नमस्कार मिंत्रानो, तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा ? व्यवसायासाठी भांडवल नाही ? चिंता करू नका PMEGP Loan – प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे ना ? चला तर या योजनेच्या पात्रता, कागदपत्रे, लाभ, योजनेसाठी नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती बघू या. ( PMEGP In Marathi )
योजनेबद्दल थोडक्यात माहिती :-
देशातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरु करता यावा, म्हणून सरकारने नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या तरुणांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना सुरु केली. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना या नावाने हि योजना सुरु करण्यात आली. थोडक्यात त्याला PMEGP म्हणतात.
प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) आणि ग्रामीण रोजगार निर्मिती (REGP) या दोन्ही योजनेना एकत्र करून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना शासनामार्फत तयार करण्यात आली. सदर योजना हि सन २०२६ पर्यंत चालू रहील अशी शासनामार्फत परवानगी दिली आहे.
PMGP Loan Information | |
व्याज दर | वेगवेळ्या बँक आणि लोन संस्थावर निर्भर असते |
वय मर्यदा | १८ पेक्षा जास्त |
प्रोजेक्टसाठी कर्ज मिळू शकते | मैन्युफैक्चरिंग युनिटसाठी ५० लाख रु |
सर्विसेस युनिटसाठी २० लाख रु | |
सबसिडी | १५ % ते ३५ % ( Categroy नुसार ) |
शेक्षणिक योग्यता | कमीत कमी ८ वी पास |
लाभार्थी | व्यवसाय चालक, संस्थान, सोसायटी, चैरीटेबल ट्रस्ट |
PMEGP Loan – Sponsoring Agency :-
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ( PMEGP Loan ) अंतर्गत लाभार्थ्याला कर्ज घ्यायचे असेल तर, योजने अंतर्गत चार प्रकारच्या स्पोंसर एजन्सी नेमण्यात आलेल्या आहेत. या स्पोंसर एजन्सी लाभार्याला कर्ज घेण्यासाठी मदत करतात.
- KVIC :- Khadi and Village Industries
- KVIB :- Khadi and Village Industries Board
- DIC :- District Industries Centers
- CORI BOARD
बिझनेस Category :-
KVIC, KVIB, DIC And Cori Board Agency अश्या बिझनेस एजन्सी असून त्यामधील काही महत्वाच्या बिझनेस कॅटेगिरीचे प्रकार बघू या.
- एग्रो बेस्ड फूड प्रोसेसिंग
- सिमेंट उत्पादन
- कोल्ड स्टोरेज & कोल्ड चेन सॉल्युशन
- डेअरी दुध उत्पादन
- केमिकल / पॉलिमर & मिनरल्स
- इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत अपकरण
- फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री
- कापड आणि पोशाख
- कागद आणि संबधित उत्पादन
- प्लास्टिक आणि संबधित सेवा
- सर्विस सेक्टर इंडस्ट्री
- फोरेस्ट इंडस्ट्री
- कचरा व्यवसस्थापन
- स्मॉल बिझनेस मॉडल
- हॉर्टिकल्चर – ऑर्गेनिक फार्मिंग
वरील सर्व कॅटेगिरी मध्ये एकूण २६७ व्यवसाय येतात.
PMEGP Loan योजनेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कर्ज दिल्या जाते.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत दोन प्रकारच्या व्यवसायांना कर्ज दिल्या जाते.
१. मैन्युफैक्चरिंग २. सर्विस
मैन्युफैक्चरिंग :-
- जिथे वस्तू बनवल्या जातात.
- अश्या व्यवसायांना जास्तीत जास्त ५० लाख रु पर्यंत दिल्या जाते.
- पहिले कर्ज फेडल्या नंतर जर तुम्हाला परत व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यास. दुसऱ्या वेळी जास्तीत जास्त वाढून १ करोड रु पर्यंत कर्ज दिल्या जाते.
सर्विस :-
- जिथे online सर्विस प्रदान केल्या जातात.
- अश्या व्यवसायांना २० लाख रुपयापर्यंत कर्ज दिल्या जाते.
- पहिले कर्ज फेडल्या नंतर जर तुम्हाला परत व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यास. दुसऱ्या वेळी जास्तीत जास्त वाढून ५० लाख रु पर्यंत कर्ज दिल्या जाते
लक्षात असू ध्या :- PMEGP Loan योजने अंतर्गत कर्ज हे फक्त नवीन बिझनेससाठीच मिळते.
कर्ज जमा करण्याचा वेळ :-
PMEGP Loan योजने अंतर्गत कर्ज घेतलेल्या रक्कमेची परतफेड हि ३ वर्षे ते ७ वर्षे ठेवली आहे. कर्जदाराला या वेळेत व्याजासह संपूर्ण रक्कमेची परतफेड करावी लागेल.
सब्सिडी दर :-
PMEGP Loan साठी पुढील प्रमाणे सब्दसिडी दर आहेत.
Category | व्यवसाय भांडवल स्व:य योगदान टक्केवारी | सब्सिडी दर | |
शहरी क्षेत्र | ग्रामीण क्षेत्र | ||
General | 10 % | 15 % | 25% |
Other (ST, SC, OBC,EWS, etc.) | 05% | 25% | 35% |
उदाहरण :-
समजा शहरी क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी अर्जदाराला १० लाख रुपयांची आवश्यक्तता आहे.
१० लाख रु ( व्यवसाय लागत ) – १ लाख रु ( स्व:य योगदान १०% ) = ९ लाख रु.
सरकारद्वारे दिली जाणारी सब्सिडी शहरी क्षेत्रातील १५%
९ लाख रु वर मिळणारी १५% सब्सिडी = १.३५ लाख रु.
९ लाख रु – १.३५ लाख रु = ७.६५ लाख रु लोन अर्जदाराला बँक मार्फत मिळेल.
आता आपण ७.६५ लाख रक्कमे वरील व्याज दर, हप्ता (EMI ) किती बसतो ते बघू या.
कर्ज घेतलेली रक्कम :- ७.६५ लाख रु
व्याज दर :- १०% ( समजा बँकेने आकारले )
एकूण व्याज :- ३,०१,७९२ रु.
प्रति महा EMI :- १२,७०० सात वर्षे साठी ( १०% नुसार )
एकूण परतावा :- १०,६६,७९२ रु.
योजना पत्राता :-
- कर्ज काढणारा व्यापारी भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय हे १८ पेक्षाचा जास्त असावे.
- अर्जदार कमीत कमी ८ वी पास असावा.
- योजने अंतर्गत नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या लाभार्थ्याला कर्ज दिले जाईल. जुना व्यवसाय असेल तर त्या व्यवसायीकाला कर्ज दिले जात नाही.
- जर कुटुंबातील कोणताही सदस्य आधी PMEGP योजनेचा लाभ घेत असेल तर, कुटुंबातील दुसरा सदस्य लाभ घेऊ शकत नाही. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ( पती/पत्नी व १८ वर्षाखालील मुल मिळून एक कुटुंब शासकीय भाषेत मानले जाते.)
असे चेक करा कर्ज किती मिळू शकते व EMI कालवधी :-
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्जदाराला किती कर्ज मिळू शकते, तो योजनेसाठी पात्र आहे कि नाही, तसेच मिळणाऱ्या रक्कमेवर किती EMI भरावा लागेल. याची सर्व माहिती jansamarth.in या संकेतस्थळावर मिळेल. माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
संकेतस्थळावर विचारल्या प्रमाणे माहिती भरा व शेवटी Calculate Eligibility बटनावर क्लिक करून तुम्ही महिती मिळवू शकतात.
व त्यानंतर अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
कागदपत्रे :-
- आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्राइविंग लायसन्स / मतदान कार्ड
- जातीचा दाखला ( विशेष प्रवर्गासाठी )
- पासपोर्ट साइज फोटो
- मार्कशीट ( ८ वी/ १० वी / १२ वी / Graduation/ Diploma/ ITI )
- Population Certificate ( पंचायत किंवा ग्रामसेवक द्वारे दिल्या जाते )
- इनकम टेक्स रिटर्न ( ITR ) ३ वर्षे
- मागील ६ महिन्याचे किंवा २ वर्षाचे बँक बैलेन्स शीट
- Land Recording Documents ( जिथे व्यवसाय करताय तेथील कागदपत्रे )
- अनुभव प्रमाणपत्र
- Life Insurance Police Certificate
- GST Number ( असेल तर )
- कुटुंब प्रमाणपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- EDP Training Certificate ( २ लाख पेक्षा जास्त कर्ज असेल तर )
PMEGP Loan साठी असा बनवा प्रोजेक्ट रिपोर्ट :-
- बिझनेस कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला त्याच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करवा लागतो.
- प्रोजेक्ट रिपोर्ट चा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- नमुना डाउनलोड हा Microsoft Excel फाईल मध्ये असून, त्या फाईल मधील DataSheet (Sheet 1) मध्ये अर्जदाराने व्यवसायाबद्दलची माहिती भरावी.
- माहिती भरल्यानंतर DPR_print (Sheet 2) मध्ये तुमच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट ऑटोमेटीक तयार होईल.
- सदर प्रोजेक्ट रिपोर्टची प्रिंट काढून कागदपत्रांना जोडा.
लक्षात असू ध्या :- प्रकल्पाच्या किंमतीत जमिनीची किंमत समाविष्ट करून नये. परंतु तुम्ही जर रेंटने घेतलेल्या जागेत व्यवसाय करत असाल, तर तुम्ही जास्तीत जास्त ३ वर्षाचे रेंट प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट करू शकतात.
EDP Training :-
- अर्जदाराला दोन लाखापेक्षा अधिक कर्ज घेण्यासाठी, अर्जदाराला EDP Training करणे आवश्यक असते.
- EDP – Entrepreneur Development Programme ट्रेनिंग मध्ये व्यवसायाबद्दल प्रशिक्षण दिले जाते.
- EDP Training हि ५ लाखांपेक्षा कमी खर्च असलेल्या प्रकल्पांसाठी ५ दिवशीय तर ५ लाखापेक्षा जास्त खर्च असलेल्या प्रकल्पांसाठी १० दिवशीय ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे.
- EDP Training हि तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकतात.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
खालील काही स्टेप फॉलो करून तुम्ही प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
स्टेप १ :- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा फॉर्म भरण्यासाठी PMEGP (खादी आणि ग्रामीण उद्योग ) आयोगाच्या संकेतस्थळावर जावे लागेल. संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
स्टेप २ :- संकेतस्थळावर गेल्यावर विचाल्या प्रमाणे योग्य माहिती भरा.
स्टेप ३ :- संपूर्ण माहिती भरल्यावर, माहिती सेव्ह करण्यासाठी “Save Applicant Data” या बटनावर क्लिक करा.
स्टेप ४ :- डाटा सेव्ह केल्यानंतर, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्यासाठीऑपशन दिसेल, तेथे तुमचे कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर अर्ज सबमिट करा.
स्टेप ५ :- अर्ज सबमिट झाल्यावर, तुमच्या रजिष्टर मोबाईलवर तुमचा-PMGP योजनेचा युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जातो.
अर्ज कसा भरायचा Video Tutorial 👈
योजनेचे उद्दिष्टे :-
- ग्रामीण व शहरी भागात रोजगार निर्माण करणे व नवीन व्यवसाय अथवा प्रोजेक्ट सुरु करणे.
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ( PMEGP ) अंतर्गत भारत सरकार देशातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत सगळ्या बेरोजगारांना स्वत: चा व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन देणे.
PMEGP Information | ||
योजनेचे नाव | प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ( PMEGP Loan ) | |
श्रेणी | भारत सरकार | |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन | |
अर्ज कोण करू शकतो | भारतातील नागरिक | |
वर्ष | 2024 | |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा | |
वेबसाईट | येथे क्लिक करा | |
प्रोजेक्ट रिपोर्ट | येथे क्लिक करा | |
हेल्पलाईन नंबर | State office Mumbai | 022-22827449 |
Divisional office Nagpur | 9823322554, 0712 – 2999854 |
निष्कर्ष :-
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत शासनामार्फत नवीन व्यवसाय करणाऱ्या तरुणांना पूर्वी २५ लाख रु पर्यंत कर्ज मिळत होते. परुंतु ते वाढवून आता ५० लाख रु पर्यंत करण्यात आले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी फायदा घ्यावा व स्वत: रोजगार निर्माण करून इतरांनासाठी हि रोजगार निर्माण करून द्यावा.
मित्रांनो, या लेख मध्ये आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ( PMEGP Loan ) बद्दल महिती दिली आहे. मला आशा आहे कि हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल व या योजनेची माहिती नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या तरुणांना शेअर करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-
1. PMEGP Loan अंतर्गत लाभार्थ्याला जास्तीत जास्त किती कर्ज दिल्या जाते ?
👉 PMEGP Loan अंतर्गत मैम्युफैक्चरिंग युनिट साठी 50 लाख तर सर्विसेस साठी 20 लाख रु पर्यंत कर्ज दिल्या जाते.
2. प्रकल्पाच्या खर्चात जमिनीची खरेदी किंमत समाविष्ठ केली तर चालेल का ?
👉 नाही
3. PMEGP Loan योजने अंतर्गत किती सबसिडी मिळते ?
👉 १. जर लाभार्थी सामन्य श्रेणी मधून असले व त्याचे प्रकल्पाचे स्थान हे शहरी भागात असेल तर त्याला १५% सबसिडी दिली जाईल. तर ग्रामीण भागातील प्रकल्पाला २५% सबसिडी दिली जाईल.
👉 २. जर लाभार्थी विशेष प्रवर्ग मधून असेल ( एसटी/एसटी/ओबीसी/ अल्पसंख्यक/ महिला/ ट्रान्सजेंडर, माजी सैनिक, शारीरिकदृष्ट्या अपंग, एनईआर, टेकडी आणि सीमा क्षेत्र, आकांक्षा जिल्हे इ.) व त्याचे प्रकल्पाचे स्थान हे शहरी भागात असेल तर त्याला २५% दिली जाईल. तर ग्रामीण भागतील प्रकल्पाला ३५% सबसिडी दिली जाईल.
4. PMEGP Loan योजने अंतर्गत योगदान किती जमा करावे लागते ?
👉 सामान्य श्रेणीसाठी १०% तर विशेष श्रेणी साठी ०५ % प्रकल्प खर्चासाठी स्वत:चे योगदान जमा करावे लागते.
5. प्रकल्प खर्चात स्वता:चे खेळते योगदान म्हणून किती पाहिजे ?
👉 खेळते भांडवल हे प्रकल्पाच्या खर्चाच्या १०% सामान्य वर्गासाठी तर तर कमकुवत वर्गाच्या बाबतीत प्रकल्प खर्चाच्या ५% स्वत:चे योगदान पाहिजे.
6. योजेंसाठी लाभार्थी कोण आहे ?
👉 केवळ व्यक्तीक उद्योगजक लाभार्थी आहे.
7. योजनेअंतर्गत वित्तीय ( Finance ) संस्था कोणत्या आहेत ?
👉 सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँक (Public Sector Bank), प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB), सहकारी बँक, SIDBI आणि खाजगी अनुसूचित व्यावसायिक बँक RBI द्वारे विनियमित आणि संबधित राज्यच्या SLMC द्वारे मंजूर.
8. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज कोठे सादर करावा ?
👉 https://kviconline.gov.in/pmegpeportal या संकेतस्थळावर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
9. योजनेचा लाभ घेण्यासाठी वय मर्यादा काय आहे ?
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय १८ वर्षे पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
10. कर्ज घेण्यासाठी EDP Training घेणे अनिवार्य आहे का ?
👉 २ लाखांपेक्षा जास्त खर्च असलेल्या प्रकल्पांसाठी EDP ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे.
11. EDP Training किती दिवसाची असते ?
👉 ५ लाखांपेक्षा कमी खर्च असलेल्या प्रकल्पांसाठी ५ दिवशीय ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. तर ५ लाखापेक्षा जास्त असलेल्या प्रकल्पांसाठी १० दिवशीय ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. EDP ट्रेनिंग हि ऑनलाईन पद्धतीने होईल.
12. PMEGP Loan साठी एकापेक्षा जास्त प्रकल्प सादर करू शकतो का ?
👉 नाही