Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 | MSKVY – 2.0

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana:- नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० महाराष्ट्र या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Table of Contents

शेतकऱ्यांना सुवर्णसंधी !! :-  Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana

कालावधी ( अॅग्रीमेंट )वार्षिक भाडे दर
३० वर्षेप्रति एकर ५०,००० रुपये, ३% प्रति वर्ष वाढीव दर  

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व्यापक करण्याचा निर्णय :-

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ ४५ लाख पेक्षा अधिक शेतकरी विज ग्राहक आहे. शेतकरी म्हणजे देशांचा कणा, या बळीराजाला आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सदैव तप्पर राहिले आहे. मग दुष्काळ असो अथवा अतिवृष्टी.

कृषी पंपाना, राज्यात कधी दिवसा, तर कधी रात्री, आळीपाळीने वीज पुरवठा करण्यात येतो. पण रात्री पिकांना पाणीपुरवठा करतांना शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. हा  प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस यांनी जून २०१७ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत आतापर्यंत ५१३ मेगावॉट चे सौर कृषी प्रकल्प कार्यालयीत झाले आहे. त्यातून लाखभर शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा विजपुरवठा होतो.


प्रधानमंत्री सूर्योदय योजना लेक लाडकी योजना

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री माननीय देवेंद्र फडवणीस यांनी खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व्यापक करण्याची निर्णय घेतला. मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री मंडळाने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो महत्वाचा निर्णय असा कि, राज्यात जून २०१७ मध्ये सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या नावाने सुरु करण्याचा.

Mukhymantri Saur Krishi Vahini Yojana In Marathi

मिशन २०२५ :-

भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा, शेतीसाठी विज मागणीचा सर्वाधिक वाटा आहे. कृषी पंपासाठी राज्यातील एकूण २२% विज ऊर्जेचा वापर करण्यात येतो. तसेच राज्यात वाढते उद्योग – व्यवसायासाठी वाढती  विजेची मागणी व इतर राज्याच्या तुलनेत कमी दरात विज पुरवठा करण्यासाठी जोरदार  विजेची मागणी होत आहे.

यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ( २०१७ ) या योजने मध्ये काही बदल करून नव्याने दुसरा टप्पा २०२३ मध्ये “ मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0” ( MSKVY 2.0 ) या नावाने सुरु केली. या योजनेसाठी जलदगतीने एकूण ७००० मेगावॉट विकेंद्रित सौर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्हात ३०% कृषी फिडर सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट “मिशन २०२५” म्हणून निश्चित केले. मिशन २०२५ नुसार, शेतकऱ्यांना दिवसा विज देण्यासाठी ०.५ मेगावॉट ते २५ मेगावॉट क्षमतेचे कृषी भार असलेले वितरण उपकेंद्रपासून ५-१० किमी अंतरावर सौर प्रकल्प स्थापित केले जाणार आहे.  

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, राज्याला होणार फायदा :-

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या प्रकल्पाचे मोठे फायदे आहे.

  • शेतकऱ्यांना दिवसा आणि भरोशाचे विज पुरवठा उपलब्ध होईल.
  • पडीत जमीन भाड्याने देऊन वार्षिक हेक्टरी सव्वालाख रु पर्यंत नियमित उत्पादनाची संधी उपलब्ध होईल.
  • ग्रामीण भागात हजारो रोजगार निर्मिती होईल.
  • ग्रामीण भागात विकासाला चालना मिळेल.
  • सौरऊर्जा प्रकल्पाचा माध्यमातून राज्यात तीस हजार कोटीची गुंतवणूक होईल.
  • शेतकऱ्यांना बळ देण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासात मोलाची भर घालणारे हे सात हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे अभियान आहे.   

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • जमिनीचा तपशील ( ७ – १२ / ८अ  )
  • बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक
  • पॅन कार्ड
  • सौर संयंत्रासाठी जागा
  • इतर तपशील

योजेसाठी अर्ज कसा करायचा ?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनेमध्ये भाग घेणाऱ्या स्वतंत्र कंपनी ( SPV ) यांच्या द्वारे काही जिल्ह्यात खाजगी आणि महसुली जमिनीचे एकत्रीकरण करणे चालू आहे. यांच्या द्वारे हि तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकतात. हळूहळू इतर जिल्यात SPV द्वारे इच्छुक शेतकऱ्यांचे जमिनी भाड्याने घेतल्या जाईल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ठळक माहिती :-

Mukhymantri Saur Krishi Vahini Yojana in Marathi
योजनामुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०
लाभार्थीखाजगी जमीन धारक / शेतकरी
विभागमहावितरण
श्रेणीमहाराष्ट्र सरकार योजना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
वेबसाईटयेथे क्लिक करा
शासन निर्णय८ मे २०२३
येथे क्लिक करा
ई-मेलsolarmskvy2@mahadiscom.in  

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मध्ये नवीन बदल कोणते ?

नाविन्यपूर्ण व्यवहार संरचना :-

  • महसुली जमिनीसाठी स्वतंत्र कंपनी ( SPV )
  • खाजगी आणि महसुली जमिनीचे एकत्रीकरण
  • बँक टू बँक लीज सबलीज; PPA-PSA व्यवस्था
  • कार्यक्रमासाठी समर्पित नोडल एजन्सी

शेतकऱ्यांच्या जमीनीसंबंधित समस्या सोडविण्यासाठी धोरण :-

  • प्रकल्पाची आंबलबजावणी SPV गठीत करून
  • SPV द्वारे जमीन भाड्याने घेतली जाणार
  • ना हरकत दाखले ( NOC ) SPV द्वारे घेतल्या जाणार
  • ४५ दिवसांची राज्यव्यापी जमीन शोध मोहीम
  • जिल्हाअधिकाऱ्यांचा सक्रीय सहभाग
Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 (MSKVY 2.0) मध्ये कोण भाग घेऊ शकतो?

  • शेतकरी
  • जमीन मालक
  • सहकारी संस्था
  • कॉर्पोरेट ( राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय दोन्ही )
  • सार्वजनिक उपक्रम ( राज्य आणि केंद्रीय स्तर दोन्ही )

योजने अंतर्गत भाग घेणाऱ्या धारकांसाठी प्रमुख प्रोत्साहने :-

  • या योजने अंतर्गत ११ के.व्ही. वर विज जोडणी करणाऱ्या प्रकल्पाधारकांना रु. ०.२५ प्रति युनिट आणि ३३ के. व्ही. विज जोडणी करणाऱ्या प्रकल्पधारकांना रु. ०.१५ प्रति युनिटप्रमाणे प्रोत्साहन ३ वर्षे कालावधीसाठी अनुदान देय राहील.
  • या अभियांनातर्गत आस्थापित सौर ऊर्जा प्रकल्प जोडण्यात आलेल्या विज उपकेंद्राच्या आवश्यक देखभाला आणि सुधारणांसाठी राज्य शासना मार्फत प्रति उपकेंद्र २५ लाख रु अनुदान देण्यात येईल.
  • या कार्यक्रमांतर्गत स्थानिक ग्रामपंचायतीसाठी प्रोत्साहन ५ लाख रुपये प्रति वर्ष अनुदान मिळेल. हे अनुदान ग्रामपंचायतीला प्रकल्प सुरु झाल्यावर ३ वर्षासाठी दिल्या जाईल.  
  • रेंट ने देणाऱ्या खाजगी जमीन मालकास  रु. १,२५,००० प्रति हेक्टर प्रमाणे जमिनीचे भाडे मिळेल, सोबत दरवर्षी  ३% दरवाढीसह अनुदान देण्यात येईल.

सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दिल्या जाणाऱ्या खाजगी जमिनीसाठी वाढीव मोबदला ( भाडे ) :-

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत खाजगी जमीनीचे नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या ६% दरानुसार परीगणित केलेला दर ( व्हॅल्युशन ) किंवा प्रतिवर्ष रु. १,२५,०००/- प्रति हेक्टर या पैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम भाडेपट्टा दर म्हणून गृहीत धरण्यात येईल. भाडेपट्टा दरावर प्रत्येक वर्षी ३% सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येईल. या आधी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ( २०१७ ) मध्ये ७५,०००/- प्रति हेक्टर, ३% वाढीव दर मिळत असे.

फसवणूकी पासून सावधान :-

  • योजनेसाठी ओळख नसलेल्या व्यक्तीकडून कॉल / व्हाटसअँप मेसेज आला तर त्याला प्रतिसाद देऊ नये.
  • महावितर फक्त VM-MSEDCL / VK – MSEDCL / JM-MSEDCL / AM-MSEDCL या सारख्या सेंडर आडी वरून एसएमएस पाठवते. महावितरण कोणत्याही वैयक्तिक मोबाईल नंबर वरून एसएमएस पाठवत नाही.
  • ऑनलाईन पेमेंट करतांना कोनाला हि otp शेअर करू नये.

मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना साठी संपर्क :-

पत्ता:

हॉंगकॉंग बँक बिल्डिंग, तिसरा आणि चौथा मजला, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई – 400001 महाराष्ट्र.

ई-मेल :

solarmskvy2@mahadiscom.in


2 thoughts on “Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 | MSKVY – 2.0”

Leave a Comment