम्पुटर किंवा लैपटॅापला कनेक्ट करून सोप्या पद्धतीने डेटा कॉपी करू शकतात.

5.   मेमरीकार्ड आणि सिमकार्ड काढणे गरजेचे आहे :-

शक्यतो खूप लोक घाई गडबड मध्ये मोबाईल मधील सिम कार्ड आणि मोबाईल मध्ये लागलेले मेमरी कार्ड काढणे विसरून जातात. मेमरी कार्ड आणि सिम कार्ड हे दोघे कार्ड हे खूप गरजेचे आहे, जर हे कार्ड चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडले तर याचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळे कितीही गडबड असली, तरी सर्विस सेंटर मध्ये फोन देण्याच्या वेळी दोन हे दोघी कार्ड काढणे विसरू नका.

त्याशिवाय, आपल्या मोबाईल मध्ये अनेक महत्त्वाचे मेसेज असतात जसे की बँकेचे मेसेज त्यात पैशांच्या व्यवहारांची माहिती असते असे मेसेज डिलीट करायला विसरू नका. तसेच जर तुमच्या मोबाईल मध्ये काही पर्सनल फोटो असतील जे कि तुम्हाला कोनालाच दाखवायचे नसेल. असे फोटो डिलीट करणे किंवा दुसऱ्या मोबाईल डिवाईस मध्ये कॉपी करायला विसरू नका.

लक्षात असू ध्या :-

१. मोबाईल शॉप हे Authorize आहे कि नाही बघावे.

२. मोबाईल मधील सेव्ह असलेल्या सर्व बँकिंग डिटेल डिलीट करणे.

३. सोशल मिडिया अकाउंट लॉग आउट करून घ्या.

४. फोन चालू असेल तर डाटा बॅकअप करून घेणे.

५. फोन मध्ये लागले मेमरी कार्ड आणि सिमकार्ड रीपेंअरींगला देण्याच्या अगोदर काढून घ्या.

काहीवेळा फोन मध्ये खूप साऱ्या समस्या असतात परंतु आपण सर्विस सेंटरमध्ये गेल्यावर काही समस्या विसरून जातो. या करिता लिस्ट बनवून सर्विस सेंटरमध्ये जावे जेणेकरून कोणती जरुरी गोष्ट सुटून जाणार नाही.

लक्षात असू द्या, मोबाईल रिपेअरींग साठी देत असाल तर एकदा वरील ५ गोष्ठी लक्षात असू ध्या.

Leave a Comment