Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0 : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0, PMKVY 4.0 – 2024

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0:- नमस्कार मिंत्रानो, आज आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 ( PMKVY 4.0 ) या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.

दिवसेंदिवस भारत देशाची लोकसंख्या वाढत चाललीय, वाढत्या लोकसंख्यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने तरुणांनसाठी “ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना “ आमलात आणली.

Table of Contents

विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेस करण्याची संधी :-

प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्वत:च्या करिअर बद्दल चिंता लागले असते, शिक्षणासाठी लागणारा खर्च व कुटुंबिक परिस्थिती बघता भरपूर प्रमाणात मुले इयत्ता दहावी किंवा बारावी पास झाल्यानंतर शिक्षण सोडून देतात. व मोल मजुरी करायला लागतात. त्यामुळे त्यांच्या करिअरला येथेच फुल स्टॉप लागतो. परंतु आश्या विद्यार्थ्यांना आता चिंता करण्याची गरज नाही. कारण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना – ४.० द्वारे शासन विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेस करण्याची संधी देत आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बद्दल थोडक्यात माहिती :-

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जुलै 2015 पासून शासन तरुणांनसाठी राबत असून, या आधी सन 2015 मध्ये PMKVY 1.0, 2016 मध्ये PMKVY 2.0 आणि 2020 मध्ये PMKVY 3.0 योजना शासनामार्फत राबवण्यात आली, परंतु शासनामार्फत PMKVY 1.0, 2.0, 3.0 चे रजिस्ट्रेशन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

PMKVY Year Wise Flowchart

PMKVY 4.0 योजनेचे रजिस्ट्रेशन चालू आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांना कौशल्य देण्यात येणार आहे.

सदर योजना हि योजना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ( MSDE ), राष्ट्रीय कौशल्य विकास निगम ( NSDC ) द्वारे चालवण्यात येते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात, पुढील काही वर्षांमध्ये लाखो विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० योजनेची घोषणा केली. प्रधानमंत्री कोशल्य विकास योजना हि एक भारत सरकारची महत्वपूर्ण योजना असून देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :-

१. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा १० वी किंवा १२ वी किंवा कॉलेज मधील शिक्षण सोडून दिलेला तरुण.
२. विद्यार्थ्याचे कमीत कमी वय हे १५ वर्ष असणे गरजेचे आहे.
३. जास्तीत जास्त वय ४३ वर्ष
४. भारतातील तरून

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना का सुरु केली ?

देशातील वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनाची सुरवात केली. जर कोणत्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये आर्थिक किंवा इतर कोणता प्रॉब्लेम असेल तर तो या योजनेमार्फत फ्री मध्ये कोर्स करून स्वत: चे करिअर घडवू शकतो. सदर कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाणार. या प्रमाणपत्रा आधारे विद्यार्थी नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 : अर्ज कसा करायचा :-

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
नोंदणी करण्यासाठी तुमच्या कडे खालील कागदपत्रे असावे.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक खाते
  4. मोबाईल नंबर
  5. ईमेल आयडी
  6. शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र

👉 नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

👉 त्यानंतर तुमच्या समोर Skill India ची वेबसाईट ओपन होईल, त्या वेबसाईटवरील REGISTER या बटनावर क्लिक करून तुम्ही PMKVY 4.0 साठी नोंदणी करू शकतात.

👉 तुम्ही ऑनलाईन किंवा काही कोर्सेस ऑफलाईन पद्धतीने करू शकतात.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0  डायरेक्ट लिंक :-

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
मोफत कोर्सेसयेथे क्लिक करा
ट्रेनिंग सेंटरयेथे क्लिक करा
मोफत पुस्तकेयेथे क्लिक करा
Important Links of PMKVY 4.0

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना मध्ये कोणकोणते कोर्सेस आहे ?

प्रधानमंत्री कोशल्य विकास योजनेमध्ये नव्याने जोडले जाणारे कोर्सेस :- कोडींग, AI, रोबोटिक्स, आइओटी, 3D प्रिंटींग, ड्रोन आणि सॉफ्ट स्कील्स सारखे उद्योग 4.0 मध्ये नव्याने कोर्सेस जोडले जाणार आहे.
कंस्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेयर, फूड प्रोसेसिंग, फर्नीचर आणि फिटिंग, हैंडीक्राफ्ट, ज्वेलरी लेदर टेक्नोलॉजी सह ४० क्षेत्रामधील ट्रेनिंग कोर्स फ्री मध्ये करू शकतात.

योजनेचे उद्दिष्ट :-  Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 4.0     

👉 तरुणांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन कौशल्य विकासाला प्रोत्साहित करणे आणि प्रोत्साहन देणे होय.

👉 देशातील तरुणांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा.

👉 देशातील सर्व तरुणांना संघटीत करून, त्यांच्या कौशल्यांना विकसीत करून त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा.

👉 तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनच्या फायदा घेऊन, तरुणांना कौशल्य विकसीत करण्याची प्रक्रिया सुलभ करणे.

👉 उद्योग – संबधित कौशल्यांवर भर देऊन प्रशिक्षण देणे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0
योजनाप्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0
श्रेणीकेंद्र सरकार
वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज प्रक्रियाऑनलाईन / ऑफलाईन
कमीत कमी वय१५ वर्ष
वय मर्यादा१५ – ४३ वर्ष
लाभार्थीदेशातील तरून
हेल्पलाईन नंबर88 0005 5555

निष्कर्ष :-

मित्रांनो, आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० (PMKVY 4.0 ) बद्दल पूर्ण माहिती दिली. आम्हाला आशा आहे कि आमच्या द्वारे दिलेली माहिती नक्की तुम्हाला उपयोगी पडेल. वरील माहिती प्रमाणे तुम्ही या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करून तुमच्या कौशल्यात भर पडून तुम्ही एका चांगल्या कंपनीत जॉब मिळवू शकतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केव्हापासून सुरु झाली ?

👉 जुलै २०१५ पासून योजनेची सुरवात झाली असून सध्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० साठी नोंदणी चालू आहे.

2. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० ची नोंदणी कुठे करायची ?

👉 स्किल इंडिया अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० साठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

3. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत जॉब प्लेसमेंट कशी होईल ?

👉 ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर संबधित संस्थाद्वारे कमीत कमी ७५ % विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंट दिली जाईल.

4. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत अभ्यासक्रमात शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र मिळेल का ?

👉 अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तरुणांना सुमारे ८००० रु बक्षीस म्हणून दिल्या जाईल व अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट दिल्या जाईल. यामध्ये कोर्सेस कालावधी ३ महिने, ६ महिने आणि एक वर्षेसाठी आहे.

Leave a Comment