नमस्कार मिंत्रानो, आज आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ( PM Vishwakarma Yojana ) काय आहे ? या योजने साठी कोण कोण पात्र आहे ? योजने अंतर्गत लाभार्थीला किती अनुदान दिल्या जाते ? अर्ज कुठे करायचा ? योजनेसाठी कागदपत्रे कोणकोती आहेत ? तसेच या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सोप्या भाषेत आपण या लेखा मध्ये घेणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आणि विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने देशातील लोकांना मोठी भेट दिली. दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :- ( PM Vishwakarma Yojana )
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हि असंघटीत कामगारासाठी आहे. या योजने अंतर्गत असंघटीत कामगारांना १ लाख रु पर्यंत कर्ज दिल्या जाते. तेही ५% व्याज दराने दिल्या जात आहे. तसेच त्यांना १५ हजार रु E-Voucher टूलकिट साठी दिल्या जाते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे :-
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमुळे लाभार्थ्याला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र द्वारे विश्वकर्मा म्हणून ओळख दिल्या जाईल.
- कौशल्य विकासासाठी मुलभूत प्रशिक्षण ५ ते १५ दिवस ५०० रु प्रति दिन प्रमाणे प्रशिक्षण वेतन दिल्या जाईल.
- टूलकिट घेण्यासाठी १५,००० रु चे प्रोत्साहन दिले जाईल.
- कारागिरांना व्यवसायासाठी कर्ज लागत असेल तर, पहिल्या टप्यात १ लाख रु दिल्या जाईल. या रक्कमेवर केवळ ५% व्याज १८ महिनेच्या परतफेडीवर दिले जाईल.
- सदर रक्कम परतफेड झाल्यावर दुसऱ्या टप्यात २ लाख रु कर्ज ३० महिन्यांच्या परतफेडीवर दिल्या जाईल.
- डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन दिल्या जाईल.
- व्यवसायासाठी मार्केटींग सपोर्ट दिल्या जाईल.
पीएम विश्वकर्मा योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- आधार लिंक फोन नंबर
- बँक पासबुक
- स्वस्त धान्य दुकानात राशन भेटत कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कुठे करायचा :-
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जवळच्या महा ई सेवा केंद्र / CSC सेंटर मध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Related Post :- आयुष्यमान भारत योजना
योजनेचे मुख्य उद्दिष्ट :-
👉 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी भारत सरकार द्वारा १३,००० करोड रु बजेटची तरतूद.
👉 योजने मध्ये १८ पारंपारिक व्यवसाय समाविष्ठ.
👉 शिल्पकार आणि कारागिरांना प्रमाणपत्र आणि आईडीकार्ड मिळणार.
👉 पहिल्या टप्यात १ लाख रु तर दुसऱ्या टप्यात २ लाख रु पर्यंत मदत फक्त ५ % व्याज दराने.
👉 योजने अंतर्गत मिळेल कौशल्य विकास प्रशिक्षण, टूलकिट लाभ, डिजिटल घेणे देणे साठी इंसेटिव्ह आणि मार्केटींग सपोर्ट.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदाराचे वय हे १८ वर्षे पूर्ण पाहिजे आणि ५० वर्षे पेक्षा कमी पाहिजे.
- अर्जदार भारताचा रहिवासी पाहिजे.
- योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या १८ व्यवसाय पैकी एखादा व्यवसाय संबंधित असणे आवश्यक.
- अर्जदाराने गेल्या ५ वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या इतर योजनेंतर्गत कर्ज घेतले नसावे. उदा. PMEGP, पीएम स्वनिधी , मुद्रा लोन इ.
- योजनेचा लाभ कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या कि शासकीय भाषेत कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि १८ वर्षाखालील मुले म्हणजे कुटुंब होय.
- अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील एकदा सदस्य हा सरकारी नोकरीला नसावा.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी पात्र असलेले कारागीर :-
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने मध्ये १८ पारंपारिक व्यवसाय समाविष्ठ आहेत.
1. कारपेंटर ( सुतार ) :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर आणि त्यांच्यासोबत काम करणारे कारागीर जे त्यांचा हाताने लाकडापासून वस्तू बनवणारे किंवा लाकडी वस्तू दुरुस्ती करण्यासाठी काम करतात.
2. जहाज बनवणारे ( बोट मेकर ) :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर आणि त्यांच्यासोबत काम करणारे कारागीर जे असंगटित क्षेत्रात लाकडी बोटी बनवण्यासाठी, जोडण्यासाठी, बदलण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी हातांनी आणि साधनांनी काम करतात.
3. आर्मरर :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर जे तलवारी, ढाल, चाकू, हेल्मेट इत्यादी विविध प्रकारच्या शस्त्रांचे निर्माण किंवा दुरुस्ती करतात.
4. लोहार :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर ज्यात लोहार, तांबे आणि कास्यकार यांचा समावेश आहे. जे लोखंड, तांबे, पितळ किंवा कांस्य यासारखे धांतून पासून वस्तू तयार करतात.
5. हातोडा आणि टूल किट मेकर :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर जे लोखंडासारखे धातू बनावण्यासाठी काम करतात.
6. लॉकस्मिथ :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर जे रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलमध्ये किंवा रस्त्यावर प्रवास करणारे, हातांने पारंपारिक साधनांचा वापर करतात. जसे कटर, हातोडा, सुई, धागे इ. आणि कुलूप बसविणे किंवा दुरुस्त करणारे.
7. शिल्पकार ( मूर्तिकार, स्टोन ब्रेकर ) :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर जे दगड कोरणे, तोडणे किंवा आकार देतात. त्यांना शिल्पी किंवा मूर्तिकार म्हणूनही ओळखले जातात.
8. सोनार :-
स्वयंरोजगार असलेले सोनार, स्वर्णकार, चांदीचे कारागीर जे असंघटीत क्षेत्रातील सोने आणि इतर मोल्यवान धातुंसह गुंतागुतीचे दागिने आणि सजावटीचे तुकडे तयार करतात.
9. कुंभार :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर जे परंपारिक पद्धतीचा वापर करून चाकावर चिकण मातीची भांडी भट्टीत भाजून मातीची भांडी तयार करतात.
10. मोची/ चपला / पादत्राणे कारागीर :-
रस्त्याच्या कडेला आलेल्या छोट्या स्टॉलवर किंवा रस्त्यावर प्रवास करणारे कारागीर. कटर, हातोडा, सुई, धागे इ. सारखे पारंपारिक साधने वापरून पादत्राणे बनविणे किंवा दुरुस्ती करणारे.
11. गवंडी ( राजमिस्त्री ) :-
जे वीट वापरून घर बाधतात, प्लास्टरींग, सिमेंट, वाटर प्रूफिंग कामे करतात असे.
12. बास्केट, चटई, झाडू बनवणारा :-
बास्केट जे लोक विविध प्रकारच्या टोपल्या तयार करतात असे.
मॅट मेकर/ कॉयर विणकर जे बास्केट, मॅटस बनवण्यासाठी कॉयर आणि बांबूचे साहित्य विणतात असे.
झाडू मेकर जे विविध गवत किंवा नारळासारख्या वनस्पतींपासून गोळा केलेल्या ब्रिस्टल्सवर प्रकिया करतात आणि लाकडी हँड्ल, कात्री चाकू इत्यादी साधनांचा वापर करून झाडू बनवतात.
13. बाहुली आणि खेळणी बनवणारे ( पारंपारिक ) :-
डॉल अँड टॉय मेकर्स जे लोकर, धागे, कापूस, लाकूड इत्यादी सामग्री वापरून खेळणी तयार करतात.
14. नाई :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर जे केस कापणे, टक्कल करणे, दाढी करणे या लोकांना सारख्या सेवा देतात.
15. हार बनवणारा :-
स्वयंरोजगार असलेले कारागीर जे त्यांच्या हातांनी फूल, पान किंवा इतर सजावटीसाठी हार बनवतात. तसेच विविध अलंकार, पोत बनवतात असे.
16. धोबी :-
कपडे धुणे आणि इस्त्ररी करणे या सारख्या सेवा देतात.
17. शिंपी :-
जे कारागीर शिलाई मशीन, कात्री, बटणे, फॅब्रिक्स, धागे, सुई इत्यादी वापर करून कपडे शिवतात.
18. फिशिंग नेट मेकर :-
जे कारागीर दोरी, धागे किंवा सुतळी या सारख्या सामग्री वापर करून मासेमारीची जाळी तयार करतात. तसेच मासे आणि इतर जलचरांना पकडण्यासाठी पारंपरिक तंत्रे किंवा आधुनिक यंत्रे वापरतात.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना – २०२४ | |
योजनेचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सम्मान योजना |
श्रेणी | केंद्र सरकार योजना |
विभाग | सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन ( CSC किंवा महा ई सेवा केंद्रा मार्फत ) |
वेबसाईट | https://pmvishwakarma.gov.in/ |
अर्ज स्थिती बघण्यासाठी | येथे क्लिक करा. |
वर्ष | २०२३-२०२४ |
लाभ | टूलकीट प्रोत्साहन :- १५,००० रु. E-Voucher |
कोशल्य प्रशिक्षण :- ५०० रु प्रति दिन | |
कर्ज :- १ ते २ लाख रु ५% दराने | |
हेल्पलाईन नंबर | 18002677777 |
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-
1. पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ?
👉 पीएम विश्वकर्मा हि एक केंद्र सरकारची योजना आहे. जे कारागिरांना मुक्त क्रेडीट ( कर्ज ) कौशल्य प्रशिक्षण, टूलकीट, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि बाजारासाठी सर्वांगीण आणि शेवटपर्यंत समर्थन प्रदान करण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रलयाने सुरु केलेली योजना होय.
2. योजनेसाठी लाभार्थी कोण आहे ?
👉 योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या १८ व्यवसायांच्या संबधित कारागीर पात्र आहेत.
3. योजनेअंतर्गत कोणत्या संस्थे मार्फत कर्ज मिळू शकते ?
👉 अनुसूचित व्यवसायिक बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, लघु वित्त बँक, विगर बँकिंग वित्त कंपन्या आणि सूक्ष्म वित्त संस्था, सहकारी बँका या सर्व प्रकाच्या बँके मार्फत कर्ज मिळू शकते.
4. योजने अंतर्गत कर्ज किती मिळू शकते ?
👉 योजने अंतर्गत “ एंटरप्राइझ डेव्हलपमेंट लोन ” १८ महिन्याच्या कालावधीसाठी एक लाख रु पर्यंत दिल्या जाते.
5. मि पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत कर्जाचा पहिला टप्पा घेतला आहे, मि कर्जाच्या दुसऱ्या टप्यासाठी कधी पात्र होईल ?
👉 पहिल्या टप्प्यामध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड पूर्ण केल्यास, दुसऱ्या टप्यासाठी २ लाख रु कर्ज मिळण्यास पात्र होईल.
6. कर्ज मिळवण्यासाठी मला कोणती सुरक्षा किंवा तारण ठेवण्याची गरज आहे का ?
👉 कर्ज मिळवण्यासाठी कोणतीही हमी सुरक्षा देण्याची आवश्यक नाही.
7. योजने अंतर्गत कर्जावरील रकमेवर व्याज दर किती असेल ?
👉 पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत ५% व्याज निश्चीत करण्यात आला.
8. कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित न राहता मला टूलकिट प्रोत्साहन मिळेल का ?
👉 नाही, कौशल्य पडताळणीनंतर लाभार्थ्याला १५,००० रु पर्यंत प्रोत्साहन दिल्या जाईल.
9. डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन रक्कम किती मिळते ?
👉 जास्तीत जास्त १०० पात्र व्यवहारावर मासिक १ रुपये लाभार्थीच्या खात्यात DBT मोडणे जमा केल्या जाईल.
10. PMEGP, पीएम स्वनीधी किंवा पीएम मुद्रा लोन घेतलेली व्यक्ती पीएम विश्वकर्मासाठी अर्ज करू शकतो का ?
👉 PMEGP, पीएम स्वनीधी किंवा पीएम मुद्रा लोन या पैकी कोणत्याही योजनेअंतर्गत लाभार्थ्याने कर्ज घेतले असेल व त्या कर्जाची थकबाकी असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. परंतु त्या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकतो.
Good
Good work