पीएम किसान सम्मान निधी योजना ( PM Kisan Samman Nidhi Yojana in Marathi ) या योजनेला पीएम किसान योजना ( PM KISAN in Marathi ) या नावाने ओळखल्या जाते, हि एक भारत सरकारची एक केंद्रीय योजना आहे. अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी व आणि लाखो लोकांची उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी कृषी क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, देशात पीएम किसान सम्मान निधी योजना भारतातील शेतकरी समुदायासाठी आधार म्हणून उभी आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान सम्मान निधी योजनेची घोषणा केली.
पीएम किसान योजना हि शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेमध्ये आता पर्यंत सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांनी नांव नोंदणी केली आहे.
तुम्हीही शेतकरी असाल आणि तुम्हाला हि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्ही पात्रता निकष तपासले पाहिजे. पीएम किसान पोर्टलवर शेतकरी म्हणून तुम्ही तुमची नोंदणी करणे आवश्यक आहे.
PM KISAN योजनेची सुरवात :-
PM Kisan योजना सर्वात आधी तेलंगाना सरकार द्वारे रायथु बंधू योजना या नावाने योजना सुरु करण्यात आली होती. योजनेद्वारे एक निच्छित रक्कम पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दिल्या जात होती. नंतर १ फेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्रीय बजेट मध्ये या योजनेचे राष्ट्रव्यापी परियोजना करून नवीन रूपाने लागू करण्याची घोषणा करण्यात आली.
उत्पनाचा आधार :-
देशातील शेतकरी कुटुंबाना उत्पनाचा आधार देण्यासाठी पीएम किसान योजना सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत शासनामार्फत DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दोन हजार रु. दर चार महिन्यांनी जमा करण्यात येते. असे वर्षभरात २,००० रु चे ३ हप्ते म्हणजेच वार्षिक रक्कम ६,००० रु. शासनामार्फत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येते.
मागील चार वर्षात प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत जवळ जवळ ११.७८ करोड शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
नोंदणी :-
शेतकरी या योजनेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर ( CSC ), ऑनलाईन पोर्टल किंवा नियुक्त सरकारी कार्यालयांना भेट देऊन या योजने साठी नोंदणी करू शकतो.
नोंदणी प्रक्रीयेसाठी आवश्यक कागदपत्रे जसे आधार कार्ड, जमीनधारक माहिती आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेची नोंदणी तुम्ही https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट वरून नोंदणी करू शकतात.
पीएम किसान सम्मान निधी योजना साठी पात्रता / अपात्रता :- ( Eligibility for PM Kisan Samman Nidhi Yojana )
शेती योग्य जमीन असलेले छोटे मोठे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
अपात्रता :-
यामध्ये काही अपवाद शेतकरी आहे जे उच्च आर्थिक स्थितीच्या खालील श्रेणीमध्ये येणारे शेतकरी PM Kisan योजने साठी अपात्र आहे.
- सर्व संस्थात्मग जमीन धारक.
- भाडेकरू शेतकरी आणि जे शेतकरी इतरांच्या शेतजमिनीवर शेती करतात ते
- कोणतेही घटत्मादक पद असलेले माजी किंवा वर्तमान धारक.
- केंद्र सरकारी किंवा राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी.
- लोकसभा, राज्यसभा, विधानसभेचे माजी किंवा विद्यमान सदस्य.
- महानगरपालिकेचे माजी किंवा विद्यमान महापौर किंवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष असलेले.
- करदाता ( Income Tax भरणारा )
- सर्व सेवानिवृत्त निवृत्ती वेतन धारक ज्यांची मासिक पेन्शन म्हणून दहा हजार रु किंवा त्या पेक्षा जास्त असलेले.
- डॉक्टर, वकील, इंजिनीअर या सारखे व्यावसाईक जे व्यवसाईक संस्थेमध्ये नोंदणी कृत आहेत व त्यांचा व्यवसाय करतात.
PM Kisan – Quick Links | |
नवीन नोंदणी करण्यासाठी | येथे क्लिक करा |
हप्ताह चेक करण्यसाठी | येथे क्लिक करा |
KYC करण्यसाठी | येथे क्लिक करा |
नाव दुरुस्ती करण्यासाठीसाठी | येथे क्लिक करा |
लाभार्थी यादी बघण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोबाईल अप्लिकेशन | येथे क्लिक करा |
अपात्र असल्यास रिफंड | येथे क्लिक करा |
पीएम किसान सम्मान निधी योजनेचे वैशिष्ट :-
👉 पीएम किसान हि एक केंद्रीय योजना आहे हि योजना पूर्णपने केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाते, या योजनेमध्ये शेतकऱ्यांनसाठी केंद्र सरकारचा १००% वाटा आहे.
👉 पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत सर्व जमीन धारक कुटुंबाना तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष ६००० रु उत्पन्नाचा आधार शेतकऱ्यांना दिला जातो.
👉 आधी, पीएम किसान योजना हि फक्त २ हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी होती परंतु नंतर हि अट काढण्यात आली. आता शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार न मोजता या योजनेचा लाभ दिला जातो.
👉 थेट निधी DBT द्वारे लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो.
पीएम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- ७ – १२ / ८अ उतारा
- बँक पासबुक
- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
PM Kisan Samman Nidhi Yojana | |
योजना | पीएम किसान ( PM KISAN) |
सरकार | भारत सरकार |
लाभार्थी | देशातील शेतकरी |
विभाग | कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग |
लाभ | वार्षिक ६००० रु |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
वेबसाईट | https://pmkisan.gov.in/ |
योजनेची सुरवात | फेब्रुवारी २०१९ |
श्रेणी | केंद्र सरकार |
हेल्पलाईन नंबर | १५५२६१ / ०११-२४३००६०६ |
निष्कर्ष :-
पीएम किसान योजना हि शेतकऱ्यांनसाठी आर्थिक मदत देण्यासाठी एक महत्वपूर्ण प्रणाली आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान आणि कृषी पद्धती सुधारणे होय.
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न :-
1. पीएम किसान सम्मान निधी योजना काय आहे ?
👉 पीएम किसान सम्मान निधी योजना हि एक केंद्र सरकारी योजना आहे. त्यात शेतकरी परिवाराला तीन सामान हप्तामध्ये प्रतीवर्ष ६००० रु आर्थिक मदत केल्या जाते.
2. पीएम किसान सम्मान निधी योजनेची सुरवात कधी झाली होती ?
👉 २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घोषणादरम्यान पीएम किसान योजना सुरु करण्यात आली. हि योजना १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली.
3. पीएम किसान योजनेचे किती हप्ते मिळतात ?
👉 पीएम किसान योजने अंतर्गत लाभार्थ्याला दोन हजार रुपयाचे सामान तीन हप्त्या मध्ये प्रति वर्षी सहा हजार रुपयेची आर्थिक मदत लाभार्थ्याला सरळ बँक खात्यात दिली जाते.