पीएम स्वनिधी योजना, मिळवा बिनव्याजी कर्ज – 2024 (PM Svanidhi Yojana in Marathi )

PM Svanidhi Yojana in Marathi : करोना काळात सुरु करण्यात आलेली पीएम स्वनिधी योजना, आहे तरी काय ? या योजनेचा लाभ कुणाला मिळेल ? योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखाच्या मदतीने जाणून घेणार आहोत .

पीएम स्वनिधी योजना आहे तरी काय ?

देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र शासन आत्मनिर्भर भारत हे अभियान देशभरात चालवत आहे. या अभियानाला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने, छोटा व्यवसाय करणाऱ्या व रस्तावरील विक्रेत्यांसाठी, दिनांक 1 जून 2020 रोजी पीएम स्वनिधी योजना सुरु केली. या योजनेंतर्गत नव्याने व्यवसाय सुरु करणाऱ्या लहान विक्रेत्यांना 50,000 रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते.

आनंदाची बाब म्हणजे योजनेअंतर्गत लाभार्थ्याला विनागॅरंटी कर्ज मिळते. तसेच योजनेंअंतर्गत लाभार्थ्याला बिनव्याजी कर्ज मिळते. केंद्र सरकारद्वारे या योजनेंअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर भरघोस सबसिडी मिळते.


पीएम स्वनिधी योजनेचा कुणाला मिळणार लाभ ? PM Svanidhi yojana Maharashtra

PM Swanidhi Yojana 2024 चा लाभ हा मुख्यता स्ट्रीट वेंडर्स ला दिला जातो. या योजनेसाठी लहान व्यापारी आणि फेरीवाले अर्ज करू शकतात.

जसे कि, नाव्ही, मोची, टपरी, धोबी, फळभाज्या विक्रेता, चहा, ब्रेड, पकोडे, अंडी, पुस्तके, कारागीर, अन्य फेरीवाले विक्रेते इत्यादी ना या योजनेचा लाभ मिळणार.

पीएम स्वनिधी योजना अंतर्गत मिळणारी रक्कम हि वेग वेगळ्या हप्त्या द्वारे तीन वेळा अर्जदाराला दिली जाते. सदर योजनेअंतर्गत सर्वप्रथम कर्ज रक्कम म्हणुन 10,000 रु. मिळते. सदर कर्ज लाभार्थीने वेळेच्या आत भरल्यास, दुसऱ्या वेळी कर्ज रक्कम वाढून 20,000 रु. मिळते. तसेच कर्जाची परतफेड केल्यावर अजून कर्ज रक्कम वाढवून मिळते.


व्यवसाय करण्यासाठी पैसे नाही आहेत, भारत सरकार देत आहे व्यवसाय करण्यासाठी पैसे योजना बघा 👇👇

PMEGP Loan : 50 लाख रु, सोबत 35% सबसिडी पीएम विश्वकर्मा योजना, 1 ते 2 लाख रु कर्ज, 5% व्याज दराने

पात्रता :- PM Svanidhi Yojana 2024 Eligibility

👉 अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
👉 लाभार्थी हा फेरीवाला किंवा लहान व्यापारी असावा.
👉 अर्जदाराचा व्यवसाय कमीत कमी 6 महिने जुना असावा.
👉 लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
👉 अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक असावे.


योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील ?

👉 आधार कार्ड

👉 मतदान कार्ड

👉 पॅन कार्ड

👉 बँक पासबुक

👉 उत्पनाचा दाखला

👉 रहिवाशी प्रमाणपत्र ई.


प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत आतापर्यंत किती कर्ज वाटप करण्यात आले ?

केंद्र सरकारने योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत 57 लाख अर्जदारांना कर्ज वाटप करण्याचे लक्ष ठेवले होते.

1 कोटी अर्जदारांना डिसेंबर 2024 पर्यंत कर्ज वाटप करण्याचे लक्ष केंद्र सरकारचे आहे.

पीएम स्वनिधी योजना अंतर्गत आता पर्यंत 71.10 कोटी अर्जदारांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Pradhan Mantri Svanidhi Yojana in Marathi
योजनेचे नावपीएम स्वनिधी योजना
सरकारकेंद्र सरकार
लाभार्थीलघु व मध्यम व्यापारी
वर्ष2024
लाभ50,000 रु. पर्यंत कर्ज
अर्ज प्रकियाऑनलाईन / ऑफलाईन
वेबसाईटhttps://pmsvanidhi.mohua.gov.in/
हेल्पलाईन नंबर1800 11 1979
श्रेणीकेंद्र सरकार योजना
PM Svanidhi Yojana 2024

योजनेचा लाभ कसा मिळेल ? Pradhan Mantri Svanidhi Yojana in Marathi

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑफलाईन  व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

ऑफलाईन अर्ज :-

जर अर्जदाराला ऑफलाईन पद्धतीने योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जावे लागेल. बँक मधून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. त्यानंतर फॉर्म मध्ये विचारल्याप्रमाणे योग्य माहिती भरावी . फॉर्म सोबत आवश्यक असलेले कागदपत्रे जोडा व बँक मध्ये जमा करा. यानंतर तुमच्या फॉर्म आणि कामाची पडताळणी करण्यात येईल. सर्वकाही योग्य असल्यास, तुम्हाला बँकेमार्फत कर्ज दिल्या जाईल.

ऑनलाईन अर्ज :-

पीएम स्वनिधी योजेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटर वर जाऊन अर्ज करू शकतात.

तसेच तुम्ही स्वत: सुद्धा घरी बसल्या बसल्या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

स्टेप 1 :- अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम स्वनिधीच्या अधिकृत वेबसाईट https://pmsvanidhi.mohua.gov.in/ वर जावे लागेल.

स्टेप 2 :- होम पेज वर तुम्हाला Apply Loan 10K, 20K, 50K / Apply LoR cum Loan या ऑप्शन पैकी तुम्हाला ज्या लोन साठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 :- त्यानंतर विचारल्या प्रमाणे तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर व कॅप्चा कोड भरा, त्यानंतर otp पाठवा वर क्लिक करा.

Pm svanidhi yojana Maharashtra, पीएम स्वनिधी योजना, PM Svanidhi Yojana 2024, pm svanidhi Yojana in Marathi, Pradhan Mantri Svanidhi Yojana in Marathi

स्टेप 4 :- तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो वेरीफाय करून घ्या.

स्टेप 5 :- त्यानंतर तुमच्या समोर योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म येईल.

स्टेप 6 :- विचारल्या प्रमाणे फॉर्म मध्ये योग्य ती माहिती भरा व सोबत आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घ्या. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

स्टेप 7 :- त्यानंतर केंद्र सरकारने निच्छित केलेल्या स्वनिधी केंद्रावर जाऊन फॉर्म सह सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.

स्टेप 8 :- त्यानंतर तुमचा अर्ज पडताळणी करण्यात येईल. सर्वकाही योग्य असल्यास कर्जाची रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यात मिळेल.

लक्षात असू द्या, योजनेसाठी किंवा कर्ज रक्कम भेटण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका, फसवणूकीला बळी पडू नका.


प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे उद्दिष्टे :- ( PM Svanidhi Yojana in Marathi )

👉 अर्जदाराला 1 वर्षाच्या कालावधीकरता खेळते भांडवल 10,000 रु विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात येते.

👉 पहिल्या कर्जाचे वेळेवर परतफेड केल्यास, दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात अनुक्रमे वीस हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये पर्यंत वाढवून कर्ज देण्यात येते.

👉 नुदानाची नियमित फरतफेड केल्यास वार्षिक 7% व्याज प्रोत्साहन.

👉 प्रति वर्षी डिजिटल व्यवहारांवर प्रोत्साहन 1,200 रुपये पर्यंत कॅशबॅक मिळते.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. योजनेअंतर्गत किती टप्पात किती कर्ज देण्यात येते ?

👉 प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत तीन टप्प्यात कर्ज देण्यात येते.
 दहा हजार रु ( पहिला टप्पा )
 वीस हजार रु ( दुसरा टप्पा )
 पन्नास हजार रु ( तिसरा टप्पा )

2. योजनेअंतर्गत कोणत्या संस्थेद्वारे कर्ज मिळेल ?

👉  प्रादेशिक ग्रामीण बँक
 अनुसूचित व्यवसाईक बँक
 सहकारी बँक
 बचत गट
 मायक्रोफायनन्स कंपनी इ.

Leave a Comment