Solar Favarni Pump 2025 : सौरचलीत फवारणी पंप, असा करा अर्ज

Solar Favarni Pump : नमस्कार शेतकरी मित्रांणो, मागच्या वेळी म्हणजे 2024 मध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजनेमध्ये तुमचा नंबर लागला नाही ? किंवा तुम्ही फवारणी पंपासाठी तुम्ही अर्ज करू शकले नाही ? तर काय झाले 2025 मध्ये सौरचलीत फवारणी पंप आहे ना, त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरु आहे ? परंतु सौरचलीत फवारणी पंपा साठी अर्ज कसा करावा ? त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतील ? या बद्दलची संपूर्ण माहिती, या लेखाच्या माध्यमातून बघू या.

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप नंतर सौरचलीत फवारणी पंप वाटप :-

खरीप हंगाम 2024 मध्ये राज्य शासना मार्फत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वाटप करण्यात आले होते. सदर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शेतकऱ्यांना 100% अनुदानावर लॉटरी पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले. सदर बाब हि महा-डीबिटी पोर्टलवर एक वेगळ्या पद्धतीने राबविण्यात आली होती.

त्यानंतर आता, सन 2025 मध्ये कृषी विभागामार्फत 50% ते 40%अनुदानावर सौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप वाटप करण्यात येणार आहे, अशी सर्वत्र चर्चा चालू आहे. परंतु सदर सौरचलीत फवारणी पंप हि बाब महा-डीबीटी पोर्टलवर आधी पासून समाविष्ट आहे. प्रथम जो शेतकरी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाकरीता अर्ज करील त्या शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य देऊन लाभ दिला जाईल.

शासनाच्या आता पर्यंतच्या गायडलाईन बघता योजनेसाठी शासनामार्फत 50% ते 100% च्या दरम्यान अनुदान दिल्या जाते. सदर फवारणी पंप, कोणत्या पद्धतीने वाटप करण्यात येईल ? तसेच या बद्दल अजून कुठलीही शासकीय गायडलाईन्स सध्या तरी आली नाही. याबाबतची शासकीय गायडलाईन्स किंवा नवीन अपडेट आल्यास आपणास कळविण्यात येईल. त्यासाठी आपला 👉 Marathibaba WhatsApp Group 👈 जॉईन करा.


सौर चलीत फवारणी पंपा करीता कोणत्या शेतकऱ्यास किती अनुदान मिळेल ?

  • लहान/ सीमान्त / महिला / SC / ST शेतकरी यांना 50% किंवा जास्तीत जास्त 1800 रु. पर्यन्त अनुदान दिल्या जाईल.
  • इतर शेतकऱ्यांना 40% किंवा जास्तीत जास्त 1500 रु. पर्यन्त अनुदान दिल्या जाईल.

स्वावलंबन योजना ( नवीन विहीर, जुनी विहीर ) प्रधानमंत्री किसान मानधन योजना ( 3000 रु. प्रती महा )

Solar Favarni Pump पात्रता :-

✅अर्जदाराकडे फार्मर आयडी ( शेतकरी कार्ड ) असणे गरजेचे आहे.

✅ अर्जदाराकडे स्वत:च्या नावावर शेत जमीन असावी.

✅ अर्जदार शेतकऱ्याने या पूर्वी महा डीबिटी द्वारे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेतला नसावा.

✅ शेतकऱ्याने या पूर्वी फवारणी पंप योजनेसाठी अनुदान घेतले नसावे.


सौरचलीत फवारणी पंप योजनेचे कागदपत्रे :-

✅ आधार कार्ड

✅ 7-12 उतारा व 8-अ उतारा

✅ जमिनीचा दाखल ( लागू असल्यास )

✅ मोबाईल नंबर

✅ पॅन कार्ड (असेल तर )


महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी नोंदणी  :-

1. सर्व प्रथम शेतकऱ्याला Agri Stack च्या संकेतस्थळावरुण फार्मर आयडी काढावा लागेल. फार्मर आयडी काढण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

2. जर तुमच्याकडे आधी पासून फार्मर आयडी असेल तर, पुन्हा काढण्याची गरज नाही. अश्या शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आयडी क्रमांक टाकून महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे. लॉगीन करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

3. लॉगीन केल्यानंतर, शेतकऱ्याने वैयक्तिक माहिती, पत्ता व शेतजमिनीचा तपशील भरून प्रोफाईल पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांची प्रोफाईल पूर्ण असेल त्यांना पुन्हा नोंदणी करायची गरज नाही.


असा करा अर्ज, सौरचलीत फवारणी पंप योजनेसाठी  :-

स्टेप 1 :- अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम शेतकऱ्याने mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या बेबसाईटवर जाऊन लॉगीन करून 👉 अर्ज करा या बटनावर क्लिक करावे.

Maha DBT
Maha DBT

स्टेप 2 :- त्यानंतर खाली सांगितल्या प्रमाणे कृषी यांत्रिकीरण या पर्यायावरील 👉 बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.

स्टेप 3 :- त्यानंतर, खालील 👇 बाबी निवडा

1मुख्य घटककृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य
2तपशीलमनुष्यचलित औजारे
3यंत्र सामग्री, अवजारे / उपकरणे  पिक संरक्षण औजारे
4मशीनचा प्रकार सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप

सर्व बाबी निवडल्या नंतर खाली दिलेल्या चेक्स बॉक्स वर मार्क करावे व 👉 जतन करा या बटनावर क्लिक करावे. त्यांतर 👉 मेन्यू वर जा या बटनावर क्लिक करा.

Saurchalit Knapsack Favani Pump

( टीप :- जर तुम्ही या आधी बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी अर्ज केला असेल तर, सर्व प्रथम तो अर्ज => मी अर्ज केलेल्या बाबी मधून अर्ज रद्द करावा लागेल तरच तुम्ही सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करू शकाल. )

स्टेप 4 :- त्यानंतर 👉 अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

स्टेप 5 :- त्यानंतर, खाली सांगितल्या प्रमाणे 👉 पहा या बटनावर क्लिक करून प्राधान्य क्रमांक निवडून 👉 अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे.

स्टेप 6 :– त्यानंतर तुम्हाला अर्ज फी म्हणून 23 रुपये 60 पैसे एवढे शुल्क भरावे लागेल.

स्टेप 7 :- शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रत आपणास प्राप्त होईल. अश्या प्रकारे तुम्ही सौरचलीत फवारणी पंपासाठी अर्ज करू शकतात.

Solar Favarni Pump – 2025
योजनेचे नावसौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप
सरकारमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभसौरचलीत फवारणी पंप ( 40% ते 50% अनुदान )
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
वेबसाईट येथे क्लिक करा
श्रेणीराज्य सरकार योजना
विभागकृषी विभाग
हेल्पलाईन नंबर022 6131 6429

सौरचलीत फवारणी पंप योजने बद्दल माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल, हि माहिती जास्तीत जास्त शेअर करून इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा, जेणेकरून या योजनेचा त्यांना पण लाभ घेता येईल.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. सौरचलीत फवारणी पंप साठी अर्ज कुठे करावा ?

👉 https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या वेबसाईट वरून शेतकऱ्याला सौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप या योजनेसाठी अर्ज करता येईल.

2. या तालुक्यातील घटकाला आधीच अर्ज केला आहे, अर्ज जतन करण्यावेळी असा error येत आहे काय करावे लागेल ?

👉 एका घटकासाठी एकच अर्ज करता येतो. जर तुम्ही या आधी बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी अर्ज केला असेल तर, सर्व प्रथम तो अर्ज तुम्हाला=> मी अर्ज केलेल्या बाबी मधून अर्ज रद्द करावा लागेल तरच तुम्ही सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करू शकाल.

Leave a Comment