प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 (Pradhan Mantri Matru Vandana Yojana In Marathi )

नमस्कार मिंत्रानो, आज आपण प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana In Marathi ) काय आहे ? योजना कोणासाठी आहे ? अर्ज कुठे जमा करायचा ? योजने अंतर्गत लाभ किती मिळतो ? तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात ?  या सर्व प्रश्नाच्या उत्तराबरोबर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची संपूर्ण माहिती आज आपण या लेख मध्ये बघणार आहोत.

गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हि केंद्र व राज्य सरकार यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे. या योजनेत केंद्र सरकारचा ६०% व राज्य सरकारचा ४०% सहभाग आहे. या योजनेसाठी शासनाने Escrow Account उघडले असून, या अकाऊंट मध्ये या योजनेसाठी लागणार निधी शासनातर्फे जमा करण्यात येत आहे. या खात्यातील निधी ( DBT – Through PFMS ) द्वारे लाभार्थीच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

Table of Contents

शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना का आमलात आणली ?

देशातीलअनेक गर्भवती महिला गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत शाररीक क्षमता नसतांना सुद्धा उदरनिर्वाहासाठी मोल मजुरी करतात. या मुळे होणाऱ्या बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. तसेच यामुळे बाल मृत्यू पण होऊ शकतो. जगभरामधून भारत देशाचा  बालमृत्यू दरामध्ये प्रथम नंबर लागतो. यु एन आय जी एम ई ( UNIGME ) नुसार भारतात दर दोन मिनिटांनी सरसरी ३ अर्भकाचा मृत्यू होतो होतो. हि बाबा सरकारने लक्षात घेऊन बालमृत्यू दारात झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी शासनाने दि. १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना आमलात आणली.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने मधील बदल :- Pradhan Mantri Matru Vandana Yojana In Marathi

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हि २०१७ पासून महाराष्ट्र राज्यात राबण्यात येत होती. परंतु महिला बाल विकास विभागाकडून २०२२ मध्ये एक परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकात “मिशन शक्ती” च्या अंतर्गत मार्गदर्शक सूचना शासनास प्राप्त झाल्या. “मिशन शक्ती” च्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासनाने सुधारित बदल योजने मध्ये करून  “प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.०“ राज्यात लागू केली.  

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PMMVY 1.0  ( 2017 ) आणि नवीन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 PMMVY 2.0 (2023-24 ) यामधील झालेले बदल बघू या.

अं क्रप्रधानमंत्री मातृ वंदना योजना 1.0 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0
लाभार्थी महिलेला फक्त पहिल्याच अपत्यासाठीच हा लाभ मिळत असे.  लाभार्थी महिलेला पहिले अपत्य झाल्यास पाच हजार व दुसरे अपत्य झाल्यास सहा हजार रु चा लाभ दिला जातो.
पहिले अपत्य हे मुलगी अथवा मुलगा असल्यास ५००० रु. तीन हप्त्यात लाभ देय होता.पहिल्या अपत्यासाठी दोन हप्त्यांमध्ये ५००० रु. आणि दुसरे अपत्य मुलगी झाल्यास एकाच टप्यात ६००० रु. चा लाभ मिळतो. 
योजनेसाठी कोणतीही आर्थिक अट नव्हती.योजनेसाठी कौटुंबिक आर्थिक उत्पन्न हे रु ८ लाख पेक्षा कमी असणे.
वयाची अट नव्हती.लाभ घेण्यासाठी कमीत कमी १८ वर्ष व जास्तीत जास्त ५५ वर्ष असणे गरजेचे.
गर्भपात झाल्यास, पुढील गर्भधारणेच्या वेळी बाकी असलेल्या टप्यांचा लाभ मिळत असे.गर्भपात अथवा उपजत मृत्यू झाल्यास, पुढील गर्भधारणेच्या वेळी नवीन लाभार्थी म्हणून पूर्ण लाभ दिला जाईल.
आधार कार्ड नसले तरी इतर पर्यायी कागदपत्रा आधारे पहिले दोन हप्ते ३००० रु. मिळत होते.आधारकार्ड नसेल तर इनरोलमेंट आयडी (आधार पावती ) अथवा अन्य ओळखपत्र देणे बंधनकारक आहे.
ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर मंजुरीसाठी ग्रामीण/तालुका वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( महानगर ), मुख्याधिकारी ( नगरपालिका ) स्तरावर मंजुरी दिली जात होती.ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर मंजुरीसाठी प्रथम आरोग्य सेविका कडून आणि द्वितीय मंजुरी हि अधिकारी स्तरावर दिली जाते.
नोंदणी करण्यासाठी तालुका प्रा. आ. केंद्र स्तरावर करण्यात येत होती.लाभार्थी स्वत: ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करू शकतो.
पूर्वी शासनाच्या आरसीएच पोर्टलवर नोंदणी  ( गरोदर पणाची नोंदणी ) केल्याचा लाभार्थी क्रमांक नसला तरी फॉर्म भरला जात असे.पूर्वी शासनाच्या आरसीएच पोर्टलवर नोंदणी  ( गरोदर पणाची नोंदणी ) केल्याचा लाभार्थी क्रमांक असणे बंधनकारक आहे.
१०मोबाईल क्रमांकाची गरज नव्हती.मोबाईल क्रमांक असणे बंधनकार आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 हप्ते मिळवण्या साठीची अट  :-

👉 लाभार्थ्याला पहिला हप्ता ३०००रु.  मिळवण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पातळीच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झालेली असावी.

👉 दुसरा हप्ता मिळवण्यासाठी, बाळची नोंद करणे आणि बाळाचे लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज कसा करायचा :-

👉 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही स्वत:  https://pmmvy.wcd.gov.in/ या संकेतस्थळा वरून  Citizen Login मधून ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.

👉 तसेच हा फॉर्म तुमच्या जवळ असलेल्या महा ई / CSC सेंटर मध्ये जाऊन सुध्दा अर्ज करू शकतात.

👉 तसेच तुम्ही आशा तथा फिल्ड फंक्शनरी ( ज्या कार्यक्षेत्रात आशा स्वयंसेविका नाही तेथील अंगणवाडी सेविका ) आणि  आरोग्य सेविका तथा सुपरवायजर यांना फॉर्म भरता येईल.

👉 ऑनलाईन पोर्टल द्वारे नोंदणी पूर्ण झाल्यावर, अर्जाची प्रिंटआउट काढून अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांसह जवळच्या आरोग्य केंद्रत किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे जमा करावा.

👉 ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्ही तुमच्या Citizen Login करूनअर्जाची स्थिती – Track Application Status ऑप्शनद्वारे तुम्ही चेक करू शकतात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 ( PMMVY 2.0 ) योजनेचे उदिष्टे :-

👉 माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दुष्टीने आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.

👉 माता व बाल मृत्यू दारात घट होऊन तो नियंत्रात रहावे व नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे.

👉 जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रुणहत्येस अवरोध करणे.

👉 लाभार्थ्यांकडून आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यास प्रेरित करणे.

👉 नवजात बालकाचे जन्माबरोबर जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे :-

अनिवार्य कागदपत्रे :-

👉 आधार कार्ड

👉 रेशन कार्ड ( Family Id )

👉 MCP कार्ड ( MCTS Id )

👉 बँक कार्ड

👉 मोबाईल क्रमांक

इतर कागदपत्रे :-

👉 मतदान कार्ड / पासपोर्ट / PAN कार्ड / मनरेगा जॉब कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / बँक पासबुक.

👉 परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड

👉 बाळाची जन्म नोंदणीची प्रत.

👉 माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत.

👉 गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.

खालीलपैकी कोणताही एक डाकुमेंट अनिवार्य :-

१.    कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु ८ लाख पेक्षा कमी असणे.

२.   अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमतीच्या महिला.

३.   ४० %  किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या ( दिव्यांग )महिला.

४.   बीपीएल शिधापत्रिकाधारक ( रेशनकार्ड ) महिला.

५.   आयुष्यमान भारत किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.

६.   ई-श्रम कार्ड धारक महिला.

७.  अंगणवाडी सेविका (AWW)/ अंगणवाडी मदतनीस (AWHs)/ आशा कार्यकर्ती (ASHAs).

  या पैकी कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कालमर्यादा :-

👉 पहिले अपत्य असेल तर शेवटच्या मासिक पाळीच्या ( LMP ) दिनांकापासून ५१० दिवसाच्या आत लाभार्थ्याने अर्ज संबंधित आरोग्य यंत्रणेकडे करणे आवश्यक आहे.

👉 दुसरे अपत्य जर मुलगी असेल तर तिच्या जन्म तारखेपासून २१० दिवसाच्या आत लाभार्थ्याने अर्ज संबंधित आरोग्य यंत्रणेकडे करणे आवश्यक आहे.

👉 सदर कालावधी उलटून गेल्यावर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

👉 बाळ साडेतीन महिन्याचे झाल्यावर लस टोचल्यानंतर अनुदानाची रक्कम मिळणार आहे.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2.0 In Marathi
विभागसार्वजनिक आरोग्य विभाग
योजनाप्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0
वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज ऑनलाईन भरल्यानंतरआरोग्य केंद्र किंवा आशा सेविकेकडे कागदपत्रांसह जमा करावा
लाभार्थीगर्भवती महिला
लाभार्थी वय18 ते 55 वर्ष
सरकारकेंद्र व राज्य सरकार
लाभपहिले अपत्य झाल्यास3,000 + 2,000 रु.
दुसरे अपत्य मुलगी झाल्यास6,000 रु.
संपर्क क्रमांकअसिस्टंट181
इमर्जन्सी112

या महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही :-

वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. ( केंद्र सरकार अथवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित सेवेत असलेल्या सर्व गर्भवती महिला किंवा सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत सामान लाभ मिळवणाऱ्या महिलांना PMMVY अंतर्गत लाभ दिला जाणार नाही.) 

निष्कर्ष :-

मित्रांनो, आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 मध्ये आपण योजना काय आहे ? योजनेच्या अटी ? योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? व योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती लागतात तसेच लाभ किती दिला जातो या बद्दल संपूर्ण माहित दिली आहे.

मि आशा करतो कि आमचा हा महत्वपूर्ण लेख नक्की तुम्हाला आवडला असेल. या योजनेबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांन पर्यंत शेअर करून प्रत्येक लाभार्थी आई पर्यंत पोहचवा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी किती लाभ मिळतो ?

👉 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी लाभार्थी महिलेस पहिले अपत्य झाल्यास आर्थिक मदत पाच हजार रु आणि दुसरे अपत्य हे मुलगी झाल्यास सहा हजार रु मिळते.

माझे दुसरे अपत्य हे मुलगा आहे मला या योजेचा लाभ मिळेल का ?

👉 नाही, दुसरे अपत्य हे मुलगी असेल तर या योजनेचा लाभ मिळेल.

मला दुसऱ्या अपत्याच्या वेळी एकापेक्षा जास्त ( जुळे )अपत्य झाले, मला योजनेचा लाभ मिळू शकतो का ?

👉 जर दुसऱ्या अपत्याच्या वेळी एकापेक्षा जास्त अपत्य झाले असतील तर, त्या अपत्यांपैकी एक किंवा अधिक मुली असतील तर तुम्हाला लाभ मिळू शकतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करावा ?

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://pmmvy.wcd.gov.in/ या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज भरून व तो अर्ज डाउनलोड करून योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे फॉर्मला जोडून जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे जमा करावा.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची लाभार्थी रक्कम कशी दिली जाईल ?

👉 सदर लाभ हा आधार संलग्न बँक खात्यात DBT द्वारे दिला जाईल. परुंतु महत्वाच म्हणजे बाळ साडे तीन महिन्याचे झाल्यानंतर व लस टोचल्यानंतर हि रक्कम मिळणार आहे.

2 thoughts on “प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 (Pradhan Mantri Matru Vandana Yojana In Marathi )”

Leave a Comment