Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांतील जेष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडविण्यासाठी “ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना “ सुरु करण्याची करण्याची मान्यता जुलै 2024 मध्ये सरकार द्वारे देण्यात आली.
योजनेअंतर्गत प्रवास प्रकिया कशी असेल ? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा अर्ज कसा करावा ? योजनेच्या पात्रता तसेच अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील ? याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आज आपण बघू या.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना काय आहे ?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घेण्यासाठी मोफतमध्ये लाभ मिळतो. तीर्थ दर्शनासाठी होणारा खर्च हा महाराष्ट्र सरकार द्वारे करण्यात येतो.
राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडावे म्हणून “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली. या योजनेचा लाभ हा राज्यातील 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले जेष्ठ नागरिकांना दिला जातो.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील व भारत देशातील काही प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असेल. तसेच या तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी प्रति व्यक्ती 30,000 रु. पर्यंत खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवास, भोजन, निवास ई. सर्व बाबींचा खर्च समावेश असेल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये समविष्ट असलेले तीर्थ कोणते ?
भारतातील 73 तर महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळे या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या तीर्थस्थळांची लिस्ट बघा👇👇
Mukhyamantri teerth darshan list
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची प्रवास प्रक्रिया कशी असेल ?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्याचा असले तर, गावातील जेष्ठ लोकांनी मिळून एक गट तयार करावा. प्रवासासाठी शासनाने गटाची प्रवासी संख्या ठरवली आहे. गटातील प्रवासी संख्या पूर्ण झाल्यावरच तीर्थदर्शनाचा प्रवास सुरु होईल.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा प्रवास हा फक्त आणि फक्त एकत्रितपणे आयोजित केला जाईल.
- योजने अंतर्गत निवडलेल्याच व्यक्तीलाच प्रवास करता येईल.
- इतर लोकांची प्रवासासाठी खर्च देण्याची तयारी असली तरीही त्यांना सोबत जाऊ दिल्या जाणार नाही.
- प्रवासादरम्यान प्रवाश्याला निवड न झालेल्या किंवा इतर कोणतेही नातेवाईक तसेच लहान मुले इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिल्या जाणार नाही.
- जिल्हास्तरीय समिती मार्फत जेष्ठ नागरिकांची निवड करून प्रवाशांची यादी अधिकृत टुरिस्ट कंपनी/ एजन्सीला देईल.
- सदर टुरिस्ट कंपनी/ एजन्सी तीर्थदर्शनाच्या प्रवासासाठी प्रस्थापनाची व्यवस्था करेल. प्रवाशांना कोणत्या सुख सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल.
- प्रवास सुरु झाल्यावर, प्रवाश्याला मध्यभागी प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकार कडून तशी सुविधा दिली जाणार नाही. विशेष परिस्थितीत प्रवास सोडणे आवश्यक असल्यास, उपस्थितीत मार्गदर्शकच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवागी देण्यात येईल.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
या जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनासाठी नेता येईल सोबत जीवनसाथी किंवा सहाय्यक :-
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला प्रवासामध्ये नेण्याची परवानगी असेल. परंतु अर्जदाराने अर्ज करत्यावेळी अर्जामध्ये जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवास करू इच्छितो असे नमूद करायला हवे.
- 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकाच्या जोडीदाराचे किंवा सहाय्यकाचे वय 60 वर्षा पेक्षा कमी असले तरीही ते अर्जदारासोबत प्रवास करू शकेल.
- अर्जदाराचे वय हे 75 वर्षे पेक्षा जास्त असेल व त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल तरच त्याला तीर्थ दर्शनासाठी सहाय्यक घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध होईल
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पात्रता :-
- लाभार्थी जेष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- लाभार्थ्याचे वय हे 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
- कुटुंबिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी प्रवासासाठी शाररीक रित्या तंदुरुस्त असावा. तसेच त्याला कोणताही संसर्गजन्य रोग नसावा.
अपात्रता :- Mukhyamantri Teerth Darshan Yojana
- कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल तर
- कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करत असेल तर किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असेल तर
- कुटुंबातील सदस्य आमदार/ खासदार असेल तर
- चारचाकी वाहन असले तर (ट्रॅक्टर वगळून)
- शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे शारीरिक दृष्ट्या निरोगी असल्याचे प्रमाणपत्र. ( हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे.)
- जे लाभार्थी मागच्या वेळी लॉटरीमध्ये निवडले गेले होते, व त्यांना प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी पूर्ण प्रवास केला नाही, अश्या अर्जदारांना अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदाराने दिलेली माहिती खोटी किंवा कोणतेही तस्थे लपवून अर्ज केला असेल तर त्याला अपात्र ठरविण्यात येईल.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- हमीपत्र
- वय अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षा पूर्वीचे रेशनकार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला.
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे / केशरी रेशनकार्ड
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज :-
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Offline form pdfमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा अजून उपलब्ध झाली नसल्या मुळे तुम्हाला या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी 👉 Mukhyamantri Teerth Darshan Yojana Offline form 👈 येथे क्लिक करा.
ऑफलाईन अर्जामध्ये विचारल्या प्रमाणे योग्य ती माहिती भरून सर्व कागदपत्रे जोडावी. त्यानंतर जेष्ठ नागरिकांनी गट तयार करून जिल्हाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालय येथे अर्ज सादर करावा.
तसेच तीर्थदर्शन योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा 15-20 जेष्ठ नागरिकांचा गट करून सुद्धा अर्ज शकतात.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra | |
योजनेचे नाव | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |
सरकार | महाराष्ट्र सरकार |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
योजनेची सुरवात | जुलै 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्रातील 60 वर्षा वरील जेष्ठ नागरिक |
योजनेचा लाभ | मोफत तीर्थ स्थळांचे दर्शन |
प्रवास खर्च मर्यादा | 30,000 हजार रुपये पर्यंत |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
वेबसाईट | अजून प्रकाशित नाही |
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
श्रेणी | राज्य सरकार योजना |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पहिली ट्रीप अयोध्याला रवाना :-
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या यात्रेची सुरवात झाली असून, 30 सप्टेंबर रोजी जळगाव वरून 800 प्रवाशी तीर्थ दर्शनासाठी अयोध्याला रवाना झाले. दोन दिवस अयोध्येला थांबून हि ट्रीप परत 4 तारखेला जळगाव येथे पुन्हा परतली.
तीर्थदर्शनासाठी जिल्हातून 1077 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी या योजनेसाठी 800 लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली.