वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना | OBC Loan Scheme In Maharashtra

OBC Loan Scheme In Maharashtra: व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कर्ज हवे आहे ? तर तुमच्यासाठी ओबीसी महामंडळाने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणली आहे. परंतु या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो ? पात्रता काय आहे ? योजनेसाठी अर्ज कसा करावा ? योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती लागतात ? या सर्व प्रश्नाची उत्तरे तसेच योजनेची संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना काय आहे ?

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना हि ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींसाठी चालविण्यात येते. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असलेल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी सलंग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री सेवा क्षेत्र, ई. व्यवसायकरीता कर्जावरील व्याजाच्या रकमेचा परतावा उपलब्ध करून दिला जातो.

या योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी बँकेमार्फत लाभार्थ्याला १० लाख रुपये पर्यंतचे कर्ज वितरीत केले जाते.

लाभार्थ्याने या रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम ( १२% च्या मर्यादित ) लाभार्थ्याच्या आधार लिंक खात्यात दरमहा मंडळामार्फत जमा करण्यात येते.


PMEGP Loan Yojana :- 50 लाख रुपये पर्यंत कर्ज 35% सबसिडी प्रधानमंत्री स्वनिधी योजना : मिळवा विनव्याजी कर्ज पीएम विश्वकर्मा योजना, 1 ते 2 लाख रुपये कर्ज 5% व्याज दराने आमच्या Whatapp Group ला जॉईन व्हा

थोडक्यात, व्यवसायाकरिता बँके मार्फत १० लाखापर्यंत कर्ज मिळते, सदर कर्जाचे हप्ते नियमित परतफेड केल्यास योजने अंतर्गत १२% टक्के पर्यंत व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत मिळते. म्हणजेच व्याज परतावा मिळतो.      

उदाहरण :- समजा, एखाद्या पात्र व्यक्तीने योजने अंतर्गत बँके मार्फत १० लाख रुपयांचे कर्ज घेतले, सदर व्यक्तीने मिळालेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास, त्या व्यक्तीस व्याजाची रक्कम (१२% पर्यंत) त्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात महामंडळाद्वारे जमा करण्यात येते.


लक्षात असू द्या :- OBC Loan Scheme In Maharashtra

👉 जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर व्याज परतावा दिला जाणार नाही.   

👉 महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेले योग्य व्याज रक्कम अदा करेल, याऐवजी इतर कोणतेही Charges/ Fees / देयक अदा करणार नाही.

👉 या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना अदा करण्यात येणारी व्याज परताव्याची रक्कम हि अनुदान स्वरुपात अदा करण्यात येईल.

👉 कर्ज व्याजाची परतफेड करण्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 5 वर्षे असेल.


पात्रता व निकष :- OBC Loan Scheme In Maharashtra

  • अर्जदार हा इतर मागासवर्गीय असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे वय हे कमीत कमी १८ व कमाल वय हे ५० वर्षे असावे.
  • अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावे.
  • अर्जदाराने ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसावा.
  • लाभार्थी कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • या योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकदाच घेता येऊ शकतो.
OBC Loan Scheme in Maharashtra, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, OBC Mahamandal Loan Scheme

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील ?

  • आधार कार्ड
  • पॅण कार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र ( आठ लाखापेक्षा कमी )
  • जातीचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • उद्यम नोंदणी किंवा शॉप अक्ट लायसन्स

योजनेसाठी अर्ज कसा करावा ? OBC Mahamandal Loan Scheme

https://msobcfdc.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. अथवा जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना तुम्हाला सर्व प्रथम तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. त्यात तुम्हाला तुमची बेसिक माहिती विचारली जाईल. जसे वैयक्तिक माहिती, पत्ता, कुटुंबिक माहिती, उद्योगाचे नाव इ. माहित विचारली जाईल.

त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेले कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागेल. सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड झाल्यावर अर्ज सबमिट करावा.

OBC Mahamandal Loan Scheme

त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल, तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर, तुम्हाला ओबीसी महामंडळा कडून एक LoI लेटर  जारी केले जाईल, LoI लेटर हे तुमच्या लॉगीन मध्ये दिसेल. तुम्हाला LOI लेटर प्राप्त झाल्यास तुमचा अर्ज महामंडळा कडून मंजूर झाला आहे असे समजावे.

ओबीसी महा मंडळाकडून मिळालेले LOI लेटर घेऊन तुम्हाला बँक मध्ये घेऊन जायचे आहे. व बँकेला कर्जाची मागणी करायची आहे, बँक जे कागदपत्रे सांगतील ते कागदपत्रे तुम्हाला बँकेला आणून द्यायचे आहे. जर तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी अडचणी येत असेल तर, तुम्ही ओबीसी महा मंडळाच्या हेल्पलाईन क्रमांकवर कॉल करून संपर्क साधावा.

मंजूर झाल्यावर तुम्हाला Loan Sanction Letter, ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावे लागेल.  

( इथे लक्षात असू ध्या :- जो पर्यंत तुमचा अर्ज ओबीसी महामंडळाद्वारे मंजूर होत नाही, तो पर्यंत तो अर्ज तुम्ही बँकेमध्ये घेऊन गेला तरीही त्या अर्जाचा काही उपयोग होत नाही. पण तुम्ही या अर्जाची मंजुरी ( LOI Letter ) घेऊन, बँक मध्ये गेले तरच ओबीसी महामंडळाकडून तुम्हाला १२% प्रमाणे व्याज परतावा मिळतो.)

OBC Loan Scheme in Maharashtra
योजनेचे नाववैयक्तिक कर्ज व्याज परतावा
विभाग महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
लाभार्थीOBC व्यक्ती
लाभव्याज परतावा 12% पर्यंत
शासन निर्णय येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
वेबसाईटhttps://msobcfdc.in/
श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार योजना
संपर्क2527 5374 | 2529 9685

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रु. १० लक्ष पर्यंतची कर्ज योजना, बद्दलची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. व्यवसाय असणाऱ्या किंवा नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या ओबीसी युवकांपर्यंत या योजनेची हि माहिती पोहचावा, जेणेकरून अधिक लोकांना या योजनेचा फायदा घेता येईल. नक्कीच ओबीसी समाजातील अनेक युवकांना या योजनेचा लाभ होऊ शकेल.


नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न :-

1. कर्ज मिळवण्यास अडचणी येत आहे ?

👉 2527 5374 / 2529 9685 अथवा homsobcfdc@gmail.com या वरती संपर्क साधावा.

2. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा या योजनेचा लाभ कुटुंबातील किती व्यक्तींना या योजनेचा मिळू शकतो?

👉 एकावेळी कुटुंबातील एकाच पात्र व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.

3. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना कोणासाठी आहे ?

👉 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना हि, इतर मागासवर्गीय (OBC ) 18 ते 50 वयोगटातील व्यवसाईक किंवा नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे.

Leave a Comment