Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi :- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ( PMJJBY ) हि एक केंद्र शासनाची योजना होय. परुंतु ही योजना आहे तरी काय ? हि योजना कोणासाठी आहे ? या योजनेचा फायदा काय आहे ? योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ? चला तर बघू या लेखाच्या माध्यमातून.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हि भारत सरकारद्वारे सामान्य जनतेसाठी, गौर गरीब आणि आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या लोकांसाठी सुरु करण्यात आलेली योजना होय. दिनांक 9 मे 2015 मध्ये भारत सरकारद्वारे ( Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana in marathi ) हि योजना सुरु करण्यात आली.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे तरी काय ?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत लाभार्थ्याला दोन लाख रुपये लाईफ इन्शुरन्स विमा दिला जातो. या योजनेमध्ये सहभागी व्हयाचे असेल तर अर्जदाराला ठराविक वार्षिक रक्कम ( प्रिमियम ) भरावा लागतो.
सदर विमा पॉलीसी साठी अर्जदाराला वार्षिक प्रिमियम फक्त आणि फक्त ४३६ रु भरावे लागते. सदर रक्कम हि दरवर्षी अर्जदाराला भरावी लागते. जर लाभार्थ्याच्या बँक खात्यात प्रिमियम करता लागणारी रक्कम असेल तर, वार्षिक प्रिमियम रक्कम हि लाभार्थ्याच्या खात्यातून ऑटो डेबिट करण्यात येते. ऑटो डेबिट मुळे लाभार्थ्याला दर वर्षी योजनेसाठी प्रिमियम भरण्याचे टेन्शन नसते.
योजनेअंतर्गत दिला जाणारा विमा हा पॉलीसीधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा वारसांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते. या योजनेचा लाभ १८ ते ५५ वयगटातील व्यक्ती घेऊ शकतात. योजनेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदारांना आर्थिक मदत म्हणून दोन लाख रुपये मिळतात.
योजनेच्या पात्रता :- Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi
१. योजनेअंतर्गत सहभागी असलेल्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणे आवश्यक.
२. अर्जदाराचे वय १८ पूर्ण झालेले असावे.
३. अर्जदारचे कमीत कमी वय हे ५५ पेक्षा कमी असावे.
४. बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून योजनेसाठी लागणारा प्रिमियम ऑटोकट करण्याची अर्जदाराची संमती असावी. या मुळे योजनेसाठी लागणार प्रिमियम बँक खात्यातून कपात केला जातो.
विमा सरंक्षणाचे आश्वासन कधी संपते ( अपात्रता ) ?
१. अर्जदाराचे वय हे ५५ पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण होणार असेल.
२. अर्जदाराचे बँक किंवा पोस्ट ऑफिस मधील खाते बंद झाले असेल.
३. बँक खात्यात पुरेसी रक्कम नसेल.
४. एका पेक्षा अधिक बँक खात्यातून प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी अर्ज केला असेल.
५. प्रिमियम पेमेंटच्या तारखेला खात्यात पुरेसी रक्कम नसेल.
६. प्रिमियम न भरल्यामुळे योजनेतून बाहेर पडल्यास.
3000 रु प्रति महा शेतकरी योजना लेक लाडकी योजना
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-
१. आधार कार्ड
२. बँक पासबुक ( बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे )
३. मतदान कार्ड किंवा पॅण कार्ड
४. आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
५. पासपोर्ट फोटो
योजनेसाठी अर्ज कसा करावा ? How to Apply PMJJBY
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर, तुमच्याकडे मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही या योजेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.जर तुमच्या कडे इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने योजेसाठी अर्ज करू शकतात.
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जावे लागेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना साठी तुम्हला एक ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल.
ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ऑफलाईन अर्जासोबत जोडा व तुमच्या जवळच्या बँक शाखेत जमा करून तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मध्ये सहभागी होऊ शकतात.
PMJJBY PDF Form :-
योजनेचे फायदे :- Benefits of PMJJBY
योजने अंतर्गत पॉलीसी धारकाचा कोणत्याही प्रकारे म्हणजे नैसर्गिक किंवा अपघाती मूत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना आर्थिक मदत म्हणून 2,00,000 रुपये एवढी नुकसान भरपाई रक्कम मिळते.
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi | |
योजनेचे नाव | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना |
सरकार | केंद्र सरकार |
विभाग | वित्तीय सेवा विभाग |
योजनेची सुरवात | 9 मे 2015 |
लाभार्थी | देशातील सामान्य नागरिक |
आर्थिक लाभ | दोन लाख रु. |
योजनेचा वार्षिक प्रिमियम | 436 रु. |
वय मर्यादा | 18 ते 55 वर्ष |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वेबसाईट | https://www.jansuraksha.gov.in |
हेल्पलाईन नंबर | 1800 180 111 / 1800 110 001 |
श्रेणी | केंद्र सरकार योजना |
योजनेबद्दल सविस्तर माहिती :-
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने बद्दल तुम्हाला कुठे काही अडचण येत असेल तर तुम्ही केंद्र शासनाच्या १८०० १८० १११ या हेल्पलाईन नंबरवर फोन लावून मदत घेऊ शकतात. अथवा अधिक माहिती करिता https://www.jansuraksha.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन माहिती घेऊ शकतात.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-
1. प्रधानंमंत्री जीवन विमा योजनेची सुरवात कधी झाली ?
👉 भारत सरकारद्वारा ९ मे २०१५ रोजी योजनेची सुरवात करण्यात आली.
2. योजनेसाठी वार्षिक प्रिमियम किती आहे ? PMJJBY Yearly Premium ?
👉 436 रु.
3. योजनेसाठी वय मर्यादा किती आहे ?
👉 कमीतकमी १८ वर्ष व जास्तीत जास्त ५५ वर्ष
4. अर्जदाराचा मृत्यू झाल्यास पॅलिसी रक्कम कोणाला मिळणार ?
👉 अर्जदाराच्या वारसदारांना