Lek Ladki Yojana Marathi | लेक लाडकी योजना – 2024

Lek Ladki Yojana Marathi : नमस्कार मित्रानो, आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या लेक लाडकी योजना,  ( Lek Ladki Yojana Marathi ) तसेच लेक लाडकी या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, योजनेची पात्रता काय आहे ? योजने अंतर्गत  लाभ किती मिळतो ?  तसेच या लेखमध्ये आपण योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.   

Table of Contents

योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेऊया :- Lek Ladki Yojana Marathi

महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात वाढ व्हावी म्हणून दिनांक १ ऑगस्ट २०१७ मध्ये नवीन ( सुधारित ) माझी कन्या भाग्यश्री योजना लागू केली. परंतु या योजनेला मिळणारा अपुरा प्रतिसाद लक्षात घेऊन, मुलींच्या सक्षमीकरणाकरिता माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या जागी लेक लाडकी योजना ( Lek Ladki Yojana Marathi )आमलात आणली.

ज्या कुटुंबाकडे पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशनकार्ड असेल, तर अश्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यास टप्याटप्यामध्ये शासनामार्फत एक लाख एक हजार रु. इतके अनुदान देण्यात येईल. अनुदानाच्या शेवटच्या टप्यामध्ये लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रु रोख देण्यात येतील. अशी घोषणा २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. सदरअर्थसंकल्पामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी योजना ” सुरु करण्यासाठी विचाराधीन होती.

Lek Ladki Yojana Marathi

माझी कन्या भाग्यश्री ( सुधारित ) या योजनेच्या जागी दिनांक १ एप्रिल २०२३ पासून शासनाने “ लेक लाडकी ” या योजनेला मान्यता दिली.


योजना :- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.०


लेक लाडकी योजना उद्दिष्टे :-    

1. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढवणे.

2. मुलींच्या शिक्षणास प्रेरणा देणे.

3. मुलींच्या भ्रुणहत्या हत्या तसेच मुलींचे वाढते मृत्यू दर कमी करणे.

4. बालविवाह रोखणे.

5. कुपोषण दर कमी करणे.

6. मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण वाढणे.


लेक लाडकी योजना साठी अंतर्गत मिळणारा लाभ :-

लेक लाडकी योजनेसाठी शासन हे मुलींना ५ टप्यात एक लाख एक हजार रु इतके अनुदान देते.

लेक लाडकी योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम
 1.मुलीचा जन्म झाल्यावर५,०००/- रुपये
 2.मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर६,०००/- रुपये
 3.मुलगी इयत्ता सातवीत गेल्यावर७,०००/- रुपये
 4.मुलगी इयत्ता अकरावीत गेल्यावर८,०००/- रुपये
 5.१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर७५,०००/- रुपये
एकूण अनुदान१,०१,०००/- रुपये
Lek Ladki Yojana

योजने अंतर्गत विविध टप्यामध्ये दिला जाणार लाभ हा थेट ( DBT ) द्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात दिला जाईल.


योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-

👉 लाभार्थ्याचा जन्म दाखला

👉 तहसील उत्पन प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे )

👉 लाभार्थ्याचे आधार कार्ड

👉 पालकाचे आधार कार्ड

👉 बँक पासबुक

👉 रेशनकार्ड ( पिवळे अथवा केशरी )

👉 मतदान कार्ड ( पाचव्या हप्त्यासाठी :- मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर )

👉 बोनाफाईड ( संबधित हप्त्यासाठी :- मुलीचा बोनाफाइट )

👉 कुटुंब नियोजन शस्त्रकीया प्रमाणपत्र. ( पहिल्या अपत्याच्या :- तिसऱ्या हप्त्यासाठी, दुसऱ्या अपत्याच्या :-  दुसऱ्या हप्त्यासाठी )

👉 अंतिम लाभ ( १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ) घेण्यासाठी मुलीचे अविवाहित आल्याचे स्वयं घोषणापत्र.

Lek Ladki Yojna Maharashtra
योजनेचे नावलेक लाडकी योजना
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२३-२४
विभागमहिला एवं बाल विकास विभाग, महाराष्ट्र
श्रेणीराज्य सरकार योजना
लाभार्थीपिवळे व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात, १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला येणाऱ्या मुली.
एकूण आर्थिक लाभ१,०१,०००/- रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन
वेबसाईटलवकरच सुरु होईल

लेक लाडकी योजना शासन निर्णय :- Lek Ladki Yojana Gr

Lek Ladki Yojana GR

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ?

👉 लेक लाडकी योजना साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे करावा लागेल. योजनेसाठी लागणारा अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. तो डाउनलोड करून घ्यावा.

👉 अर्जामध्ये हस्तलिखित वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर, अपत्य माहिती, बँक तपशील इ. भरून घ्यावी.

👉 सदर अर्ज अंगणवाडी सेविकेकडे दिल्या नंतर, त्यांच्या कडून पोहच पावती घ्यावी.


ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी :-

अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्या कडून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्जासोबत कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून घ्यावी.


लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती :-

१. १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यास लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी, मुलीच्या आई वडिलांनी सर्व प्रथम जन्म नोंद करावी.

२. जन्म नोंद झाल्यानंतर, अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

३. लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक असलेले सर्वप्रकारचे अर्ज खालील कार्यलयात उपलब्ध असतील.

  • ग्रामीण व नागरी बाल विकास अधिकारी
  • जिल्हा परिषद
  • जिल्हा कार्यक्रम अधिकारी
  • जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
  • विभागीय उपयुक्त महिला बाल विकास
लेक लाडकी योजना

४. योजनेसाठी अर्ज सादर केल्यानंतर अर्जामध्ये काही त्रुटी ( तफावत ) निघाल्यास १ महिन्याच्या आत अर्जदाराने कागदपत्रांच्या पुर्ततेसह अर्ज दाखल करावा.

५. काही कारणास्तव जर अर्जदाराला कागदपत्रे सादर करायला १ महिन्यापेक्षा जास्त काळ लागत असेल तर, अर्जदाराला १० दिवसाची वाढीव मुदत देण्यात येते.

६. लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते ( जॉईट अकाऊंट ) उघडणे अनिवार्य राहील.

७. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास, मातेचे मृत्यू प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करून, लाभार्थी व पिता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य राहील.

८. मुलगी अनाथ असली तर, इतर अनाथ योजनेप्रमाणे लाभ देण्यात येईल.


लेक लाडकी योजना, अटी व शर्ती :-

१. दिनांक :- १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

२. दिनांक १ एप्रिल २०२३ च्या आधी जन्माला आलेल्या मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ राहील, त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

३. लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे अनिवार्य आहे.

४. पहिल्या अपत्याच्या, तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतांना आई वडिलांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

५. तसेच, दुसऱ्या अपत्याच्या, दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतांना आई वडिलांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

६. तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळे अपत्ये जन्मास आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर माता/ पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील.

७. लाभार्थीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे.

८. महाराष्ट्र राज्यातीलच बँक खाते असणे आवश्यक आहे.

९. लाभार्थी कुटुंबिक उत्पन हे एक लाखापेक्षा जास्त नसावे.


निष्कर्ष :-

लेक लाडकी या योजने अंतर्गत शासन टप्याटप्याने मुलींना एक लाख एक हजार रु एवढे अनुदान देते. मि आशा करतो कि आमचा हा महत्त्वपूर्ण लेख नक्की तुम्हाला आवडला असेल. या योजनेबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांनपर्यंत पोहचावा.


विचारले जाणारे प्रश्न :-

1. माझ्या मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ अगोदरच आहे तिला लेक लाडकी योजनाचा लाभ मिळेल का ?

👉 नाही, परंतु मुलीला माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.

2. मि महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवाशी नाही, मला या योजनेचा लाभ मिळेल का ?

👉 नाही, सदर योजनेचा लाभ हा फक्त स्थानिक महाराष्ट्रातील लोकांसाठी आहे.

3. काही कारणास्तव माझे कुटुंब अन्य राज्यामध्ये स्थलांतर झालो, तर मला या योजनेचा पुढील लाभ मिळेल का ?

👉 जर लाभार्थ्याने एक किंवा काही तप्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतर झाले असल्यास, थेट राज्य कशाकडे अर्ज सादर करावा. राज्य कक्ष यावर अंतिम निर्णय देतील.

4. माझ्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही आहे माझ्या मुलीला या योजनेचा लाभ मिळेल का ?

👉 नाही, योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे व केशरी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.

5. लेक लाडकी योजनेसाठी कोणाकडे नोंदणी करायची ?

👉 अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्या मार्फत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.

Leave a Comment