UPI पेमेंट मध्ये 10 बदल RBI मार्फत – UPI Payments Rules – 2024

UPI Payments Rules : आपल्या देशात जवळ जवळ ४० कोटी पेक्षा जास्त UPI युझर आहेत. आपण घराबाहेर पडलो कि छोटा व्यवसाय करणारा असो किंवा मोठा, सर्विकडेच पेमेंट करण्यासाठी UPI हा ऑप्शन दिसून येतो. त्यामुळे आपल्याला खिश्यात जास्त कॅश ठेवायची गरज लागत नाही.

RBI ने केले UPI पेमेंट मध्ये 10 बदल :-

२०२३ मध्ये देशभरात UPI वापरून १६  कोटी पेक्षा जास्त व्यवहार  झालेत. आजकाल UPI पेमेंट मध्ये धोकाधडीचे प्रमाण सुद्धा वाढले असून सायबर क्राईम नुसार या १६ लाख कोटी पेक्षा जास्त व्यवहारात ३० हजार कोटी रुपयेची चोरी केली गेली. व्यवहाराचे प्रमाण वाढणार तर त्यात चोरीचे प्रमाण सुद्धा वाढणार. म्हणूनच UPI पेमेंट वर नियंत्रण ठेवण्यासाठी व पेमेंट सुरक्षित होण्यासाठी RBI ने UPI पेमेंट मध्ये 10 बदल किंवा नवीन नियम लागू केले. सदर बदल हे १ जानेवारी २०२४ पासून करण्यात आले आहे. UPI पेमेंट मध्ये 10 बदल कोणकोणते बदल करण्यात आले ते पाहू या लेखाच्या माध्यमातून.


1. बँक अकाऊंट नेम UPI मध्ये दिसणार :-

ज्या व्यक्तीसोबत तुम्ही UPI द्वारे व्यवहार करणार त्या व्यक्तीचे आता तुम्हाला खरे नाव पेमेंट करतांना दिसणार आहे. म्हणजेच बँक डिटेल्सवरील खरे नाव तुम्हाला दिसणार त्यामुळे यात खरी ट्रान्सपरन्सी वाढवणार आहे.


2. वापरात नसलेले UPI App लॉक :-  

जर तुम्ही G-pay, PhonePe, Paytm, amazon Pay, BHIM UPI या पैकी कोणताही App तुमच्या फोन मध्ये असेल व तुम्ही संपूर्ण वर्ष भरात या App द्वारे एक हि व्यवहार केला नसेल तर त्या App मधील upi id सुरक्षेसाठी RBI द्वारे रद्द केला जाईल. म्हणजेच जर तुम्ही १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ज्या UPI App मधून एक हि व्यवहार केले नसतील तर तश्या App मधील upi id रद्द केल्या येईल.

UPI पेमेंट मध्ये 10 बदल


3. UPI डेली पेमेंट लिमिट :- ( UPI Payments Rules )

UPI पेमेंटला आता लिमिटेशन करण्यात आले असून UPI पेमेंटचे डेली लिमिट हे आता कमी करण्यात आले आहे. आता हे लिमिट फक्त १ लाख पर्यंत असेल, १ लाख पेक्षा अधिक व्यवहार तुम्ही UPI वापरून करू शकणार नाही.


4. स्पेशल पेमेंट लिमिट :-

स्पेशल पेमेंट लिमिट हे ५ लाख रु पर्यंत करण्यात येणार आहे. स्पेशल पेमेंट लिमिट म्हणजेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल मधील फी, बिल तसेच तेथील सर्व पेमेंट हे तुम्ही एक दिवसात ५ लाख रु पर्यंत करू शकतात.

PMEGP Loan :- ५० लाख रुपये पर्यंत लोन सोबत ३५% सबसिडी – 2024


5. ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइम :-

ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइम हा एक खूप महत्वाचा बदल असणार आहे. RBI ने वाढते सायबर क्राईम रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा बदल केला आहे. जानेवारी २०२४ पासून दोन हजार रुपये पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ४ तास वेळ आता लागणार आहे. आत्तापर्यंत हे पेमेंट समोरच्या व्यक्तीला केले कि ते लगेच समोरच्या व्यक्तीच्या अकाऊंट मध्ये जमा व्हायचे. परंतु आता २०२४ पासून कोणत्याही नवीन व्यक्तीस upi पेमेंट पूर्ण होण्यासाठी ४ तास लागणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जर तुम्ही कोणाशीही नेहमी व्यवहार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू नसणार आहे.

हा नियम फक्त नवीन व्यक्तीसोबत दोन हजार रुपये पेक्षा जास्त upi रकमेवरील व्यवहारासाठी लागू राहील. इथे मात्र एक प्रश्न उपस्थित राहतो कि, व्यवहार पूर्ण करायला ४ तास लागत असतील तर सर्व दुकानदारधारक हे आपल्या ग्राहकांनसाठी हा पर्याय चालू ठेवतील का ?

UPI पेमेंट मध्ये 10 बदल

6. UPI व्यवहार कॅन्सल ऑप्शन :-

UPI व्यवहारमध्ये कॅन्सल ऑप्शन हा सुद्धा महत्वाचा बदल आहे. यात तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीसोबत UPI ने व्यवहार केला असेल तर तुम्ही मध्येच तो व्यवहार चार तासाच्या आता कॅन्सल करू शकतात. आणि ते पैसे तुमच्या अकाऊंट रिव्हट होऊन तुमच्या अकाऊंट जमा होणार. याचा मोठा फायदा असा जर तुमचे पैसे कोणी फसवून किंवा तुम्ही चुकीच्या व्यक्तीला किंवा कुणला चुकून पेमेंट केले असतील तर ते तुम्ही तो व्यवहार ४ तासाच्या आता कॅन्सल करू शकतात.

याचा तोटा असा कि तुम्ही कुठे फिरयला गेलात आणि तिथे कदाचित तुमचा हा upi पेमेंट ऑपशन स्वीकारल्या जाऊ शकत नाही. तुम्हाला आधी सारखे कार्ड द्वारे पेमेंट करावे लागू शकते. UPI व्यवहार कॅन्सल बद्दलची भीती दुकानदाराच्या मनात राहील, त्यामुळे एखाद्या वस्तूची डिलिवरी तो तुम्हाला चार तासांनी UPI पेमेंट पूर्ण झाल्यावर देऊ शकतो. किंवा असा व्यवहार करणे ते टाळू शकतात.


7. UPI क्रेडीट लाईन :-

आधी UPI ने पेमेंट करण्यासाठी बँक मध्ये पैसे असणे गरजेचे होते. आता प्रर्यंत तुम्ही तुमच्या अकाऊंटला पैसे असतील तरच पेमेंट करू शकत होता. परुंतु आता बँकेला रिक्वेष्ट करून तुम्ही बँके कडून क्रेडीट घेऊ शकतात. याचा फायदा असा कि तुमच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे कमी असतील तर तुम्ही बँके कडून क्रेडीट घेऊन जास्त पेमेंट करू शकतात. सदर सर्विस हि तुमचा CIBIL स्कोर आणि रेकोर्ड चेक करून तुम्हाला बँक देईल.


8. UPI साठी Tap & Pay च ऑपशन येऊ शकत :-

२०२४ साठी UPI नियम बदलेत, जसे तुम्ही डेबिट आणि क्रेडीट कार्ड ने Tap & Pay च ऑपशन वापरता, तस आता UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा लवकरच  Tap & Pay ची सुविधा मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल पेमेंट मशीनवर टच करावा लागेल, आणि मग पेमेंट होईल. NPCI हि सर्विस देण्यासाठी सुरवात केली आहे असे सांगितल्या जात आहे.


9. UPI एटीएम :-

आता RBI ने जपानमधील HITACHI कंपनीसोबत कॉल्याब्रेट केलय, त्यामुळे लवकरच भारतात सगळीकडे बघायला मिळतील. ज्या प्रमाणे आपण एटीएम मधून क्रेडीट व डेबिट कार्ड द्वारे पैसे काढता त्याच प्रमाणे तुम्हाला UPI कोड स्कॅन करून तुम्हाला एटीएम मधून कॅश काढता येणार आहे.


10. UPI ट्रांजेक्शन चार्ज :-

जर कोणी UPI क्रेडीट कार्ड लिमिट वापरुन किंवा डेबिट कार्ड वापरून UPI वॉलेट मध्ये पैसे जमा केले म्हणजे हि सर्विस फक्त पेटीएम वर सुरु आहे. जर तुम्ही UPI वॉलेट मध्ये पैसे जमा केले असतील तर त्यातून UPI पेमेंट केले असेल तर त्या विक्रेत्याला १.०१% सर्विस चार्ज द्यावा लागेल.

या UPI सर्विसेस मध्ये येणाऱ्या सर्व प्रोब्लेमचा अभ्यास करून NEFT, RTGS या ऑनलाईन पेमेंट सुविधांना लागू होण्याची शक्यता आहे. लवकरच RBI द्वारे त्याबद्दलची घोषणा केली जाऊ शकते.


UPI पेमेंट मध्ये 10 बदल हे सर्व १ जानेवारी २०२४ पासून UPI पेमेंटन्स मध्ये RBI द्वारे लागू करण्यात आले आहे. हे सर्व बदल आपल्याला ग्राहक म्हणून किती फायदा आणि किती तोटा होतो हे वापरल्यावरच समजू शकते. पण तुम्हाला हि माहिती कशी वाटली या होणाऱ्या बद्दल तुम्हाला काय वाटत आम्हाला कमेंट करून सांगा.

धन्यवाद..!!

Leave a Comment