ABC ID Card, कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे कार्ड असायला पाहिजे. 2023-24

नमस्कार मित्रानो, आज आपण ABC ID Card काय आहे ? कार्ड कसे बनवायचे ? ओळखपत्र कसे डाउनलोड करतात ? शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण काय आहे ? ABC कार्ड चे फायदे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये बघणार आहोत.   

देशातील शैक्षणिक क्षेत्र वाढवण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत असून काळानुसार शिक्षणात बदल किंवा नूतनीकर केले जात आहे. या आधारावर केंद्र सरकारने एकेडमिक बैंक ऑफ क्रेडिट्स हे नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे, या नवीन धोरणामुळे शैक्षणिक स्तराबरोबर गुणवत्ता सुद्धा सुधारेल. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सर्व विद्यार्थ्यांसाठी एबिसी ओळखपत्र बनविणे अनिवार्य केले आहे.

“ शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स ” ( ABC ) म्हणजे काय ?

“ शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स ” ( ABC ) म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने स्थापन केलेली डिजिटल/ व्हर्च्युअल/ ऑनलाईन संस्था म्हणून शैक्षणिक सेवा यंत्रणा होय. या शैक्षणिक यंत्रणाद्वारे विद्यार्थ्यांना एखाद्या व्यवसाईक बँक प्रमाणेच, शैक्षणिक खातेधारकाची सुविधा देते. ज्यामुळे उच्च शैक्षणिक संस्थाद्वारे पदवी घेणाऱ्या अखंड विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामे लवकर होतील.

व्यवसाईक बँकप्रमाणे ABC हि एक शैक्षणिक हेतू साठी असलेली बँक आहे, या बँक मध्ये विद्यार्थी हे खातेधारक आहे , ज्यांना ABC क्रेडीट पडताळणी, क्रेडीट जमा करणे, क्रेडीट हस्तारण करणे आणि शैक्षणिक पुरस्कारांचे प्रमाणीकरण या सारख्या विविध सेवा विद्यार्थ्यांना प्रदान होईल.

ABC ID Card कोण बनवू शकतो ?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, पदविका किंवा पदव्युत्तर पदवी किंवा व्यवसाईक पदवी, किंवा प्रमाणपत्र कार्यक्रम ऑफर करणाऱ्या नोंदणीकृत उच्च शिक्षण संस्थामधून कौशल्य ( आयटीआय )अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन इच्छिणारे सर्व विद्यार्थी ABC कार्ड बनवू शकतात. हे कार्ड बनवल्यानंतर विद्यार्थी अभ्यासादरम्यान लाभ मिळवतील.

ABC ID Card काय आहे ?

ABC आयडी कार्ड हे एक विद्यार्थी ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र एकेडमिक बैंक ऑफ क्रेडिट्स (Academic Bank of Credits) च्या पोर्टल वर विद्यार्थी द्वारा प्रोफाईल बनवून ABC ID Card प्राप्त होते. ABC प्रोफाईल मध्ये, विद्यार्थ्याचे शेक्षणिक क्रेडीट एकत्र केले जातील आणि केंद्रीकृत भांडारात संग्रहित केले जातील.  त्याचा मुख्य उद्धेश हा विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शैक्षणिक क्रियांमध्ये सहज स्वतंत्र प्रवेश प्रदान करणे हा आहे.

जेव्हा एखादा विद्यार्थी शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्सवर स्वत :ची नोंदणी करतो तेव्हा त्याला ABC आयडी मिळतो. या ABC आयडीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख आणि एबीसी आयडी क्रमांक यासारखी मुलभूत माहिती असते. या कार्ड वर एक QR कोड देखील असतो, डिजी लॉकर या अप्लिकेशन मध्ये एबीसी कार्ड वरील QR कोड स्कॅन करून विद्यार्थी सत्यता पडताळणी करता येते. आधार कार्ड नंबर प्रमाणेच एबीसी आईडी कार्ड मध्येसुद्धा  १२ अंकी युनिक ओळख नंबर असतो. हा १२ अंकी युनिक ओळख नंबर हा विद्यार्थ्याची ओळख म्हणून वापरला जाईल.

ABC ID Card कसे बनवायचे ?

एबीसी कार्ड बनवण्यासाठी तुम्ही जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटर वर जाऊन बनवू शकतात, किंवा तुम्ही स्वतः खालील स्टेप्स फॉलो करून ABC ID कार्ड बनवू शकतात.

स्टेप १ :- सर्वप्रथम आपल्याला https://www.abc.gov.in/ या संकेतस्थळा वर जावे लागेल.

स्टेप २ :- आता तुम्हाला होम पेज वरील My Account या बटनावर क्लिक करून Student ऑप्शन निवडावे.

स्टेप ३ :– या नंतर तुमच्या समोर Digilocker ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

स्टेप ४ :- ज्यांचे Digilocker वर आधी अकाऊंट असेल त्यांनी Sign In या ऑप्शन वर क्लिक करावे. ज्यांचे अकाऊंट नसेल त्याने Sign Up या ऑप्शन वर क्लिक करावे.

स्टेप ५ :- आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल, आता दिलेल्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकून Genratd otp या ऑप्शन वर क्लिक करून दिलेल्या ठिकाणी otp टाकून घ्यावा.

स्टेप ६ :- यानंर तुम्हाला तुमचे नाव, जन्म तारीख, लिंग, कोणतेही युजरनेम तयार करून पिन सेट करून, खाली दिलेल्या चेक बॉक्स ला क्लिक करून वेरीफाय करून घ्यावे.

स्टेप ७ :- या नंतर तुम्हाला परत होम पेज वर जाऊन Students Login ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्टेप ८ :- आता तुम्हाला नवीन पेज वर Academy Year, Institute Type, Institute Name, Identity Type, Identity Value अनुक्रमे भरून Get Document या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

स्टेप ९ :- आता तुमचे ABC कार्ड बनून जाईल.

ABC Card Download कसे करायचे ?

स्टेप १ :- ABC ID कार्ड बनवल्या नंतर, तुम्हाला मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून  Digilocker App डाउनलोड करून, तुमचे अकाऊंट Sign In करून घ्यावे.

स्टेप २ :- त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करून, ABC ID Card टाकावे, आता तुम्हाला खाली पर्याय मध्ये ABC ID Card दिसेल ते सिलेक्ट करावे.

स्टेप ३ :– त्या नंतर नवीन पेज वर तुमाला अनुक्रमेAcademy Year, Institute Type, Institute Name, Identity Type, Identity Value टाकून Get Document या वर क्लिक करावे. जर तुमच्या कडे Identity Value नसेल तर Identity Value च्या ठिकाणी  00 भरा.

स्टेप ४ :- Get Document वरती क्लिक केल्यावर ABC ID Card ची pdf फाईल ओपन होईल. ती तुम्ही डाउनलोड करू शकतात.

ABC ID Card In Marathi
विभागकेंद्रीय शिक्षा मंत्रालय भारत सरकार
लाभार्थीदेशातील विद्यार्थी
श्रेणीकेंद्र सरकार
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
वेबसाईटयेथे क्लिक करा
डिजी लॉकरयेथे क्लिक करा
एबीसी आयडी नंबर12 अंकी
हेल्पलाईन नंबर+91-11-24303714

ABC ID कार्ड चे वैशिष्ट व फायदे :-

👉 जेव्हा प्रवेश अर्ज किंवा परीक्षा अर्ज भरावा लागतो, तेव्हा विद्यार्थ्याकडून एबीसी आयडी कार्डची मागणी केली जाते.

👉 एबीसी कार्ड अंतर्गत, विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार अभ्यास करण्याची पूर्ण सूट त्यांना दिली जाते.

👉 ज्या विद्यार्थ्यांकडे ABC ID Card खाते आहे, अश्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्यानंतरही पुन्हा अभ्यास सुरु करण्याची संधी मिळते.

👉 एबीसी कार्ड मधील क्रेडीट स्टोर लाईफ ही ७ वर्ष असते. ७ वर्ष पूर्ण झाले की विद्यार्थ्याला क्रेडीट स्कोर चा लाभ मिळत नाही.

👉 एखाद्या बँक प्रमाणे ABC ( Academic Bank Of Credit ) काम करते, जिचे ग्राहक हे विद्यार्थी असतात.

👉 शिक्षणामध्ये ग्याप असणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्ड चा फायचा होईल.

👉 स्टोअर पडताळणीसाठी अधिकृत संस्थेने सादर केलेली एबीसी कार्डेच स्वीकारली जातात.

👉 पडताळणीसाठी अधिकृत संस्थेने सादर केलेली अबिसी कार्ड स्वीकारली जातात.

मित्रांनो, मि आशा करतो कि तुम्हाला आमचा हा लेख महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर मित्रांना हि माहिती नक्की शेअर करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

ABC कार्डची सुविधा कोण घेऊ शकतो ?

👉 पात्र उच्च शैक्षणिक संस्था (HEIs) मधील विद्यार्थी ABC च्या सुविधा घेऊ शकतो.

ABC ची सुविधा कोणत्या वर्षा पासून लागू होईल ?

👉 शैक्षणिक वर्ष 2021-2022 दरम्यान किंवा त्यानंतर नोंदणीकृत HEI मध्ये अभ्यासक्रम हाती घेतल्याने क्रेडिट बॅंक ऑफ क्रेडिट्सद्वारे क्रेडिट रिडेम्प्शनसाठी पात्र आहेत.

पदवी किंवा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र देणारी संस्थेकडून किती क्रेडीट ची आवश्यक्यता आहे ?

👉 पदवी किंवा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र देणारी संस्थेकडून किमान ५०% क्रेडीट ची आवश्यकता आहे.

शैक्षणिक क्रेडीट काय आहे ?

👉 क्रेडिट म्हणजे एका सेमिस्टरच्या कालावधीसाठी (३०-१५ आठवडे) दर आठवड्याला एक तासाचा सिद्धांत किंवा एक तास ट्यूटोरियल किंवा दोन तासांच्या प्रयोगशाळेच्या कामाची/ उपस्थितीची गणना करण्याची मानक पद्धत; परिणामी एक क्रेडिट दिले जाते; जे उच्च शैक्षणिक संस्थेद्वारे दिले जाते.

ABC कार्ड मध्ये जमा झालेले क्रेडीटची वैधता किती वर्ष आहे ?

👉 ABC कार्ड मध्ये जमा झालेले क्रेडीटची वैधता सात वर्षसाठी आहे.

ABC Id कार्ड कोणत्या प्लाटफोर्म द्वारे काढल्या जाऊ शकते ?

👉 Digilocker , Umang आणि ABC च्या अधिकृत वेबसाईट वरून काढता येऊ शकते.

Leave a Comment