प्रत्येक अपंग व्यक्तीकडे हे कार्ड असलेच पाहिजे, UDID Card – अपंग प्रमाणपत्र – दिव्यांग कार्ड – 2024-25 Complete Right Information

नमस्कार मिंत्रानो, आज आपण UDID Card – अपंग प्रमाणपत्र – दिव्यांग कार्ड – या बद्दल सविस्तर माहिती, घेणार आहोत.

Unique Disability ID ( स्वालंबन / UDID Card )  काय आहे ? What is UDID Card In Marathi ?

भारत सरकार ने दिव्यांग व्यक्तींसाठी संपूर्ण देशामध्ये एक संगणकीय प्रणाली विकसीत केली आहे, या प्रणाली द्वारे भारत सरकार दिव्याग ( अपंग ) व्यक्तीला online पद्धतीने एक युनिक सर्टिफिकेट कार्ड प्रदान करते.

अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र :-

देशातील दिव्यांग व्यक्तीसाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे आणि देशातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना एक अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र देणे या उद्धेशाने “अपंग व्यक्तींसाठी अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र” प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प दिव्यांगाना केवळ सरकारी योजनेचा लाभाची खात्री देत नाही तर पारदर्शकता, कार्यक्षमता व सार्वत्रिकतेचीही खात्री देतो.

अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र हा प्रकल्प गाव स्तर, ब्लॉक स्तर, जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तरावरील अंमलबजावणीच्या सर्व स्तरांवर लाभार्थीच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे निरीक्षण सुव्यवस्थित करण्यात देखील प्रकल्प मदत करतो.

UDID Card चे फायदे ?

👉 अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे वेगवेगळे कागदपत्रे तयार करणे किंवा जवळ वागवण्याचे आवश्यकता नाही, कारण UDID Card धारकाचा सर्व तपशील कार्ड मध्ये डीकोड केले जाऊ शकतात.

👉 भविष्यातील शासकीय योजने लाभ या कार्डाद्वारे घेता येऊ शकेल, अपंग सत्यापनासाठी हे एकच कार्ड सर्व ठिकाणी मान्य असेल.  

👉 युडी आडी Card द्वारे मिळणार पहिला फायदा वैशिष्ट प्रकारची विद्यार्थी स्कॉलरशिप. 

👉 दुसरा फायदा जे दिव्यांग व्यक्तीला इन्कम टॅक्स मध्ये काहीकलमांतर्गत सवलत दिली जाते. पण हि सवलत अपंगत्वाचे टक्केवारी नुसार दिली जाते, समजा एखाद्या दिव्यांगाची अपंगत्व टक्केवारी हि १९ ते ४० टक्के असेल तर त्याला इन्कम टॅक्स मध्ये ७५ हजार रु. प्रर्यंत सवलत मिळते, तसेच ८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीला १ लाख रु. पर्यंत सूट मिळते.

👉 तिसरा फायदा, सरकार तर्फे चार टक्के सरकारी नोकरीत राखीव आरक्षण मिळते.

👉 चोथा फायदा, दिव्यांगाना स्वतचा नवीन उद्योग किवा व्यवसाय सुरु करण्यासाठी NHFDC (National Handicapped Castes Finance & Development Corporations) या बँक कडून बिझनेस लोन दिले जाणार आहे.

👉 पाचवा फायदा, युडी आयडी कार्ड मुळे फ्री प्रवास पास तसेच प्रवासामध्ये डिस्काऊंटचा लाभ मिळतो, तसेच मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत मिळते.

👉 सहावा फायदा, बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना बेरोजारी भत्ता मिळतो. याचबरोबर सरकारने ठरवलेली बेरोजगार रक्कम ठराविक कालावधीने आपणास बेरोजगार भत्यास आपणास प्रप्त होते.

👉 नवीन कार किंवा टूव्हीलर खरेदी करतांना माँडिफिकेशन दरम्यान किमान १८ टक्के पर्यंत डिस्काउंट प्राप्त होतो.

👉 प्रदेशात जाण्यासाठी एअर इंडियाच्या वतीने प्रवासखर्चात ५०% पर्यंत विशेष सूट मिळते.

👉 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दिव्यांगाना राहण्यासाठी मोफत घरकुल योजना मिळते.

👉 विवाह करण्यासाठी राज्यानुसार सरकारमार्फत ठराविक रक्कम दिली जाते.

👉 त्याचबरोबर सरकार चालवत असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, कौशल्य प्रधानमंत्री जीवन जीवन ज्योती बिमा योजना, मनरेगा, लेबर कार्ड, अटल पेन्शन योजना, ई श्रम कार्ड ई. योजनेचा युडी आयडी मुळे डायरेक्ट लाभ मिळतो.

👉 राजीव गांधी फाउंडेशन मार्फत फ्री मध्ये दिव्यांगाना स्कुटी वितरीत केल्या जातात, या साठी आपल्याला अर्ज करवा लागतो.

👉 सरकार मार्फत आयोजित एखाद्या मोठ्या कार्यक्रमादरम्यान सरकार अपंगाला सायकल प्रदान करते असते, ज्यात इलेक्ट्रिक सायकलीसाठी 75 टक्के पर्यंत अनुदान सरकार देत असते.

UDID Card साठी अर्ज कोण करू शकतो व अर्ज कुठे करावा ?

👉 UDID Card साठी  पूर्ण/आंशिक अपंगत्व असलेला कोणताही नागरिक अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासठी तुम्ही https://www.swavlambancard.gov.in/ या वेबसाईट वरतून किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्र / CSC सेंटर मध्ये जाऊन सुद्धा online अर्ज करू शकतात.

यु डी आय डी कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पात्रतेच्या अटी कोणत्या आहे ?

👉 अर्जदार हा भारताचा दीर्घकालीन नागरिक असावा.

👉 अर्जदार अपंग ( दिव्यांग ) असावा.

👉 आधार कार्ड

👉 उत्पन दाखला

👉 रहिवाशी दाखला

👉 जातीचा दाखला

👉 पासपोर्ट फोटो

👉 मो. नंबर व ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.

UDID Card किती अंकी असतो ?

👉 दिव्यांग व्यक्तीस ओळख म्हणून एक युनिक क्रमांक दिला जातो, ज्यात पहिले २ अक्षर राज्य कोड, त्यानंतरचे २ अक्षर जिल्हा कोड, त्यानंतर १ अक्षर सीएमओ कोड, त्यानंतर २ अक्षर दिव्यांग कोड, त्यांतरचे ४ अंक दिव्यांग व्यक्तीचे जन्म वर्ष, त्यानंतरचे ६ अक्षरअंक हे रनिंग नंबर साठी व शेवटचा १ चेक राशी करता आहे, जो सुरक्षा कारणामुळे समाविष्ठ केला आहे, असे मिळून युडीआईडी युनिक क्रमांक ( कार्ड नंबर ) हा १८ अंकी असतो.

UDID Card ची वैधत किती कालावधीसाठी असते ?

👉 UDID Card ची वैधता हि दोन प्रकारची असते.

  1. कायमस्वरूपी UDID Card      
  2. तात्पुता UDID Card

कायम स्वरूपी UDID Card :-

ज्या अपंग व्यक्तीची अपंगत्वात कोणतीही प्रगती किवा प्रतीगमन होत नाही हे लक्षात घेऊन सक्षम वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी UDID Card जारी करते.

तात्पुता UDID Card :-

ज्या अपंग व्यक्तीची अपंगत्वात कोणतीही प्रगती किवा प्रतीगमन लक्षात घेऊन सक्षम वैद्यकीय अधिकरी तात्पुरते UDID Card जारी करते.

UDID Card बनवण्याची प्रकिया (Flowchart) कशी आहे ?

👉 जर दिव्यांगाला स्तानिक प्रशासनाने अपंगत्व कार्ड प्रदान केले असेल किंवा ते फार जुने असेल तर अश्यावेळेस ते कार्ड युडीआडी पोर्टल च्या माध्यमातून नवीन किंवा नूतनीकरण करण्यासाठी Online अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

👉 Online अर्ज सादर केल्यानंतर, दिव्यांग ज्या जिल्ह्यात राहतो, त्या जिल्ह्याच्या अधिसूचित मुख्य वैद्यकीय अधिकारी ( CMO ) किवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी ( DMO ) यांच्याकडे अर्ज पोहोचतो.

👉 सदर अर्जाची पळताणी झाल्यानंतर, CMO/DMO हे दिव्यांगाच्या सत्यता तपासणीसाठी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती विशिष्ठ तारखेला करतात.

👉 दिव्यंगाचा सत्यता तपासणी अहवाल वैद्यकीय मंडळाला सादर करतात.

👉 वैद्यकीय मंडळ अहवाल सादर करतांना अपंगत्वाची टक्केवारी आणि अपंगत्वाचे प्रकार, अपंगत्व प्रमाणपत्राची वैधता अश्या इतर समस्यांवर निर्णय घेते. वैद्यकीय मंडळ आपला निर्णय संबधित CMO/DMO ला कळवतो.

👉 सीएमओ/डीएमओ हे वेद्यकीय मंडळाने भरलेल्या मुल्यांकनाच्या तपशीलांच्या आधारे, युडीआयडी कार्डसाठी मंजुरी देऊन स्पीड पोस्टद्वारे UDID Card दिव्यांग्यच्या पत्तावर पाठवले जाते.

अश्या प्रकारे दिव्यांगाला कार्ड प्राप्त होते.  

संपर्क माहिती :-

  • Room No. 517, B-2 Block, Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003 (India)
  • 91-93549-39703
  • 91-11-2436 5019
  • disability-udid@gov.in
UDID Card In Marathi
कार्डUDID
लाभार्थीअपंग व्यक्ती
विभागसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
प्रमाणपत्र डाउनलोडयेथे क्लिक करा
कार्ड हरवलेयेथे क्लिक करा
अर्ज  स्तिथीयेथे क्लिक करा
हेप्ललाईन नंबर91-93549-39703 / 91-11-2436 5019  
मैल आयडीdisability-udid@gov.in
श्रेणीभारत सरकार

निष्कर्ष :-

मित्रांनो, या लेख मध्ये आम्ही तुम्हाला युडी आयडी/ स्वालंब/ दिव्यांग कार्ड  या योजने बद्दल महिती दिली आहे. नक्की तुम्हाला हि माहिती  उपयोगी पडेल, मला आशा आहे कि हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल व या योजनेची माहिती शेअर करून गरजू दिव्यांग लोकांन पर्यंत पोचवाल.

धन्यवाद .. 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. UDID Card कसे मिळेल ?

👉 UDID Card ला मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्ही दिलेल्या पत्यावर UDID कार्ड तुम्हाला स्पीड पोस्ट ने प्राप्त होईल.

2. UDID कार्डला मजुरी मिळाल्यानंतर, स्पीड पोस्ट ट्रेकिंग नंबर SMS द्वारे मोबाईल नंबरवर प्राप्त होतो का ?

👉 नाही, तुम्हाला युडीआयडी पोर्टलवर लॉगीन करून स्पीड पोस्ट ट्रेकिंग नंबर प्राप्त होईल.

3. माझे UDID Card हरवले आहे परत कसे मिळवावे ?

👉 युडीआईडी पोर्टल द्वारे “ लॉस्ट युडीआईडी कार्ड ” साठी अर्ज सादर करू शकतात. लॉस्ट युडीआईडी Card “ साठी अर्ज सादर करण्यसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment