Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: महिलांना मिळणार 1,500 रुपये महिना

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana in Marathi :- महाराष्ट्र सरकार द्वारे महिलांनासाठी “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना “ सुरु करण्याची करण्याची मान्यता देण्यात आली. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ? योजनेची पूर्ण माहिती माहित नाही ? चिंता करून नका, या लेखाच्या माध्यमातून “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ” ची संपूर्ण माहिती आपण बघून या.

तत्त्पुर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, या पोस्ट च्या माध्यमातून आज आपण “ Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 ” या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ? अर्ज कुठे करायचा ? योजनेसाठी कोणत्या महिलांना लाभ मिळेल ? कोणत्या महिलांना लाभ नाही मिळणार ? तसेच योजनेबद्दल संपूर्ण माहिती व योजनेमध्ये झालेले बदल बघणार आहे.


Table of Contents

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेमध्ये झालेले काही बदल :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकार ने दिनांक 12 जुलै 2024 रोजी योजनेची व्याप्ती वाढावी म्हणून काही बदल तसेच गाईडलाईन जारी केली ते पुढील प्रमाणे बघू या.

कुटुंबाची व्याख्या :-

पती पत्नी व त्यांचे अविवाहित मुले म्हणजे कुटुंब.

नवविवाहित महिला :-

नवविवाहित महिलेचे नाव रेशनकार्ड मध्ये लगेच लावणे शक्य नसल्यामुळे, विवाह प्रमाणपत्र असलेल्या महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणुन ग्राह्य धरण्यात येईल.

इतर राज्यात जन्म झालेल्या महिला :-

अश्या महिलांचे डोमोसियल डॉकुमेट म्हणून त्या महिलेच्या पतीचे आधार कार्ड, टी.सी. , अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच पतीचे 15 वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड व मतदान कार्ड पण ग्राह्य धरण्यात येणार आहे.

बँक खाते :-

पोस्ट ऑफिस मधील बँक खाते आता ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महिलेचा फोटो :-

अर्ज भरण्यासाठी महिलेचा लाइव्ह फोटो ची आवश्यकता नाही, फोटो वरून फोटो काढला तरी चालेल.

पात्र महिलांची अंतिम यादी :-

गाव चावडीवर वाचन करण्यात येईल. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येईल.

मानधन :-

बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका, मदत कक्ष, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक व आपले सेवा केंद्र यांना 50 रु प्रति पात्र अर्जानुसार मानधन मिळणार.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे तरी काय ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, अंतर्गत महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे, दरमहा 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहे.

राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबामध्ये महिलांना निर्णायक भूमिका घेता यावी, म्हणून “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना “ राज्यात शासना तर्फे लागू करण्यात आली.

योजनेचा उद्देश :-

👉 राज्यातील महिलांना व मुलींना पुरेश्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे व रोजगार निर्मितीला चालना देणे.

👉 महिलांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.

👉 महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.

👉 महाराष्ट्र राज्यातील महिलां व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.

👉 महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले लहान मुलांच्या आरोग्यात आणि पोषणामध्ये सुधारणा व्हावी.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा कोणाला मिळणार लाभ :-

👉 लाभार्थी महिला हि महाराष्ट्रामध्ये रहिवाशी असावी.

👉 योजनेसाठी विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र.

👉 महिलेचे वय हे 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.

👉 लाभार्थी महिलेकडे स्वत:चे बँक खाते असणे आवश्यक आहे.

👉 लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा या महिलांना मिळणार नाही लाभ :-

👉 अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आलेले कुटुंब.

👉 घरात कुणी tax भारत असेल तर

👉 कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर ( बाह्य यंत्रणाद्वारे कोणी कार्यरत असेल किंवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही. )

👉 लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर योजनेमधून दीड हजार रुपये पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर.

👉 कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर. ( ट्रॅक्तर सोडून )

👉 लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार आहे.

👉 ज्यांचा कुटुंबातील सदस्य हे राज्य सरकार किंवा भारत सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन / बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष / उपध्यक्ष/ संचालक किंवा सदस्य असेल तर.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्रे लागतील ? Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Required Documents?

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. हमीपत्र
  4. अर्जदारचा पासपोर्ट फोटो
  5. रेशन कार्ड ( शिधा पत्रिका )
  6. उत्पन्न प्रमाणपत्र ( केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड असेल तर आवश्यक्यता नाही)
  7. अधिवास प्रमाणपत्र / जन्म दाखला ( अधिवास प्रमाणपत्र नसेल तर,15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा शाळेचा दाखला पण चालेल )

योजनेचा अर्ज कसा करा ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योनेसाठी अंगणवाडी सेविके मार्फत अर्ज करतात येतो.

ऑनलाईन अर्ज :- ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Application/Form )

👉 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविके मार्फतच भरल्या जाईल.

👉 तसेच याआधी मोबाईल अॅपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चे फॉर्म भरता येत होते. परंतु आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जावे लागेल. तेथून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकाल.

👉 या योजनेसाठी पात्र महिलांना अर्ज करता येईल.

👉 अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया विनामुल्य असेल.


असा भरा ऑफलाईन अर्ज :- ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Offline Application/Form )

  • ज्या महिलांना काही कारणामुळे ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल, तर त्या महिलांना ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 👇 ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करा 👇
  • वरील 👆 ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा.
  • अर्ज भरण्याची ऑफलाईन सुविधा अंगणवाडी केंद्रा मध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.
  • वरील भरला गेलेला ऑफलाईन फॉर्म, नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकाद्वारे ऑनलाईन केला जाईल.
  • ऑफलाईन अर्ज यशस्वीरित्या ऑनलाईन भरल्या नंतर, महिलेला पोच पावती दिली जाईल.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana GR Pdf :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शासन निर्णय बघा 👇

शासन निर्णय

लाभाची रक्कम कशी मिळणार :- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana in Marathi

लाभार्थी महिलेला DBT पद्धतीने आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत 1,500 रुपये जमा करण्यात येतील. हि रक्कम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालया मार्फत दिली जाईल.


Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana – 2024
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
सरकारमहाराष्ट्र सरकार
विभागमहिला व बाल विकास
योजनेची सुरवात1 जुलै 2024
लाभार्थीमहाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला
लाभ1,500 रुपये महिला
अर्ज प्रकियाऑनलाईन
अँप येथे क्लिक करा
शासन निर्णय येथे क्लिक करा
श्रेणीराज्य सरकार योजना
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply

👇 महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना बघा 👇

महाराष्ट्र राज्य अर्थ संकल्प 2024-25 सलोखा योजना : मिटवा शेतीचे वाद


नेहमी विचाले जाणारे प्रश्न :-

1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा अर्ज कुठे करायचा ?

👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज हा अंगणवाडी सेविकेकडे करतात येईल.

2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला किती लाभ दिला जाईल ?

👉 दर महा 1,500 रुपये

3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळतील ?

👉 प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केले जाईल.

4. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात जमा होतील ?

👉 आधार लिंक असलेल्या बँक खात्यात.

5. योजनेसाठी वय मर्यादा काय आहे ?

👉 वय 21 ते 65 वर्षे

Leave a Comment