Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana New Update : योजनेमध्ये झाले 7 बदल

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana New Update : दिनांक 02 जुलै 2024, रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अपडेट बद्दल सांगितले कि, महिलांना सुलभपणे योजनेचा लाभ मिळावा म्हणून या योजनेमध्ये काही बदल करण्यात येत आहे.

या योजनेमध्ये एकूण सात बदल करण्यात आले आहेत, योजनेमध्ये कोणते बदल करण्यात आले ते या लेखाच्या माध्यमातून बघू या.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana New Update :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी मुदत वाढ, अधिवास प्रमाणपत्रा बद्दल , शेतीची अट, वय मर्यादा, इतर राज्यातील महिला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि अविवाहित महिले बद्दल या अटी मध्ये बदल करण्यात आला.

योजनेची शेवटची तारीख :- लाडकी बहीण योजना अपडेट

👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची अर्ज करण्याची मुदत हि दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु अर्ज करण्याच्या या कालवधीत सुधारणा करण्यात येत आहे.

👉 आता योजनेची शेवटची तारीख दि. 31 ऑगस्ट, 2024 करण्यात येत आहे.

👉 लाभार्थी महिलांना 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करता येईल.

👉 तसेच महिलांनी योजनेसाठी अर्ज दि. 31 ऑगस्ट, 2024 ला भरला तरी, त्या महिलेला लाभ दि. 01 जुलै, 2024 पासून ग्राह्य धरून प्रतिमाह 1,500/- रु. चा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रतेमध्ये महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे

  • रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • जन्म दाखला
    • या 4 पैकी कोणतेही प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपडेट नुसार ग्राह्य धरण्यात येणार आहे.

शेतीची अट :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपडेट नुसार 5 एकर शेतीची अट ठेवण्यात आली होती, परंतु आता हि अट वगळण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना  अपडेट, Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana New Update

वय मर्यादा :- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana New Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 60 वर्ष वय गटाची अट ठेव्यात आली होती, आता त्या अटीमधील वय मर्यादा वाढवून 21 ते 65 वर्ष अशी करण्यात आली आहे.

महिलेचा जन्म इतर राज्यात झाला असेल तर :-

महाराष्ट्र सोडून महिलेचा इतर राज्यात जन्म झाला असेल तर, त्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर ती महिला योजनेसाठी पात्र होईल. यासाठी त्या महिलेला तिच्या पतीचे खालील पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.

  • जन्म दाखला
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • आधिवास प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा उत्पन्न दाखला महिले कडे नसेल तर, परंतु ज्या महिलेकडे कुटुंबाचे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल तर, त्या महिलांना उत्पन्न दाखल्याच्या प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आहे.

अविवाहित महिलांना लाभ :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आधी विवाहित महिलांना लाभ दिला जात होता, परंतू आता या योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला पण समाविष्ठ करण्यात आले आहे. अविवाहित महिलांना सुध्दा या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये एकूण सात बदल करण्यात आले.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :-

  1. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. हमीपत्र
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. अधिवास प्रमाणपत्र ( ज्या महिलांनाकडे 15 वर्षे जुने रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र या पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असेल अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही )  
  6. अडीच लाख रुपये पेक्षा कमी असलेला उत्पन्न दाखला. ( ज्या महिलांकडे कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर त्या महिलांना उत्पन्न दाखल्याची आवश्यक्यता नाही.  )  
  7. इतर राज्यातील महिलांसाठी कागदपत्रे   (लाभार्थी महिलेचा जन्म इतर राज्यात झाला असेल व तिचे पती हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असेल तर, त्या महिलेला तिच्या पतीचे डॉकुमेंट म्हणून जन्म दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आधिवास प्रमाणपत्र या पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडावे लागेल. )

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana New Update


पात्रता :- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Eligibility New Update

👉 महाराष्ट्र राज्यातील महिला

👉 21 ते 65 वयोगटातील महिला


अपात्रता :- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Disqualification New Update

👉 महिलेचे वय 65 वर्षा पेक्षा जास्त वय असेल तर

👉 महिलेचे वय 21 पेक्षा कमी असेल तर

👉 कुटुंबातील सदस्य आयकर दाता असेल तर

👉 कुटुंबिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखपेक्षा जास्त असेल तर

👉 कुटुंबात चार चाकी गाडी असेल तर ( ट्रॅक्टर वगळून )

👉 कुटुंबात कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन धारक असतील तर

Leave a Comment