प्रधानमंत्री किसान मानधन योजना ( PM Kisan Mandhan Yojana in Marathi ) काय आहे ? योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळते ? कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे ? योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? या बद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघू.
दिनांक ३१ मे २०१९ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) सुरु करण्यात आली. या योजनेचा उद्देश देशातील अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रधान करणे हा आहे. “पीएम किसान मानधन योजना (PM-KMY)“ हि ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन म्हणून १८ ते ४० वय वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक एकूण रक्कम ३६,००० रु पेन्शनच्या रूपाने मिळतात.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहे ?
प्रधानमंत्री किसान मानधन योजना हि केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांनसाठी चालवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्ती वेतन म्हणून महिन्याला ३,०००/- रु दिल्या जाते.
परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांला मासिक प्रीमियम म्हणजे ठराविक रक्कम शेतकऱ्याला योजनेमध्ये भरावी लागते. या साठी वयमर्यादा सुद्धा निच्छित करण्यात आली आहे, वय वर्षे १८ ते ४० वयोगटातील लोक या योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकऱ्यांचे वय हे १८ असेल त्या शेतकऱ्याला दरमहा रु. ५५ आणि ४० वर्ष असलेल्या शेतकऱ्याला दरमहा २०० रु प्रिमियम भरावे लागतात. त्यानंतर वय वर्षे ६० पूर्ण झाल्यावर भारत सरकार द्वारे त्या शेतकऱ्याला मासिक ३,००० रु. पेन्शन दिल्या जाते. शेतकरी पती-पत्नी या योजनेचा वेगवेळा लाभ घेऊ शकतात.
सरकारी योजना व्यवसाय करण्यासाठी लागणारे शासकीय परवाने
पीएम किसान मानधन योजना सुरु करण्यामागचे कारण :-
शेतकऱ्यांना शेतात कठोर परिश्रम करावे लागते. परंतु एक काळ असा येतो जेव्हा शेतकरी वृद्ध होतो. वृद्धा पणामुळे त्यांचाकडून कठोर परिश्रम करणे शक्य होत नाही, त्यामुळे अनेक वृद्ध शेतकऱ्यांचा रोजीरोटी प्रश्न निर्माण होऊ शकतो. अश्यात लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बाबतीत हि समस्या अधिक वाढली आहे. कारण त्यांच्याकडे वृद्धकाळासाठी कोणतीही बचत नसते. तसेच त्यांच्या कडे कोणतेही रिटायरमेंट पेन्शन प्लान नसतो. शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्ध काळात आर्थिक मदत व्हावी म्हणूनच शासनाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली.
पीएम किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत लघु व अल्पभूधारक शेतकरी, पुरुष किंवा स्त्री साठी वय वर्षे ६० पूर्ण झाल्यावर एक सुनिच्छित मासिक पेंशनची व्यवस्था देण्यात येते. वय वर्षे ४० पेक्षा अधिक वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही आहेत.
पीएम किसान मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्यांला किती प्रिमियम भरावे लागते ?
पीएम किसान मानधन योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्याला योगदान म्हणून ५५ रु. पासून ते २०० रु पर्यंत प्रति महिना प्रिमियम भरावा लागतो. तसेच जेवढा मासीक प्रिमियम शेतकरी भरतो तेवढाच अतिरिक्त प्रिमियम शासन शेतकऱ्याच्या खात्यात भरते.
उदा. समजा एखादा शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी मासिक प्रिमियम ५५ रु भरत असेल तर, भारत सरकार सुद्धा शेतकऱ्याएवढे मासिक प्रिमियम ५५ रु. भरेल. असे मिळून ५५ + ५५ = ११० रु. मासिक प्रिमियम योजनेसाठी गोळा करण्यात येतो.
हा प्रिमियम शेतकऱ्याला वयाच्या ६० वर्षे पर्यंत भरावा लागतो. त्यानंतर ६० वर्षे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला ३००० रु. मासीक पेन्शन मिळते. शेतकऱ्याला किती प्रिमियम भरावा लागतो ते त्याच्या वयानुसार ठरते. चला तर बघूया वयानुसार कोणत्या शेतकऱ्यांना दरमहा किती प्रिमियम भरावा लागेल.
शेतकऱ्यांचे वय | सेवानिवृत्ती वय | शेतकऱ्यांचे योगदान ( रु. ) | सरकार चे योगदान ( रु. ) | एकूण योगदान ( रु. ) |
18 | 60 | 55 | 55 | 110 |
19 | 60 | 58 | 58 | 116 |
20 | 60 | 61 | 61 | 122 |
21 | 60 | 64 | 64 | 128 |
22 | 60 | 68 | 68 | 136 |
23 | 60 | 72 | 72 | 144 |
24 | 60 | 76 | 76 | 152 |
25 | 60 | 80 | 80 | 160 |
26 | 60 | 85 | 85 | 170 |
27 | 60 | 90 | 90 | 180 |
28 | 60 | 95 | 95 | 190 |
29 | 60 | 100 | 100 | 200 |
30 | 60 | 105 | 105 | 210 |
31 | 60 | 110 | 110 | 220 |
32 | 60 | 120 | 120 | 240 |
33 | 60 | 130 | 130 | 260 |
34 | 60 | 140 | 140 | 280 |
35 | 60 | 150 | 150 | 300 |
36 | 60 | 160 | 160 | 320 |
37 | 60 | 170 | 170 | 340 |
38 | 60 | 180 | 180 | 360 |
39 | 60 | 190 | 190 | 380 |
40 | 60 | 200 | 200 | 400 |
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रिमियम, हा शेतकऱ्याने दिलेल्या बँक खात्यातून ऑटो-डेबिट केला जाईल. सदर प्रिमियम एक, तीन, सहा किंवा बारा महिन्यातून केव्हा भरायचा हे शेतकरी फॉर्म भरण्याच्या वेळी पसंती नुसार निवडू शकतो.
योजने साठी लागणारे कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- नॉमिनी डिटेल्स ( वारसाची माहिती )
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
पात्रता:- ( PM Kisan Mandhan Yojana in Marathi )
- अर्जदार शेतकरी असायला हवा.
- अर्जदारा कडे २ हेक्टर किंवा २ हेक्टर पेक्षा कमी जमीन असायला हवी.
- वय मर्यादा १८ ते ४० वयोगटातील शेतकरी
अपात्रता :- ( PM-KMY )
- अर्जदार हा EPFO, ESIEC चे सदस्य नसावा.
- अर्जदार हा ( PM-SYM ) श्रम योगी मानधन पेन्शन योजनेचा लाभ घेणारा नसावा.
- ( PM-LVM ) लघु व्यापारी मान-धन पेन्शन योजनेचा लाभ घेत असलेले शेतकरी
- सेवानिवृत्त अधिकारी, मंत्री, आणि राज्यसभा, लोकसभा, विधानसभा मधील माजी/ वर्तमान सदस्य, महापौर, पंचायत समितीचे माजी आणि विध्यामान अध्यक्ष
- डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट इ.
- वार्षिक आयकर भरणार व्यक्ती.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना साठी अर्ज कसा करायचा ?
प्रधानमंत्री किसान मानधन योजने साठी तुम्ही तुमच्या जवळच्या महा ई किंवा कॉमन सर्विस सेंटर ( CSC ) मध्ये जाऊन करू शकतात, किंवा तुम्ही स्वत: वेवसाईट वरून अर्ज करू शकतात. वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
खालील स्टेप फॉलो करून तुम्ही स्वत: या योजनेसाठी अर्ज करू शकाल.
स्टेप १ :- https://maandhan.in/maandhan/login या वेबसाईट वर जा.
स्टेप २ :- Self Enrollment वर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून घ्या.
स्टेप ३ :- मोबाईल नंबर वर OTP येईल तो टाकून “Process” या बटनावर क्लिक करा.
स्टेप ४ :- आता तुमच्या समोर नवीन विंडो ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला “Service” या ऑप्शन मध्ये “ Enrollment “ ऑप्शन दिसेल त्यामधील दोन नंबरचे “ PM-KMY “ या ऑप्शन वर क्लिक करावे.
स्टेप ५ :- तुमच्या समोर फॉर्म योजनेचा फॉर्म येईल. हा फॉर्म तुम्हाला स्टेप बाय स्टेप ६ टप्यात भरायचा आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदन योजना २.० लेक लाडकी योजना
स्टेप ६ :- पहिल्या स्टेप मध्ये व्यक्तीक माहिती भरावी, नंतर बँक डिटेल्स व
नॉमिनी डिटेल्स भरून घ्याव्या.
स्टेप ७ :- त्यानंतर स्टेप ३ मध्ये Form डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्यावर सही करून घ्यावी. त्यानंतर तुम्ही तो फॉर्म स्टेप ४ मध्ये फॉर्म स्कॅन करून अपलोड करून घ्यावा.
स्टेप ८ :- त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रिमियम नुसार पेमेंट करावे लागेल. पेमेंट झाल्यावर तुम्ही तुमचे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे कार्ड डाउनलोड करू शकतात.
अश्या प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजना साठी (PM Kisan Mandhan Yojana in Marathi ) अर्ज करू शकतात.
PM Kisan Mandhan Yojana in Marathi | |
योजनेचे नाव | पीएम किसान मानधन योजना |
लाभार्थी | देशातील अल्पभूधारक शेतकरी |
पेन्शन | 3000 रु प्रति महिना |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
वेबसाईट | https://maandhan.in/ |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
श्रेणी | केंद्र सरकार योजना |
योजनेची घोषणा | 2019 |
योजनेचा उद्देश | वृद्धकाळ निवृत्ती वेतन |
हेल्पलाईन नंबर | 1800 2676 888 / 14434 |
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे वैशिष्टे :-
👉 ६० वर्षे पूर्ण झाल्यावर मासिक ३,००० रु पेन्शन म्हणून शेतकऱ्याला मिळते.
👉 पेन्शन चालू असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू , झाल्यावर हि त्याच्या पत्नीस दरमहा कौटुंबिक १,५०० रु. पेन्शन मिळते.
👉 जर लाभार्थ्याचा लवकर मृत्यू झाल्यास ( ६० वर्षे अगोदर ) तर त्याची पत्नी सदर योजना पूर्ण करू शकते किंवा योजनेतून बाहेर पडू शकते.
👉 लाभार्थीला योजनेतून बाहेर पडायचे असेल तर, त्याचे संपूर्ण योगदान व्याजा सह परत करण्यात येते.
👉 योजनेसाठी ५०% शेतकरी तर बाकीची ५०% रक्कमेचा प्रिमियम केंद्र सरकारद्वारे जमा करण्यात येतो, लाभार्थ्याचे वय वर्षे ६० झाल्यानंतर सदर पेन्शन चे वाटप LIC द्वारे केल्या जाते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-
1. माझ्या नावावर २ हेक्टर पेक्षा अधिक जमिन आहे? मि या योजनेसाठी पात्र असेल का ?
👉 नाही, २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी फक्त या योजनेसाठी पात्र असेल.
2. योजने दरम्यान काही वर्षा नंतर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास ?
👉 योजने दरम्यान लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास सदर रक्कम हि नॉमिनीला मिळते. सदर नॉमिनी ठरवू शकतो कि योजना पुढे सुरु ठेवायची कि योजनेतून बाहेर पडायचे.
3. ६० वर्षे नंतर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास ?
👉 अर्थी पेन्शन ( १५०० रु ) दरमहा नॉमिनीला मिळते.
4. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेतून बाहेर पडायचे असेल तर ?
👉 अधिकृत वेवसाईट वर जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट लॉगीन करून, तुम्ही तुमच्या केस नुसार बाहेर पडू शकतात.
5. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची प्रोफाईल दुरुस्ती किंवा अकाऊंट स्टेटमेंट कसे बघायचे, कार्ड प्रिंट कसे करायचे ?
👉 अधिकृत वेवसाईट वर जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट लॉगीन करून तुम्ही “Service” या टॅबवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला प्रोफाईल अपडेट, अकाऊंट स्टेटमेंट व कार्ड प्रिंट करण्याचे ऑप्शन दिसेल.