Pink E Rikshaw Yojana Maharashtra | महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना – 2024 – 25

Pink E Rikshaw Yojana Maharashtra : नमस्कार मिंत्रानो, महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2024-25 सादर करतांना महिलांसाठी विविध योजना घोषित केल्या होत्या. त्या घोषणामध्ये शासनाने महिलांसाठी “पिंक ई-रिक्षा योजना” राज्यात राबविणार असे सांगितले होते. आखेर या योजनेची सरकारद्वारे अंबलबजावणी करून योजनेचा शासन निर्णय जारी केला. खालील प्रश्नांची उत्तरे व Pink E Rikshaw Yojana In Marathi बद्दल सविस्तर माहिती बघू या.

पिंक ई रिक्षा योजना काय आहे ? या योजनेचा लाभ कुणाला मिळणार ? अर्ज कुठे करावा ? योजनेच्या अटी व शर्ती ? तसेच योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील या बद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखा द्वारे बघू या.

Table of Contents

पिंक ई रिक्षा योजना काय आहे ?

पिंक ई रिक्षा या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी शासनाकडून रिक्षा खरेदीसाठी अर्थ सहाय्य केल्या जाते. पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत 10,000 महिलांना या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

पात्रता :- Pink E Rikshaw Yojana Maharashtra Eligibility

1. लाभार्थी महिलेचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे.

2. लाभार्थी महिलेचे वय हे 18 ते 35 वर्ष मध्ये असावे.

3. तीन लाख रुपये पेक्षा जास्त लाभार्थी महिला कुटुंबाचे उत्पन्न नसावे.

4. लाभार्थी महिलेकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक.

5. विधवा, घटस्फोतीट, अनाथ प्रमाणपत्र युवती, बालगृहातील आजी/माजी यांना पिंक ई रिक्षासाठी प्रधान्य देण्यात येईल.

6. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येईल. Pink E Rikshaw Yojana Maharashtra

पिंक ई रिक्षा योजना साठी लागणारे कागदपत्रे :-

👉 ऑनलाईन अर्ज

👉 आधार कार्ड व पॅण कार्ड

👉 अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे

👉उत्पन्न प्रमाणपत्र ( तीन लाख रुपये पेक्षा कमी )

👉 बँक पासबुक

👉 पासपोट फोटो

👉 मतदान कार्ड

👉 रेशन कार्ड

👉 ड्रायव्हिंग लायसन्स

👉 हमीपत्र :- लाभार्थी महिलाच रिक्षा चालवणार

👉 हमीपत्र :- योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याचे

पिंक ई रिक्षाचे Specifications :-

Sr. NoComponentSpecifications
1किमत ( सर्व टॅक्स धरून )कमाल 4 लाख रुपये
2मोटर क्षमता10 एचपी
3Mileage /Chargeकिमान 110 कि.मी.
4बसण्याची व्यवस्था3+1 (Driver)
Pink E Rikshaw Yojana In Marathi Specifications

योजनेंतर्गत ई रिक्षा खरेदीसाठी, एजन्सी किंवा कंपनीमार्फत पात्र लाभार्थी महिलांना ई रिक्षा देल्या जाणार आहे.

या महिलांना मिळेल पिंक ई रिक्षा :-

  • महाराष्ट्र राज्यातील, शहरी भागा मध्ये राहणाऱ्या गरजू महिला व मुलींना Pink E Rikshaw Yojana Maharashtra या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, पनवेल, डोंबिवली, पुणे, छ. संभाजी नगर,  नाशिक, नागपूर, अहमदनगर, पिंपरी, चिंचवड, वसई-विरार, कोल्हापूर, सोलापूर व अमरावती या जिल्हामध्ये राहत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
पिंक ई रिक्षा योजना, E Rikshaw Yojana In Marathi, Pink E Rikshaw Yojana Maharashtra

कोणत्या महानगरपालिका मध्ये किती ई-रिक्षासाठी अर्थ सहाय्य दिल्या जाणार आहे :-

महाराष्ट्र राज्यात एकूण 17 महानगर पालिकांनमध्ये 10,000 महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. कोणत्या शहरात किती लाभार्थी महिलांना पिंक ई रिक्षा दिल्या जाईल जाणून घेऊ या चार्ट च्या माध्यमातून.

अं.क्र.शहरलाभार्थी
1.मुंबई उपनगर1400
2पुणे1400
3नागपूर1400
4ठाणे1000
5नाशिक700
6नवी मुंबई500
7छ संभाजी नगर400
8कल्याण400
9अहमदनगर400
10डोंबिवली400
11वसई-विरार400
12पिंपरी300
13चिंचवड300
14पनवेल300
15अमरावती300
16कोल्हापूर200
17सोलापूर200
Pink E Rikshaw Yojana Maharashtra Available Cities’

अशी होईल लाभार्थी महिलेची निवड :-

  • पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत लाभार्थी महिला निवडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे.
  • प्रत्येक शहरासाठी शहरासाठी लाभार्थी संख्या ठरवण्यात आली आहे, परंतु लाभार्थी संख्येपेक्षा जास्त योजनेसाठी अर्ज प्राप्त झाल्यास, योजनेसाठी प्रधान्य दिलेल्या लाभार्थ्यापासून ते लॉटरी पद्धतीने लाभार्थी महिलेची निवड करण्यात येईल.

पिंक ई रिक्षा योजनेचा अर्ज कुठे करावा :-

  • पिंक ई रिक्षा योजना साठी अजून तरी कोणतीही अधिकृत वेबसाईट शासनातर्फे घोषित केली नाही. Pink E Rikshaw Yojana In Marathi
  • परंतु शासन निर्णय मध्ये संगीतल्या प्रमाणे तुम्ही या योजनेचा फॉर्म अर्ज, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन करू शकतात.
  • सदर योजनेची जाहिरात हि वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल, त्यानंतर इच्छुक लाभार्थ्याने योजनेसाठी अर्ज करावा किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन योजनेची अधिक माहिती घ्यावी.

 पिंक ई रिक्षा योजनेचा उद्देश :- Pink E Rikshaw Yojana in Marathi

  • महाराष्ट्र राज्यातील मुली आणि महिलांना सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती करणे.
  • महिला व मुलींचे आर्थिक व सामाजिक पुनवर्सन करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता आला पाहिजे.
  • महाराष्ट्रातील महिलांना सशक्तीकरणास चालना मिळणे.

रिक्षा खरेदीसाठी महिलांना अर्थ सहाय्य :-

Pink E Rikshaw Yojana Maharashtra अंतर्गत महिलांना शासनामार्फत खालील प्रमाणे अर्थ सहाय्य करण्यात येणार.

  • महिलांना नागरी सहकारी बँक/ जिल्हा मध्यवर्ती बँक/ राष्ट्रीकृत बँकेमार्फत ई-रिक्षा किमतीच्या 70% कर्ज दिल्या जाईल.
  • राज्य शासनामार्फत ई-रिक्षा किमतीच्या 20% रक्कम रिक्षा खरेदीसाठी शासना मार्फत मिळेल.
  • लाभार्थी महिलेला ई-रिक्षा किमतीच्या 10% रक्कम स्वत: रिक्षा खरेदी साठी भरावी लागेल. सोप्या भाषेत उदाहरणा द्वारे समजून घेऊ या.
    उदाहरण :- समजा ई रिक्षाची किंमत अंदाजे चार लाख रुपये असेल तर, लाभार्थी महिलेला 70% रक्कम म्हणजे दोन लाख ऐंशी हजार रु रिक्षा घेण्यासाठी बँक मार्फत कर्ज मिळेल. तसेच शासनातर्फे 20% म्हणजेच ऐंशी हजार रुपये रिक्षा घेण्यासाठी मिळेल. तसेच 10% रक्कम म्हणजे 40,000 रुपये एवढी रक्कम हि अर्जदाराला स्वत: रिक्षा घेण्यासाठी भरावी लागेल.
Pink E Rikshaw Yojana in Marathi
योजनेचे नाव“पिंक (गुलाबी) ई-रिक्षा
लाभार्थीराज्यातील महिला
विभागमहिला व बाल विकास विभाग
लाभरिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज कुठे करावाजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
श्रेणीराज्य सरकार योजना
वर्ष2024-25

योजनेची कार्यपद्धती :-

1. पिंक ई रिक्षा या योजनेसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा.

2. योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी समिती करणार.

3. त्यानंतर योनेसाठी पात्र असलेल्या महिलांची माहिती, कर्ज देणाऱ्या बँक व रिक्षा पुरवठा करणाऱ्या एजन्सीला माहिती देणार.

4. त्यानंतर, योजनेंतर्गत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून दिल्या जाईल.

5. 70% मिळालेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी लाभार्थ्याची रहील.

6. लाभार्थी महिलेचे 70% कर्ज मंजूर झाल्यावर, ज्या एजन्सी कडून ई रिक्षा खरेदी करणार आहे, त्या एजन्सी मध्ये 10% रक्कम भरावी.

7. अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर उरलेली 20% रक्कम संबधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत दिल्या जाईल.

8. रिक्षा खरेदीची संपूर्ण रक्कम वाहन एजन्सी कडे जमा झाल्यावरच पिंक ई रिक्षा अर्जदाराला मिळणार.

9. पिंक ई रिक्षा महिलाच चालवते का याची तपासणी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागा मार्फत करण्यात येईल. तसेच पिंक ई रिक्षा पुरुष चालवत असतांना आढळला तर त्यावर कारवाई करण्यात येईल.

10. जर लाभार्थी महिला ई-रिक्षा घेऊन चालवत नसेल, तसेच कर्जाची रक्कम परतफेड करत नसेल तर महिलेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन समस्याचे निराकरण संबधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल.

11. त्यानंतर हि महिलेच्या अश्या समस्या राहिल्या तर नियमानुसार अर्जदारावर कारवाई करण्यात येईल.

योजनेच्या अटी व शर्ती :-

  • पिंक ई रिक्षा योजनेंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाच्या योजनेमध्ये ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा.
  • लाभार्थी महिला हि कर्ज बाजरी नसावी.
  • कर्ज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची असेल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. Pink E Rikshaw Yojana Maharashtra कधी झाली ?

👉 27 जून 2024 रोजी योजनेची घोषणा झाली व त्यानंतर 8 जुलै 2024 रोजी राज्यात योजना लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला.

2. पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार ?

👉 पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ हा वय गट 18 ते 35 वयोगटातील ठराविक शहरी भागातील महिलांना मिळणार आहे.

3. पिंक ई रिक्षा केव्हा मिळेल ?

👉 रिक्षा खरेदीची संपूर्ण रक्कम एजन्सी कडे जमा झाल्यावर

4. पिंक ई रिक्षासाठी लाभ किती मिळेल ?

👉 बँकेमार्फत 70% कर्ज स्वरुपात , शासनामार्फत 20% व उरलेले 10% लाभार्थ्याला स्वत: भरावे लागेल.

5. पिंक ई रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड किती वर्षाने करावी ?

👉 5 वर्षे ( 60 महिने )

6. पिंक ई रिक्षा पुरुष चालवू शकतो का ?

👉 नाही, जर पिंक ई रिक्षा चालवितांना पुरुष आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment