नुकसान भरपाई : नव्या वर्षात शासनाने दिले गिफ्ट शेतकऱ्यांना मिळणार वाढीव Nuksan Bharpai – 2024

सर्व शेतकरी बांधवाना आनंदाची बातमी नुकसान भरपाई ला वाढीव मदत जाहीर. नोव्हेंबर, २०२३ किंवा त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीटी व इतर नैर्सगिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसनीकरता वाढीव निधीस  दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी शासन निर्णया द्वारे मान्यता देण्यात आली आहे. सदर निधी हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF द्वारे दिला जातो.

SDRF काय आहे ?

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, सन २००५ मधील कलम ४८(२) अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( SDRF ) ची स्थापना करण्यात आली.

👉 SDRF निधी हा राज्यांमध्ये उद्भवणाऱ्या विविध नैर्सगिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे.

👉 या निधीमध्ये केंद्र शासनाचा ७५% तर राज्य शासनाकडून २५% अंशदान देण्यात येते.

SDRF निधी मध्ये कोणकोणत्या नैसर्गिक आपत्तीचा समावेश आहे ?

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरळ कोसळणे, बर्फखंड कोसळणे ( हिमवृष्टी ), ढगफुटी, थंडीची लाट व कड्याकीची थंडी अश्या १२ नैसर्गिक आपत्तीचा SDRF निधी मध्ये समावेश आहे.

केंद्र शासनाने जारी केलेल्या १२ नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त महसूल व वन विभागद्वारे  घेतलेला शासन निर्णय, दिनांक ३० जानेवारी २०१४ व दिनांक २२ जून २०२३ अन्वये घोषित अवकाळी पाऊस, विज कोसळणे, अतिवृष्टी, त्सुनामी आणि आकस्मित आग तसेच सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील दिला जाईल. हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( SRRF ) द्वारे ठरवलेल्या दरानुसार दिला जातो.

हे हि वाचा :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना – २०२४

नोव्हेंबर २०२३ , व त्यानंतरच्या कालवधीत, झालेला अवकाळी पाऊस व गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. सदर नुकसान भरपाई देण्याकरीता, शासना मार्फत मागील काळात शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या निधी पेक्षा जास्त निधी देण्याकरिता करिता शासन विचाराधीन होते. दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी या विषयी मंत्रीमंडळात बेठक घेण्यात आली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे नोव्हेबर, २०२३ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट व त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे झालेल्या नुकसानी करिता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF निकषांबाहेर मदत करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.


पिकांसाठी वाढीव दर :-

नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटी मुळे अन्नदाता बळीराज्याचे खूप मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसाना मुळे सर्व क्षेतकरी बांधव अडचणीत सापडले. तसेच राज्यातील भरपूर शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून मोठ्या मानाने दिवसरात्र घाम गळून, रक्ताच पाणी एक करून शेतामध्ये पिक उभे केले. व त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळणारच होते तेवढ्यात अचानक अवकाळी पाऊस व गारपीटी सुरु झाल्या व त्याने केलेल्या मेहनीतीवर पाणी फेरले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत म्हणून पिकांसाठी वाढीव दर दिला. पिकांचे नुकसान भरपाई दर आधी किती होते ? आता पिकांचे पिकांचे नुकसान भरपाई वाढीव दर किती करण्यात आले ? ते बघू या.

नुकसान भरपाई :- ( Nuksan Bharpai )

शासना मार्फत नुकसान भरपाई हि शेतकऱ्यांना तीन पिकांना वेगवेळ्या प्रकारे मदत म्हणून दिली जाते.

१.    जिराईत पिक २. बागायत पिक ३. बहुवार्षिक पिक ( फळबाग )

जिराईत पिक :-

👉 जे पिक पावसाच्या पाण्यावर घेतल्या जाते म्हणजेच जिराईत पिक अश्या पिकांसाठी नुकसानभरपाई दर निच्छित करण्यात येते.

👉 SDRF प्रचलित ( चालू ) दर हे पूर्वी रु ८,५०० रु प्रति हेक्टर असे होते. सदर लाभ हा २ हेक्टर करिता मर्यादीत होता.

👉 जिराईत पिकांसाठी नवीन वाढीव मदत दर हा ८,५०० रु प्रति हेक्टर वरून १३,६०० रु प्रति हेक्टर इतके करण्यात आले. तसेच क्षेत्रासाठी २ हेक्टर वरून ३ हेक्टर मर्यदे पर्यंत सदर अनुदान देण्यात येणार आहे.


बागायत पिक :-

👉 बागायत पिकांसाठी मदत दर आधी १७,००० रु प्रति हेक्टर व जास्तीत जास्त २ हेक्टर पर्यंत दिल्या जात होते.

👉 परंतु आता बागायत पिका साठी वाढीव मदत हि १७,००० रु प्रति हेक्टर वरून २७,००० हजार रु प्रति हेक्टर करण्यात आले. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र लाभ २ हेक्टर वरून वाढवून ३ हेक्टर मर्यादे पर्यंत करण्यात आला.


बहु वार्षिक पिक ( फळबाग ) :-

👉 बहु वार्षिक पिकाचे अनुदान हे आधी २२,५०० रु इतके होते तर जास्तीत जास्त २ हेक्टर मर्यादे पर्यंत मदत मिळत असे.

👉 परंतु आता बहु वार्षिक पिका साठी वाढीव मदत २२,५०० रु प्रति हेक्टर वरून ३६,००० रु प्रति हेक्टर इतके करण्यात आली आहे. तसेच जास्तीत जास्त लाभ २ हेक्टर मर्यादा वरून ३ हेक्टर मर्यादे पर्यंत करण्यात आले.


सोप्या भाषेत चार्ट द्वारे कोणत्या पिकांना किती वाढीव मदत मिळाली ते बघू या.

अ. क्र.पिकेचालू दर ( SDRF )मदतीचे वाढीव दर
१.     जिराईत पिक८,५०० रु प्रति हेक्टर, जास्तीत जास्त २ हेक्टर मर्यांदा१३,६०० रु प्रति हेक्टर, जास्तीत जास्त ३ हेक्टर मर्यादा
२.    बागायत पिक१७,००० रु प्रति हेक्टर, जास्तीत जास्त २ हेक्टर मर्यांदा२७,००० रु प्रति हेक्टर, जास्तीत जास्त ३ हेक्टर मर्यांदा
३.     फळबाग२२,५०० रु प्रति हेक्टर, जास्तीत जास्त २ हेक्टर मर्यांदा३६,००० रु प्रति हेक्टर, जास्तीत जास्त ३ हेक्टर मर्यांदा

मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे. तसेच शेतपिकांचे नुकसानी करिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान देय राहील.

Nuksan Bharpai – 2024
लाभार्थीशेतकरी
शासन निर्णययेथे क्लिक करा

निष्कर्ष :-

मंत्रीमंडळाच्या बेठकी मध्ये घेण्यात आलेल्या  निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना वाढीव मदतीची घोषणा करतांना म्हणाले.

Leave a Comment