ज्या व्यक्तीसोबत तुम्ही UPI द्वारे व्यवहार करणार त्या व्यक्तीचे आता तुम्हाला खरे नाव पेमेंट करतांना दिसणार आहे
जर तुम्ही १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ज्या UPI App मधून एक हि व्यवहार केले नसतील तर तश्या APP मधील upi id रद्द केल्या येईल.
स्पेशल पेमेंट लिमिट हे ५ लाख रु पर्यंत करण्यात येणार आहे. स्पेशल पेमेंट लिमिट म्हणजेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल मधील फी, बिल तसेच तेथील सर्व पेमेंट हे तुम्ही एक दिवसात ५ लाख रु पर्यंत करू शकतात.
जानेवारी २०२४ पासून कोणत्याही नवीन व्यक्तीस दोन हजार रुपये पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ४ तास वेळ आता लागणार आहे. तुम्ही कोणाशीही नेहमी व्यवहार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू नसणार आहे
जसे तुम्ही डेबिट आणि क्रेडीट कार्ड ने Tap & Pay च ऑपशन वापरता, तस आता UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा लवकरच Tap & Pay ची सुविधा मिळू शकते
तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीसोबत UPI ने व्यवहार केला असेल तर तुम्ही मध्येच तो व्यवहार चार तासाच्या आता कॅन्सल करू शकतात