Pradhan mantri Ujjwala Yojna In Marathi :- नमस्कार मिंत्रानो, तुम्हाला माहित असेलच भारत सरकार देशातील गोर गरिबांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात, त्यापैकी एक योजना “प्रधानमंत्री उज्वला योजना” , या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री उज्वला योजना सुरवात :-
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी “ स्वच्छ ईंधन, बेहतर जीवन ” असा नारा देऊन दिनांक १ मे २०१६ साली महिलांसाठी “प्रधानमंत्री उज्वला योजना” (PMUY) ची सुरवात केली.
ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ ईंधन पुरवणे, तसेच धूरमुक्त ग्रामीण भारत या योजनेची मुख्य संकल्पना आहे. या योजने अंतर्गत बीपीएल कार्डधार महिलांना मोफत गॅस सिलेंडर सरकार मार्फत मिळते. सोबत सरकार प्रति सिलेंडरवर सबसिडी देते.
योजनेसाठी पात्रात काय आहे ? Pradhan mantri Ujjwala Yojna In Marathi :-
👉 अर्जदार महिला असणे गरजेचे.
👉 अर्जदारचे वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.
👉 अर्जदाराकडे BPL (दारिद्र रेषेखालील )शिधापत्रिका असावी किंवा अर्जदार डोंगरी भागातील असेल तर लाभ घेऊ शकतो.
👉 अर्जदाराच्या नावावर किंवा कुटुबांतील इतर सदस्याच्या नावे आधीपासून LPG कनेक्शन नसावे.
स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाची गरज :-
बऱ्याच ग्रामीण भागातील घरांमध्ये, लाकूड, पिकांचे अवशेष, शेणाच्या गोवऱ्या स्वयंपाकासाठी वापरले जातात. यामुळे घरातील हवेत धूर किंवा प्रदूषनाचे प्रमाण घरात वाढते, त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात, विशेषता करून महिला आणि मुलांमध्ये या आरोग्य समस्या उद्भवतात.
वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या ( WHO ) नुसार, धुरामुळे घरातील हवेमध्ये सतत बदल झाल्यामुळे आजार तसेच अकाली मृत्यू च्या समस्या दिर्घकाळानंतर आजार उद्भवतात, ज्यात श्वसन रोग आणि कमी वजन होणे या आजाराचा समावेश असतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी निकड ओळखून, भारत सरकारने ग्रामीण भागातील महिलेला स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाची गरज ओळखून, प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरवात केली.
आरोग्य लाभ :-
प्रधानमंत्री उज्वल योजने मुळे घरातील वायू प्रदूषणात घट झाल्यामुळे घरतील परीवाला धुरापासून सुटका मिळाली व याचा फायदा त्यांना त्यांच्या आरोग्यावर झाला.
आव्हाने आणि पुढे जाण्याचा मार्ग :-
उज्वला योजने मुळे गरीब कुटुंबामध्ये लक्षणीय प्रगती झाली असता काही आव्हाने आहेत ज्यांचा सामना करणे आवश्यक आहे. या मध्ये नियमित एलपीजी रिफील करणे, गरीब कुटुंबाना एलपीजी सिलेंडर वापरण्यास प्रोत्साहन देणे.
शेवटी, प्रधानमंत्री उज्वला योजना हा एक उपक्रम आहे ज्यामुळे लाखो महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवून त्यांच्या कुटुंबावर सखारात्म परिणाम झालेला आहे. सरकारला या योजनेची पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी, योजनेमध्ये वेळेनुसार सुधारणा आणि योजनेचा विस्तार वाढवणे, शेवटी सरकारला योजने द्वारे ग्रामीण भागातील असंख्य कुटुंबांचे जीवन बदलणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना साठी अर्ज कसा करावा ?
👉 प्रधानमंत्री उज्वला योनेसाठी दारिद्र रेषेखालील कुटुंबातील कोणतीही महिला अर्ज करू शकते.
👉 या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येतो.
👉 जर तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने करत असाल तर तुम्हाला जवळच्या एलपीजी केंद्रात जावे लागेल, आणि जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर https://www.pmuy.gov.in/ujjwala2.html या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री उज्वला योजना साठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ?
👉 अर्जदारचे आधार कार्ड
👉 अर्जदाराचे बँक पासबुक
👉 शिधापत्रिका ( रेशन कार्ड )
👉 मोबाईल नंबर
👉 पासपोर्ट फोटो
👉 जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर KYC फॉर्म. KYC फॉर्म डाउनलोड करण्यासाठी https://www.pmuy.gov.in/documents/KYC.pdf
Pradhan mantri Ujjwala Yojna In Marathi | |
योजनेचे नाव | प्रधानमंत्री उज्वला योजना २.०. |
लाभार्थी | महिला |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑफलाईन KYC | येथे क्लिक करा |
अर्ज पद्धत | ऑफलाईन व ऑनलाईन |
हेल्पलाईन क्रमांक | १९०६ किंवा १८०० २३३३ ५५५ |
श्रेणी | भारत सरकार योजना |
निष्कर्ष :-
मित्रांनो, या लेख मध्ये आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजना बद्दल महिती दिली आहे. नक्की तुम्हाला हि माहिती उपयोगी पडेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही १९०६ किंवा १८०० २३३३ ५५५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात.
धन्यवाद ..
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-
1. प्रधानमंत्री उज्वल योजनेअंतर्गत कोणता लाभ मिळतो ?
👉 प्रधानमंत्री उज्वल योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलां मोफत गॅस कनेक्शन दिले जाते.
2. प्रधानमंत्री उज्वल योजने साठी कोण अर्ज करू शकतो ?
👉 १८ वर्ष पूर्ण असलेली गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
3. प्रधानमंत्री उज्वल योजनेची वेबसाईट कोणती आहे ?
4. प्रधानमंत्री उज्वल योजने साठी ऑफलाईन फॉर्म डाउनलोड कुठून करायचा ?
👉 https://www.pmuy.gov.in/documents/KYC.pdf या लिंक वरून ऑफलाईन KYC फॉर्म डाउनलोड करू शकतात.
5. प्रधानमंत्री उज्वल योजना कधी व कोणी सुरु केली ?
👉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये प्रधानमंत्री योजना सुरु केली.
6. प्रधानमंत्री उज्वल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो का ?
👉 हो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या CSC सेंटर मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात.
7. प्रधानमंत्री उज्वल योजनेसाठी ऑफलाईन अर्ज केला जाऊ शकतो का ?
👉 हो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात.
8. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा हेल्पलाई नंबर काय आहे?
👉 १८००-२६६-९९९६ या हेल्पलाईवर कॉल करून तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकतात.
9. प्रधानमंत्री योजनेसाठी कोणते रेशनकार्ड असायला हवे ?
👉 रेशनकार्ड हे केवळ लाभार्थीच्या कुटुंबाची ओळख पटवण्याच्या उद्देशाने असल्यामुळे एपिल किंवा बिपीएल या पैकी कोणतेही रेशनकार्ड ग्राह्य धरण्यात येते.
10. मी प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कोणते गॅस सिलेंडर निवडू शकतो ?
👉 अर्जदार १४.२ किलोचे सिंगल सिलेंडर किंवा ५ किलोचे सिंगल सिलेंडर किंवा ६ किलोचे डबल सिलेंडर कनेक्शन निवडू शकतो.