Mukhyamantri Vayoshri Yojana : जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रु. | मुख्यमंत्री वयोश्री योजना

Mukhyamantri Vayoshri Yojana in Marathi :- मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ? या योजनेसाठी कोण पात्र आहे ? योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ? योजनेसाठी कुठे अर्ज करावा ? मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

दिनांक 5 फेबुवारी 2024 रोजी, कैबीनेट बैठक मध्ये मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा केली.

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ? ( Mukhyamantri Vayoshri Yojana Kay aahe?)

राज्य सरकार द्वारे 65 वयापेक्षा जास्त वयवृद्ध असलेल्या लोकांसाठी, वयानुसार आवश्यक असलेले साह्य साधने व उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते.

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार, 65 वयापेक्षा जास्त वयवृद्ध असलेल्या व्यक्तींसाठी आर्थिक मदत म्हणून 3000 रुपये देणार आहे. सदर रक्कम हि थेट लाभार्थ्याच्या खात्यात DBT प्रणाली द्वारे आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना, Mukhyamantri Vayoshri Yojana in Marathi

महाराष्ट्र राज्यात 65 वयापेक्षा जास्त वय असेलेले अंदाजित 10 ते 12% टक्के ( 1.25 ते 1.50 करोड ) जेष्ठ नागरिक आहे. त्यापैकी कोणत्या ना कोणत्या जेष्ठ नागरिकांना वाढत्या वयमाणामुळे अपंगत्वाचा किंवा अशक्तपणा सामना करावा लागतो.

सदर बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने दारिद्र रेषेखालील संबधित दिव्यांग/दुर्बलता ग्रस्त जेष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने व उपकरणे पुरवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली.


👇 महाराष्ट्र राज्यातील इतर योजना 👇

मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना


उपकरणे खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य :-

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत लाभार्थी वृद्धाना खालील उपकरणे व साधने खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये अर्थ सहाय्य करण्यात येते.

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत उपकरणे खरीदीसाठी सहाय्य
1चष्मा
2नि-ब्रेस
3श्रवणयंत्र
4लंबर बेल्ट
5कमोड खुर्ची
6फोल्डिंग वॉकर
7सर्वाइकल कॉलर
8ट्रायपॅड, स्टिक व्हील चेअर इ.

तसेच या योजनेअंतर्गत कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले व राज्य शासना मार्फत नोंदणीकृत कृत योगोपचार केंद्र, मनशक्ती केंद्र, मन:स्वस्थ केंद्र / प्रशिक्षण केंद्रावर सहभागी होता येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi | मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :- Mukhyamantri Vayoshri Yojana Document

  1. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
  2. राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक
  3. पासपोर्ट साईज फोटो
  4. ओळख पटवण्यासाठी अन्य कागदपत्रे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कसा करायचा :-

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने जवळच्या ग्रामपंचायत / नगरपंचायत येथे करता येईल किंवा समाज कल्याण ऑफिसमध्ये करता येईल. योजनेचा ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

फॉर्ममध्ये विचारल्या प्रमाणे योग्य माहिती भरा व फॉर्म सोबत असलेली आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत / नगरपंचायत ऑफिस मध्ये अर्ज जमा करा.

Mukhymantri Vayoshri Yojana in Marathi
योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थी65 वर्षावरील जेष्ठ नागरिक
लाभतीन हजार रुपये
अर्ज प्रकियाऑफलाईन
योजनेचा अर्जयेथे क्लिक करा
शासन निर्णय येथे क्लिक करा
राज्यमहाराष्ट्र
श्रेणीराज्य सरकार योजना
Mukhyamantri Vayoshri Yojana in Marathi

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता व नियम :- Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility

👉 लाभार्थी हा जेष्ठ नागरिक असावा.

👉 लाभार्थ्याचे वय 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झाले पाहिजे.

👉 पात्रतेसाठी लाभार्थ्याने जिल्हा प्रधीणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन पुरावा किंवा राज्य अथवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजने अंतर्गत वृद्धकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा.

👉 लाभार्थ्याचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2 लाखाच्या आत असायला हवे. त्याबाबतचे स्वघोषणापत्र सादर करणे अनिवार्य.

👉 लाभार्थ्याने मागील तीन वर्षात, शासनामार्फत सार्वजनिक उपक्रमात तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नाही. याबबतचे लाभार्थ्याने स्वघोषणापत्र सादर करणे अनिवार्य.

👉 लाभार्थ्याच्या खात्यात 3000 रु. योजनेअंतर्गत जमा झाल्यानंतर, उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थी देयक ( Invoice ) प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत CPSU संस्थेमार्फत विकसीत पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थ्याकडून योजनेअंतर्गत दिलेली रक्कम वसूल करण्यात येईल.

👉 जिल्हांमध्ये 30 टक्के या महिला लाभार्थी असेल असतील.

निष्कर्ष :-

महाराष्ट्र शासना मार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना जेष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वकांशी योजना आहे. जेष्ठ नागरिकांना वृद्ध काळात वाढत्या वयानुसार अपंगत्व किंवा अशक्तपणा जाणवतो, त्यासाठी जेष्ठ नागरिकांना या योजने अंतर्गत आवश्यक असलेले उपकरणे जसे :- चष्मा, श्रवणयंत्र, कमोड खुर्ची ई. घेण्यासाठी आधार म्हणून तीन हजार रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाते.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न :

1. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ कुणाला मिळेल?

👉 मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ 65 किंवा 65 पेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे.

2. मुख्यमंत्री वयोश्री योजनेंअंतर्गत जेष्ठ नागरिकांना किती लाभ दिला जाईल ?

👉 जेष्ठ नागरिकांना योजनेंअंतर्गत तीन हजार रुपये एवढा लाभ दिला जाईल.

3. मुख्यमंत्री वयोश्री योजना कुणामार्फत चालवल्या जाते?

👉 मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालवण्यात येते.

Leave a Comment