नमस्कार मिंत्रानो, आज आपण, माझा व्यवसाय व शासकीय परवाने या ( My Business and Government Licencs ) या बद्दल माहिती घेणार आहोत.
कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनदप्तरी त्या व्यवसायाची नोंद करणे बंधनकारक असून, जर तुम्ही व्यवसाय करत असला तर तुमच्या व्यवसायाची नोंदणी तुम्ही online पद्धतीने नोंदवू शकतात, चला तर बघूया कोणत्या व्यवसायासाठी कोणकोणते परवाने लागतात ?
उद्यम नोंदणी (Udyam Registration) :- माझा व्यवसाय व शासकीय परवाने
जर तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा उद्योग करात असाल, उदा. सूक्ष्म, लहान, माध्यम वर्गातील तुम्ही व्यवसाय करत असाल तर, तुम्ही ऑनलाईन उद्यम नोंदणी साठी अर्ज करून भारत सरकार द्वारे चालवणाऱ्या व्यवसाईक योजनेचा लाभ घेऊ शकतात.
उद्यम नोंदणी हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे, हे प्रमाणपत्र लघु व मध्यम उद्योग व्यवसायाची ओळख निर्माण करते. या आधी या प्रमाणत्राचे नाव उद्योग आधार असे होते..
उद्यम नोंदणी हि आधार कार्ड, Pan नंबर, बँक पासबुक व स्वघोषणा आधारे केली जाते.
उद्यम नोंदणी साठी शासना कडून कोणतेही शुल्क घेतल्या जात नाही, उद्यम नोंदणी हि विनामुल्य पेपरलेस आहे. उद्यम नोंदणी हि सर्व MSME साठी अनिवार्य आहे.
उद्यम नोंदणी पूर्ण झाल्यावर साधारण ५ ते ६ दिवसामध्ये अजर्दाराला ई – उद्यम प्रमाणपत्र मिळते.
उद्यम नोंदणी केल्यामुळे उद्योजकाला कमी व्याज दरामध्ये कर्ज, सरकारी टेंडर, वीज बिल सूट, करार सूट, मुद्रा कर्ज योजना, शासकीय योजना ई. लाभ मिळतो.
उद्यम नोंदणी करण्यासाठी वेबसाईट लिंक 👉 येथे क्लिक करा अथवा जवळच्या महा-ई सेवा केंद्र / CSC मध्ये जाऊन उद्यम नोंदणी करू शकतात.
शॉप ॲक्ट लाईसन्स (Shop act License ) / गुमास्त परवाना / दुकान कायदा परवाना :-
कोणताही व्यवसाय करायचा म्हटले कि सर्वात महत्वाचा परवाना म्हणजे शॉप ॲक्ट लाईसन्स.
नवीन उद्योग, व्यवसाय, हॉटेल किंवा दुकान यासाठी शॉप ॲक्ट लायसन्स काढणे गरजेचे आहे, तुम्ही ग्रामीण भागात अथवा शहरी भागामध्ये व्यवसाय करत असाल तरी हे लायसन्स तुमच्याकडे असालाच हवे, जर तुमच्याकडे हा परवाना नसलातर, तुमचा व्यवसाय हा कायदेशीर मान्यताप्राप्त नाही असे ग्राह्य करण्यात येते, व भविष्यात तुम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.
कायद्या अंतर्गत प्रत्येक नवीन व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराने स्वत: व्यवसायाची नोंदणी करून, करत असलेल्या व्यवसायाचा परवाना काढून घेणे खूप गरजेचे आहे, तसेच नवीन व्यवसाय/ दुकान सुरु केल्यापासून दुकानदाराने ३० दिवसाच्या आत दुकान कायदा परवान्यासाठी नोदणी अर्ज करणे आवश्यक आहे.
शॉप ॲक्ट लायसन्स काढण्यासाठी कागदपत्रे :-
१. मालकाचा पासपोर्ट साईज फोटो व सही
२. आधार कार्ड
३. लाईट बिल
४. दुकानाचा मराठी बोर्डसह फोटो
५. स्वयं घोषणा पत्र
शॉप ॲक्ट लायसन्सची नोंदणी करण्यासाठी तुम्ही स्वत online https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईट वरून किंवा जवळच्या महा-ई सेवा केंद्र किंवा CSC मध्ये जाऊन नोंदणी करू शकतात.
फूड लायसन्स / अन्न भेसळ (Food License ) :-
व्यवसाय करण्यासाठी शॉप ॲक्ट लायसन्स काढणे गरजेचे असते, त्याच प्रकारे ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ विकले किंवा बनवले जातात, अशा सर्व व्यवसाईकांना फूड लायसन्स काढणे अनिवार्य असते.
जर तुम्ही बेकरी, हॉटेल किंवा एखादा फूड व्यवसाय करत असाल तर तुम्हाला कायदेशीर नोंदणी करणे गरजेचे आहे.
फूड लायसन्स काढण्यासाठी कागदपत्रे :-
१. आधार कार्ड
२. पासपोर्ट फोटो
३. पत्ता पुरावा (लाईट बिल रेंट अग्रीमेंट)
४. ग्रामपंचायत किंवा नगरपालिका नाहरकत प्रमाणपत्र
फूड लायसन्स परवाना हा १ ते ५ वर्षासाठी काढता येतो, त्यानंतर फूड लायसन्सची मुदत संपल्या नंतर ३० दिवसाच्या आत रिन्यूव करणे गरजेचे आहे, तसे न केल्यास तुम्हाला तुमचा परवाना नुतनीकर करता येत नाही, परत तुम्हला फूड लायसन्स साठी FBO नवीन अर्ज सादर करावा लागेल.
फूड लायसन्स काढण्यासाठी नोंदणी कुठे करायची ?
फूड लायसन्सची नोंदणी करण्यासाठी अधिकृत फूड सेफ्टी मित्रा कडे किंवा तुम्ही स्वत online किंवा जवळच्या महा-ई सेवा केंद्र किंवा CSC मध्ये जाऊन नोंदणी करू शकतात.
https://foscos.fssai.gov.in/ या स्थळावरून जाऊन तुम्ही स्वत: नोंदणी करू शकतात.
My Business and Government Licencs
४. GST नोंदणी (GST Registration) :-
जर तुम्ही व्यवसाय करत असतांना तुमची वार्षिक उलाढाल हि ४० लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला GST नंबर काढणे गरजेचे आहे. या आधी GST नंबरसाठी वार्षिक उलाढाल हि २० लाखापेक्षा जास्त असेल तर GST नंबर काढावा लागत होता. परुंतु आता हि लिमिट वार्षिक ४० लाख रु पर्यंत करण्यात आली. वार्षिक ४० लाख रुपये पेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या सर्व व्यवसायीकांना GST नोंदणी करणे गरजेचे आहे, या अंतर्गत नोंदणी केल्याशिवाय कोणतीही व्यवसायीक संस्था व्यवसाय करू शकत नाही.
जर तुम्ही उत्तर-पूर्वेकडील, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील असाल तर वार्षिक उलाढाल किमान १० लाख रु असावी.
GST अंतर्गत नोंदणी न केल्यास किंवा उशिरा GST नोंदणी केल्यास दंड :-
जर तुम्ही कर भरला नाही किंवा देय रकमेपेक्षा कमी कर भरला तर देय रकमेच्या १०% दंड आकारला जातो किंवा किमान १०००० रु पर्यंत दंड असतो.
GST नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१. आधार कार्ड
२. Pan कार्ड
३. बँक तपशील ( बँक स्टेटमेंट, कॅन्सल चेक किंवा पासबुक )
४. पासपोट फोटो
५. व्यवसाय पत्ता पुरावा
६. व्यवसाय नोदणी प्रमाणपत्र
७. डिजीटल स्वाक्षरी
८. अधिकृत स्वक्ष्ररी करणारे अधिकृत पत्र
निष्कर्ष :-
मित्रांनो, या लेख मध्ये आम्ही तुम्हाला माझा व्यवसाय व शासकीय परवाने ( My Business and Government Licencs ), व्यवसाय करतांना कोणकोणते शासकीय परवाने काढावे लागतात या बद्दल महिती दिली आहे. नक्की तुम्हाला हि माहिती उपयोग पडेल, मला आशा आहे कि आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल. तुमच्या व्यवसाय सुरु करणाऱ्या मित्रांना हि माहिती शेअर करून जातिस्त जास्त व्यवसाईक लोकांपर्यंत पोहचवाल.
2 thoughts on “माझा व्यवसाय व शासकीय परवाने My Business and Government Licencs : 2023-24”