Ration Card KYC Update : रेशनकार्ड हे आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणे एक महत्वाचे दस्तावेज आहे. भारत देशामध्ये अंदाजे दोन तृतीयांश म्हणजेच 80.06 करोड एवढ्या लोकांकडे रेशनकार्ड आहे.
रेशनकार्डचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. पिवळ, केशरी आणि पांढर रेशनकार्ड. त्यापैकी पिवळे आणि केशरी तुम्हाला माहितच असेल की रेशनकार्ड धारकांना मोफतमध्ये किंवा परवडणाऱ्या किमतींमध्ये अन्नधान्य शासनामार्फत देण्यात येते. परंतु आता शासना मार्फत रेशनकार्ड संदर्भात एक नवीन अपडेट आले आहे. या अपडेट मध्ये सर्व रेशनकार्ड लाभधारकांना ई केवासी करणे आवश्यक आहे. जे रेशनकार्ड लाभधारक ई-केवासी करणार नाहीत, त्यांचे राशन धान्य भविष्यामध्ये पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. Ration Card eKYC in marathi
अभा कार्डचे फायदे ? अभा कार्ड कसे बनवायचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना Whatapp Group Joinभारत सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी E-KYC करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर अजून पर्यंत रेशनकार्डची E-KYC केली नसेल तर, तुमचे नाव रेशनकार्ड मधून नाव कट केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रेशनकार्डची ई केवासी पूर्ण करून घ्या. रेशनकार्डची KYC घरबसल्या मोबाईलवरून कशी करावी ? या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखाच्या माध्यमातून.
रेशनकार्ड E-KYC काय आहे ? Ration Card eKYC in Marathi
रेशनकार्ड E-KYC अशी प्रकिया आहे, ज्या मध्ये आधार कार्डचा वापर करून रेशनकार्ड लाभधारकाची माहिती व्हेरीफाय केली जाते. त्या माहितीमध्ये लाभार्थ्याची ओळख, पत्ता तसेच लाभार्थी हयात आहे की नाही व अन्य माहिती ऑनलाईन पद्धतीने सत्यापित केली जाते. या प्रोसेसला रेशनकार्ड ई-केवासी म्हणतात.
शासनाने रेशनकार्ड E-KYC का अनिवार्य केली ? Ration Card KYC Update
रेशनकार्डचा गैरवापर टाळण्यासाठी तसेच बोगस लाभार्थींना वगळण्यासाठी, तसेच पात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी E-KYC करणे गरजेचे आहे.
1. बोगस किंवा डुप्लिकेट रेशनकार्ड कार्ड रोखण्यासाठी :-
E-KYC मुळे बनावट किंवा डुप्लिकेट कार्ड बनवता येत नाही. त्यामुळे याचा थेट फायदा सरकारला होतोय.
2. पात्र लाभार्थ्यानाचा रेशनकार्डवर लाभ मिळण्यासाठी :-
एखादी मृत व्यक्ती किंवा अपात्र व्यक्तींची ओळख पटवण्यास तसेच त्याचे नाव रेशनकार्ड मधून वगळण्यासाठी E-KYC शासनासाठी लाभदायक ठरते.
3. भारत सरकारला रेशनकार्ड धारकांची अचूक माहिती मिळण्यासाठी :-
E-KYC केल्यामुळे भारत सरकारला लाभार्थ्यांची अचूक माहीती, तसेच अचूक आकडेवारी मिळते.
रेशनकार्डची KYC करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील ?
- रेशनकार्ड
- आधार कार्ड व आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर
Ration Card KYC Maharashtra
अशी करा रेशनकार्डची ऑनलाईन ई-केवायसी :- Ration Card KYC Maharashtra
1. रेशनकार्डची eKYC करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Mera eKYC हे अप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
2. त्यानंतर तुम्हाला AadhaarFace RD हे अप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. | Ration Card KYC Maharashtra

3. त्यानंतर तुम्हाला मेरा eKYC हे अप्लिकेशन ओपन करावे लागेल.
4. त्यानंतर विचारल्याप्रमाणे तुमचे राज्य निवडावे व VERIFY Location या बटनावर क्लिक करावे. लक्षात असू द्या VERIFY Location या बटनावर क्लिक करण्याअगोदर तुमच्या मोबाईल मधील GPS Location चालू असणे आवश्यक आहे.
5. त्यानंतर ज्यांची केवासी करायची आहे, त्यांचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा व Generate OTP या बटनावर क्लिक करावे.
6. त्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल वर सहा अंकी OTP जाईल, तो OTP टाकावा. त्यानंतर कॅप्चा कोड भरा व SUBMIT या बटनावर क्लिक करा.

7. त्यानंतर तुमच्या समोर तुमची माहिती येईल, या माहितीमध्ये सर्वात शेवटी, तुम्हाला तुमचे eKYC Status दाखवेल.
8. जर तुमचे eKYC Status “ Y ” अस दाखवत असेल तर समजा की तुमची रेशनकार्डची ई केवासी झालेली आहे. तुम्हाला केवायसी करण्याची गरज नाही.
9. जर तुमचे eKYC Status “ N ” अस असेल तर तुम्हाला eKYC करणे गरजेचे आहे.
10. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या FACE eKYC या बटनावर क्लिक करून, ACCEPT करावे.
11. त्यानंतर ज्यांची eKYC करायची आहे त्यांचे विचारल्या प्रमाणे FACE Detected करायचे आहे. FACE Detected करण्यासाठी कॅमेरा चेहऱ्यासमोर आणावा, त्यानंतर तुम्हाला ग्रीन कलर मध्ये इंडिकेटर येईल. त्यानंतर तुम्हाला लगेच तुमचे डोळे मिटवायचे आणि उघडायचे आहे. त्यानंतर तुमची रेशनकार्डची eKYC पूर्ण होईल.
अश्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाची घरबसल्या मोबाईलवरून रेशनकार्डची eKYC पूर्ण करू शकता.
Ration Card KYC Update | |
Mera eKYC App | येथे क्लिक करा |
AadhaarFace RD | येथे क्लिक करा |
अशी करा रेशनकार्डची ऑफलाईन ई-केवायसी :-
जर तुमची ऑनलाईन ई-केवायसी होत नसेल किंवा इतर कारणामुळे तुम्हाला eKYC करता येत नसेल. तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्वस्थ धान्य दुकानदारांमार्फत तुमची ई केवायसी करू शकतात.
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न :-
1. रेशन कार्डची e KYC न केल्यास काय होईल ?
रेशन कार्डची eKYC न केल्यास भविष्यात तुमचे राशन धान्य बंद होईल.
2. रेशन कार्डची e KYC कुणी करावी ?
कुटुंबातील सर्व सदस्यांना रेशनकार्डची KYC करणे गरजेचे आहे.
3. रेशनकार्डची ई केवासी घरबसल्या मोबाईल वरून करता येईल का ?
हो, त्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये Mera eKYC App व AadhaarFace RD हे अॅप प्लेस्टोअर वरतून डाउनलोड करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही Mera eKYC App चा माध्यमातून रेशनकार्डची KYC घरबसल्या मोबाईल वरून करू शकतात.