Meta AI Marathi :- Meta ने काही महिन्यापूर्वी त्यांचा Ai चॅटबॉट भारत देशात लॉन्च केला. याचा फायदा WhatsApp, Facebook आणि Instagram या अप्लिकेश वर घेता येईल. या चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही कमांड देऊन त्याच्या कडून Ai इमेजेस तयार करून घेऊ शकतात. सोबतच Meta Ai मुळे तुम्ही अनेक प्रश्नाची उत्तरे पण जाणून घेऊ शकतात.
Meta Ai आहे तरी काय ?
Meta Ai हा एक असा वर्चुअल असिस्टंट आहे कि तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. मेटा एआय हे एखादी गोष्ट सर्च आणि प्लानिंग करण्यास मदत करतो. तसेच या ai च्या मदतीने इमेज आणि एनिमेशन सुद्धा तयार करता येते.
Meta ai चे फिचर कुठे मिळेल ?
Meta Ai हे WhatsApp, Facebook आणि Instagram या अप्लिकेश मध्ये बघायला मिळेल. तसेच तुम्ही मेटा एआय च्या https://ai.meta.com/meta-ai/ या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सुद्धा मोफत मध्ये या फिचरचा आनंद घेऊ शकतात.
अधिकृतरीत्या मेटा द्वारे मेटा ए आय लॉन्च :-
आय टी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी Meta ने भारतातील WhatsApp, Facebook आणि Instagram वापरकर्त्या लोकांसाठी भेट वस्तूच्या रुपात Ai असिस्टंट ची घोषणा केली. या एआय ला बनवण्यासाठी लेटेस्ट “लामा 3” Large Language Model ( एल. एल. एम. ) चा वापर करून, Meta ने हा Ai तयार केला आहे.
मेटा ने सांगितले कि “लामा 3” हे आमचे आजपर्यंतचे सर्वात प्रगत LLM आहे. त्यांतर त्यांनी सांगितले कि, आमच्या आधीच्या मेटा एआय पेक्षा, “लामा 3” ( Large Language Model ) हे युझरसाठी अधिक अग्रेसिव्ह व युझरफ्रेंडली आहे.
तसेच भारतात Meta Ai हे सध्यातरी इंग्रजी भाषेमध्येच लॉन्च केले आहे. मराठी व हिंदी किंवा इतर भाषेसाठी वापरकर्त्यांना अजून वाट बघावी लागेल.
मागील खूप काळापासून Meta या Ai टेस्ट करत होते, परंतु आता अधिकृतरीत्या मेटा द्वारे मेटा एआयलॉन्च करण्यात आले.
👇 हे हि वाचा 👇
मोबाईल खराब झालाय : हे 5 कामे अगोदर करा. PMEGP Loan : सरकार देत आहे कर्ज, सोबत 35% सबसिडी12 पेक्षा जास्त देशात मेटा ए आय उपलब्ध :-
Meta Ai हे 12 देशापेक्षा जास्त देशामध्ये उपलब्ध आहे त्यापैकी काही देश भारत, युनाटेड स्टेट्स, न्युझलंड, ऑस्टेलिया, कॅनडा, सिंगापूर, युगांडा, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या देशामध्ये हि मेटा ए आय चा चॅटबॉट लॉन्च करण्यात आला.
टेक्स मेसेज नाही तर इमेज पण जनरेट करतो मेटा ए आय असे वापरा :- Meta Ai Prompts
मेटा एआय चा वापर वाटसऐप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर करता फ्री आहे. मेटा च्या कोणत्याही प्लेटफॉर्म वर या चॅटबॉटशी चॅट करता येते.
मेटा एआय ची चांगली गोष्ट म्हणजे टेक्स शिवाय, मेटा एआय कमांड द्वारे Ai इमेजेस जनरेट सुध्दा करतो.
Meta Ai Prompts द्वारे इमेजेस असे जनरेट करू शकतात :-
उदाहरण :-
• समजा तुम्हाला एका छोट्या बाळाचा खेळतांना फोटो हवा आहे तर, तुम्ही लगेच मेटा ए आय मध्ये खालील प्रकारे कमांड टाकून फोटो जनरेट करू शकतात. 👇👇👇
“ Creta 3D illustrated cute little boy plying ”
• समजा तुम्हाला एखाद्या सॉफटवेअर डेव्हलप करणाऱ्या मुलीचा फोटो हवा असे तर तुम्ही मेटा Ai खालील कमांड देऊन Ai तुमच्यासाठी फोटो जनरेट करून देईल. 👇👇👇👇
“ Create a 3D illustration 20 year old beautiful girl busy Developing Software in front of a 3D logo of “WhatsApp” The girl wearing green & White Casual Shirts, with Glasses, with headphones, The background of the image should showcase a social media profile page ”
अशा प्रकारे तुम्ही मेटा ए आय कमांड देऊन ai इमेजेस तयार करून डाउनलोड करू शकतात. सोबतच तुम्ही ai इमेजेस ला अनिमेट सुद्धा करू शकतात.
मेटा ए आय असे काम करेल तुमच्यासाठी :- Meta Ai Marathi
समजा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नाईट आउट प्लान करत आहात तर, तुम्ही मेटा ए आय सूर्यास्ताची दृश्ये असलेली ठिकाणे आणि शाकाहरी हॉटेल बद्दल विचारा.
शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचे नियोजन करायला सांगा. मेटा ए आय ला शनिवारी रात्रीच्या मैफिली शोधण्यासाठी सांगू शकतात.
गणिताच्या समस्या असो या इतर कोणतीही समस्या तुम्ही मेटा एआय ला विचारू शकतात. मेटा एआय काही क्षणातच तुमच्या समस्याचे समाधान शोधून देईल.
WhatsApp वर मेटा ए आय वापरण्यासाठी काय करावे लागेल :-
1. मेटा एआय वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे WhatsApp अपडेट करावे लागेल.
2. WhatsApp अपडेट करून सुद्धा तुम्हाला मेटा एआय चे ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला थोड्या दिवस अजून मेटा ए आय ची वाट बघावी लागणार आहे.
3. हे फिचर्स लवकरच सर्व डिव्हाईस साठी अव्हेलेबल होईल.
4. जर तुम्हाला मेटा ए आय चे फिचर्स इतर रित्या वापरायचे असेल तर तुम्ही https://ai.meta.com/meta-ai/ या वेबसाईट वर जाऊन Meta Ai वापरू शकतात.
1. Meta Ai मध्ये कोणत्या भाषेचा उपयोग करण्यात आला आहे ?
👉 मेटा एआय मध्ये “लामा 3” Large Language Model ( एल. एल. एम. ) या भाषेचा वापर करून तयार करण्यात आले आहे.
2. Meta Ai काय काय करू शकतो ?
👉 मेटा ए आय तुमच्यासाठी असिस्टंट म्हणून माहिती सर्च करणे, प्रश्नांची उत्तरे देणे, ai इमेजेस जनरेट करणे आणि ai इमेजेस अनिमेट करू शकतो.
3. मेटा ए आय चे फिचर्स कुठे वापरता येईल ?
👉 WhatsApp, Facebook आणि Instagram किंवा मेटा एआय च्या अधिकृत वेबसाईट मेटा ए आय चे फिचर्स वापरता येईल.👉