PM Suryoday Yojana|300 युनिट मोफत विज प्रधानमंत्री सूर्योदय योजना – 2024 | PM Surya Ghar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जाहीर केलेली “ पंतप्रधान सूर्योदय योजना “ ( PM Suryoday Yojana in Marathi| PM Surya Ghar ) काय आहे ? योजनेचा लाभ कोणाला मिळेल ? अर्ज कसा करायचा ? भारत देशातील सौरउर्जा क्षमता किती ? आणि सौरऊर्जा निर्मिती भारतासाठी का महत्वाची आहे ? सोलर पॅनल लावण्यासाठी किती खर्च येतो ? याविषयी माहिती जाणून घेऊ.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासी यांना अजून एक भेट दिली. सोमवारी, दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून दिल्लीला परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम “ प्रधानमंत्री सूर्योदय योजना ” ची घोषणा केली. या योजनेंतर्गत एक करोड घरांवर सोलर रूफटॉप लावण्यात येईल. PM Surya Ghar योजने अंतर्गत प्रति महा ३०० युनिट विज मोफत देण्यात येणार आहे.

योजने बद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी :- ( PM Surayday Yojana )

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापना नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “ पंतप्रधान सूर्योदय योजना “ ची घोषणा  केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, देशवासीयांच्या घराच्या छतावर सौर सिस्टम, ( PM Suraday Yojana in Marathi ) योजने अंतर्गत बसवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर म्हणजेच एक्स मिडिया हँडलवरून पोस्ट मध्ये लिहल कि, “ आज, अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझ्या संकल्पनांना आणखी बळ मिळाले कि, देशवासीयांच्या घराच्या छतावर स्वत: ची सोलर सोलर सिस्टम असावी. पुढे ते एक्स पोस्ट मध्ये सांगतात कि, अयोध्ये मधून दिल्लीत परत गेल्यानंतर मि पहिला निर्णय घेतला कि, आमच्या सरकार द्वारे १ करोड घरांच्या छतावर सोलर रूफटॉप बसवणे, या लक्षासह “ प्रधानमंत्री सूर्योदय योजना “ सुरवात करेल.

यामुळे गरीब आणि मध्यम वर्ग मधील विज बिल कमी तर होईल, सोबतच भारत देश ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर पण बनेल.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे :- ( PM Suryoday Yojana in Marathi)

पंतप्रधान सूर्योदय योजना, अंतर्गत एक कोटी घरांवरील छतांवर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहे. हे सौर पॅनेल सूर्यप्रकाशा पासून चार्ज होऊन विज निर्माण करतात. याचा मुख्य उद्धेश घराघरामध्ये स्वस्त दरात विज पोहचवणे, तसेच उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर राहणे होय.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ कोणाला होणार ?

या योजनेचा लाभ कोट्यावधी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाना होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच या योजनेंतर्गत अल्प-मध्यम उत्पन्न वर्गातील लोकांच्या घरांमध्ये सौरऊर्जेद्वारे विज पोहचवण्यात येणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात त्यांना त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा विज बिलावर खर्च करावा लागतो. देशात वीजबिलावरून खूप वेळा राजकारण तापते, कधी विज बिल माफी, तर कधी मोफत विज या सारख्या मुद्यावरून भरपूर वेळा राजकारण होतांना दिसते. या योजनेच्या माध्यमातून अश्या मुद्द्यांवरील राजकारणाला संपुष्टात आण्यास सरकारला मदत होतांना दिसते.

योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना साठी अर्ज तुम्ही https://pmsuryaghar.gov.in/ या शासनाच्या अधिकृत सरकारी वेबसाईट वरून करू शकतात. अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे :-

प्रधानमंत्री सूर्योदय योजनाअंतर्गत, तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवायचे असतील तर खाली नमूद केलेल्या काही कागदपत्रांची आवश्यक्यता पडू शकते. यासाठी सरकारने पोर्टल लॉंच केल्यानंतर संपूर्ण सविस्तर माहिती उपलब्ध करण्यात येईल.

👉 आधार कार्ड

👉 पत्याचा पुरावा

👉 रेशनकार्ड

👉 बँक पासबुक

👉 उत्पन्न प्रमाणपत्र

👉 मोबाईल नंबर

👉 पासपोर्ट फोटो


आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

भारत देशातील सौर उर्जेचे लक्ष :-

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतरर्गत देशातील एक करोड छतांवर सौर प्रणाली ( Solar roof on top ) बसवण्यात येणार आहे, परंतु विशेष म्हणजे घरांच्या छतांवर सौर उर्जा बसवण्याची हि पहिली योजना नाही. या आधी २०१४ मध्ये भारत सरकारद्वारा अश्याच प्रकाच्या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सन २०२२ पर्यंत ४० गिगावॉट सौर उर्जा निर्माण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते, परंतु हे लक्ष अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे रूफटॉप योजनेचा सेकेंड फेज मध्ये ३१ मार्च २०२६ पर्यंत योजनेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. अश्यातच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री सूर्यदय योजना लक्ष पूर्ण करण्यासाठीचा या योजनेचा एक भाग असल्याचे दिसून येते.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

सौर उर्जा क्षमता :-

ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाईटच्या आकड्या नुसार मागील वर्षेपर्यंत  म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत भारत देशाची सौरऊर्जा निर्मिती क्षमता हि ७३.३१ गिगावॉट इतकी होती. त्याचबरोबर सौलर रूफऑन टॉप म्हणजे घरांच्या छतांवर असलेल्या सौर ऊर्जा प्रणालीद्वारे सौर उर्जा निर्मिती क्षमता हि ११.८ गिगावॉट इतकी होती.

राज्यानुसार विचार केला तर, प्रथम स्थानावर राजस्थान १८.७ गिगावॉट निर्मिती, तर दुसऱ्या स्थानावर गुजरात १०.५ गिगावॉट सौर ऊर्जे पासून निर्मिती करते. तसेच फक्त घराच्या छतावर बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जेचा विचार केला तर, या मध्ये गुजरात राज्याचा २.८ गिगावॉट सह पहिल्या स्थानावर, तर दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्य १.७ गिगावॉट सौर ऊर्जा निर्मिती करते.

देशात सौरऊर्जा निर्मितीची गरज का ?

एका इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या जारी केलेल्या अहवालानुसार, येणाऱ्या पुढील ३० वर्षात झपाट्याने विकसीत होणाऱ्या भारत देशात ऊर्जा मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हि मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार कडे सौर ऊर्जेचा स्त्रोत असणे गरजेचे आहे. भारत देशाची सध्याची परिस्थिती बघता भारताला केवळ कोळश्याद्वारे निर्मित ऊर्जेवर अवलंबून राहता येणार नाही, त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून शासन सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय या सारख्या योजनांची घोषणा करत आहे.    

PM Suryoday Yojana in Marathi
योजनेचे नावप्रधानमंत्री सूर्योदय योजना | PM – Surya Ghar
सरकारभारत सरकार
वेवसाईटयेथे क्लिक करा.
योजनेची घोषणा२२ जानेवारी २०२४
श्रेणीकेंद्र सरकार
पीएम सुर्योदय योजना

सोलर पॅनल लावण्यासाठी साधारण किती खर्च येतो :-

सौलर पॅनलची किंमत हि पॅनलच्या मॉड्यूल आणि इन्व्हर्टरवर अवलंबून असते.

१ किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी जवळ जवळ खर्च हा ४५ ते ८५ हजार रुपये पर्यंत येतो. याशिवाय बॅटरीचा खर्च असतो.

त्याचप्रमाणे ५ किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी २.२५ ते ३.२४ लाख रुपये खर्च येऊ शकतो. विज बिलानुसार हा संपूर्ण खर्च ५ ते ६ वर्षांमध्ये वसूल होतो. तसेच शासन सोलर पॅनल बसवण्यासाठी योजने अंतर्गत सबसिडी देते.

निष्कर्ष :-

देशातील वाढती विज मागणी लक्षात घेऊन, देशात १ करोड घरांच्या छतांनवर सौलर सिस्टम बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “ प्रधानमंत्री सूर्यदय योजना “ ची घोषणा केली. या योजेसाठी “पीएम सूर्य घर” या अधिकृत वेबसाईट वर तुम्ही अर्ज करू शकतात.

Leave a Comment