महाराष्ट्र शासन परिवहन महामंडळ एस टी बस योजना ( लालपरी ) MSRTC Yojana- 2024-25

नमस्कार मिंत्रानो, आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे, एसटी बस योजना (महाराष्ट्र शासन परिवहन महामंडळ – MSRTC )  द्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सोई सुविधा/ सवलती/ योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.        राज्य परिवहन महामंडळाने बोगस लाभार्थी वगळण्यासाठी “ डिजीटलायझेशन “ पद्धत स्विकारून “ स्मार्ट कार्ड “ योजना आमलात आणली.

राज्य परिवहन महामंडळाने बोगस लाभार्थी वगळण्यासाठी “ डिजीटलायझेशन “ पद्धत स्विकारून “ स्मार्ट कार्ड “ योजना आमलात आणली.

स्मार्ट कार्ड काय आहे ?

स्मार्ट कार्ड हे एक एम्बेडेड इंटीग्रेटेड ( IC ) चिप असलेले फिजिकल कार्ड आहे. या कार्ड मध्ये एक मायक्रो प्रोसेसर मेमरी स्टोरेज असते, या मेमरीचा उपयोग वापरकर्त्याची माहिती स्टोअर करण्यात येतो. स्मार्ट कार्डची साईज सामन्यात ड्रायव्हिंग लायसन्स किंवा क्रेडीट कार्ड एवढी असते. स्मार्ट कार्ड हे धातू किंवा प्लास्टिकचे असू शकतात.

स्मार्ट कार्ड हे एक फिजिकल कार्ड असून, याचा वापर मोठ्या व्यवसायांमध्ये सेक्युरिटी व माहिती पडताळणीसाठी या कार्ड चा उपयोग केला जातो.

MSRTC

जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड :-

एस टी महामंडळ द्वारे ६५ वर्ष पेक्षा जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकास एस टी स्मार्ट कार्ड काढून घेण्याचे अव्हान केले आहे, स्मार्ट कार्ड आधारे जेष्ठ नागरिकास वर्षाला ४००० किमी पर्यंतच्या बस तिकिटात ५० टक्के सवलत दिली जाते, सध्या आधार कार्ड द्वारे हि सवलत दिली जात आहे, परंतु भविष्यात आधार कार्ड आधारे हि सवलत दिली जाणार नाही आहे, जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी शासनाने मुदत वाढ दिलेली आहे तरी लवकरात लवकर जेष्ठ नागरिक कार्ड काढून घ्यावे असे अवाहन परिवहन महामंडळा द्वारे करण्यात आले आहे.

प्रवासामध्ये सवलत मिळावी म्हणून अपात्र नागरीक मोठ्या प्रमाणात बोगस पद्धतीने आधार कार्ड ( डुबलीकेट ) बनवून त्यात ६५ वर्षा पेक्षा जास्त वय दाखवून प्रवासामध्ये सवलत घेत होते, हा सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. तसेच या स्मार्ट कार्डला रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात पैशे बागळण्याची गरज सुद्धा राहणार नाही.

जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ? MSRTC Smart Card Required Documents?

👉 आधार कार्ड

👉 मतदान कार्ड

👉 नागरिकाचे आधार कार्ड वरील वय हे ६५ पेक्षा असणे गरजेचे आहे.

👉 मोबाईल नंबर

जेष्ठ नागरिक कार्ड साठी कुठे अर्ज करावा ?

👉 जवळच्या डेपो मध्ये किंवा नेमणूक केलेल्या MSRTC एजेंट कडे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात.


विद्यार्थी स्मार्ट कार्ड पास :-

👉 या योजनेचा विद्यार्थाला लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला स्मार्ट कार्ड काढावे लागेल, त्या नंतर विद्यार्थी स्मार्ट कार्डला दर महिन्याला टॅाप-अप / रिन्यू करून विद्यार्थी पासचा फायदा घेऊ शकतो.

👉 MSRTC विद्यार्थ्यांना मासिक पासवर विशेष सवलत देते. विद्यार्थी बसमध्ये स्मार्टकार्डचा वापर करून लाभ घेऊ शकतो.

👉 प्रत्येक स्मार्टकार्ड मध्ये विद्यार्थ्याचे वैयक्तिक तपशील, पास ची रक्कम आणि पासचा कालावधी स्टोर असतो.


आवडेल तसा प्रवास  पास  कार्ड :- Travel As you like Pass

👉 महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांसाठी MSRTC एक योजना राबवत आहे, ज्या मध्ये प्रवासी ४ किंवा ७ दिवसासाठी पाससाठी नोंदणी करू शकतो आणि नोंदणी केलेल्या कालावधीसाठी कोणत्याही MSRTC बसने प्रवास करू शकतो.

👉 या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाला आधी स्मार्टकार्ड साठी नोदणी करावी लागेल. हे कार्ड एका महिन्यात वितरीत केले जाते.

एस टी स्मार्ट कार्ड साठी कुठे नोदणी करावी व स्मार्ट कार्ड रिन्यू / रिचार्ज कुठे करायचे?

👉 MSRTC च्या अधिकृत एजेंट द्वारे किवा बस डेपो मध्ये स्मार्ट कार्ड साठी नोंदणी करता येईल. तसेच तुम्ही मासिक पास व स्मार्ट कार्ड रिन्यू पण करता येईल.


MSRTC सर्विस पास :-

👉 नोकरी करत असलेल्या व्यक्तींसाठी प्रवास योजना सुरु केलेली आहे, या योजने अंतर्गत मासिक पास मध्ये व्यक्ती २५ दिवसांनसाठी पैसे देऊन ३० दिवस प्रवास करू शकतो.

👉 या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी करणे आवश्यक आहे. 


अमृत जेष्ठ नागरिक योजना :- (Amrut Senior Citizen Scheme)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या अमृत महोत्सवनिमित्त घोषणा केली कि, राज्यातील ७५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये आता मोफत प्रवास करता येईल.

या योजनेचा लाभ जवळजवळ १५ लाख जेष्ठ नागरिकांना होणार आहे. ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, जेष्ठ नागरिक एस टी स्मार्ट कार्ड या पैकी कुठलेही एक ओळखपत्राने प्रवास करता येईल.

  • “ अमृत जेष्ठ नागरिक योजना ” द्वारे  ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बस मध्ये मोफत प्रवासाचा लाभ मिळतो.  

महिला सम्मान योजना :- ( Mahila Samman Yojna )

दिनांक ९ मार्च २०२३ रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महा मंडळामध्ये सरसकट ५० टक्के तिकीट दरात सवलतीची घोषणा केली. एसटी महिला सम्मान योजने अंतर्गत बसमधून प्रवास करणाऱ्या महिलां ५० टक्के प्रवास सवलत दिली जाते.

👉 सन २०२३-२४ साली झालेल्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प नुसार सवलत हि भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस करीत लागू राहील.

👉 सदर सवलत हि फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत लागू राहील.


अहिल्याबाई होळकर योजना :-

अहिल्याबाई होळकर या योजने मध्ये ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेल्या इ. ५ ते १२ वी, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीसाठी साध्या बसमध्ये  १०० टक्के शिक्षण प्रवास सवलत दिली जाते.


एस टी बस योजना
सरकारमहाराष्ट्र
विभागराज्य परिवहन महामंडळ
वेबसाईटयेथे क्लिक करा
बस बुकिंगयेथे क्लिक करा
पार्सल सर्विसेस नंबरयेथे क्लिक करा
आगार व बस स्थानके नंबरयेथे क्लिक करा
हेल्पलाईन नंबर1800 22 1250
श्रेणीराज्य सरकार योजना
MSRTC

एसटी महामंडळा तर्फे दिल्याजाणाऱ्या इतर सवलती :-

  • एसटी महा मंडळाकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येते.
अ. क्र.सवलत तपशील बस प्रकारतिकीट दरातील सवलत टक्केवारीशासन लाभ
स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी बस, निमआराम, आराम,वातानुकुलित१००प्रति लाभार्थी रुपये ४०००/- ८००० कि.मी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी बस, निमआराम, आराम१००प्रति लाभार्थी रुपये ४०००/- ८००० कि.मी.
अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनीसाठीसाधी बस१००
शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार-शिवशाही (शयनयान) बस ८००० कि.मी.पर्यंतसाधी बस, निमआराम,
शिवशाही ( आसनी व शयनयान)
१००
राज्यातील ६५ वय वर्षेपेक्षा जास्त असलेले जेष्ठ नागरिकसाधी बसबसबस, निमआराम बस, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)


५०४००० कि.मी.पर्यंत एकत्रीत(साधी बस, निमआराम, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)
राज्यातील ७५ वय वर्षेपेक्षा जास्त असलेले जेष्ठ नागरिकसाधी बसबस, निमआराम, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)
१००
विद्यार्थी मासिक पास सवलतसाधी बस६६.६७
विद्यार्थ्यांना देण्यात येणारी सवलतसाधी बस५०
विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत त्यांच्या गावी जाण्यासाठी, परिक्षेला जाण्यासाठी, शैक्षणिक कॅम्पलसाठी, आजारी आई वडिलांना भेटण्यासाठीची सवलतसाधी बस५०
१०अंध व अंपग व्यक्तीसाधी बस, निमआराम७५
शिवशाही (आसनी)७०
११६५ % वरील अंध व अंपग व्यक्ती तसेच त्यांचे मदतनीससाधी बस, निमआराम५०
शिवशाही (आसनी)४५
१२क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी बस७५प्रति प्रवास ५० कि.मी.
१३कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी बस७५प्रति प्रवास १५०० कि.मी.
१४कृष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी बस७५प्रति प्रवास ५० कि.मी.
१५महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळातील विजयी स्पर्धकांसाठीसाधी बस३३.३३
१६विद्यार्थी जेवणाचे डबेसाधी बस१००
१७अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूसाधी बस, निमआराम, आराम,वातानुकुलित१००रुपये २००० पर्यंत
१८आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी बस, निमआराम, आराम१००रुपये १००० पर्यंत
१९लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी बस, निमआराम, आराम१००रुपये ४०००/- / ८००० कि.मी.पर्यंत
२०पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलतसाधी बस, निमआराम१००रुपये १३४७०/-पर्यंत
२१विधानमंडळातील सदस्य असलेले व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर प्रवासात सूटसाधी बस, निमआराम, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)
१००
२२माजी विधानमंडळातील सदस्य असलेले व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर प्रवासात सूटसाधी बस, निमआराम, आराम,वातानुकुलित,
शिवशाही (आसनी व शयनयान)
१००
२३रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरितासाधी बस६६.६७
२४मुंबई येथील पुनर्वसन केंद्रातील अपंग असलेल्या विद्दयार्थ्यांच्या सहलीसाठीसाधी बस६६.६७
२५अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे साथीदारसाधी बस, निमआराम१००रुपये ११०००/-पर्यंत
२६सिकलसेल रुग्णसाधी बस, निमआराम१००प्रति प्रवास १५० कि.मी.पर्यंत
दुर्घर आजार (HIV)रुग्णसाधी बस, निमआराम१००प्रति प्रवास ५० कि.मी.पर्यंत
डायलेसिस रुग्णसाधी बस, निमआराम१००प्रति प्रवास १००कि.मी.पर्यंत
हिमोफेलिया रुग्णसाधी बस, निमआराम१००प्रति प्रवास १५० कि.मी.पर्यंत
२७राज्यस्तरीय व्यसनमुक्ती राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तीसाधी बस, निमआराम,आराम१००रुपये २०००/- १००० कि.मी.पर्यंत
२८कौशल्य सेतू अभियान या योजनेचा लाभार्थीला ६ महिने पर्यंत अभ्यास कलावधीसाठीसाधी बस६६.६७
२९शैक्षणिक खेळसाधी बस५०
३०शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनासाधी बस, निमआराम,वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान)१००
List of MSRTC Scheme

निष्कर्ष :-

मित्रांनो, या लेख मध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ( MSRTC ) द्वारे देण्यात आलेल्या योजना व सवलत या बद्दल महिती दिली आहे. नक्की तुम्हाला हि माहिती  उपयोगी पडेल, मला आशा आहे कि हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल व या योजनेची माहिती इतरांना शेअर करून जास्त लोकांन पर्यंत हि पोचवाल.

धन्यवाद .. 

Leave a Comment