Maharashtra Budget 2024-25: महाराष्ट्र राज्याचे सन 2024-25 चे अंतरिम बजेट ( महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024-2025 ) अर्थमंत्री अजित पवार यांनी दिनांक 28-06-2024 रोजी सादर केले. त्यांनी या बजेट मध्ये अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या.
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024-25, मध्ये सरकार मार्फत योजनेचा पाऊस पाडण्यात आला, तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर करतांना काही महत्वपूर्ण निर्णय व घोषणा केल्या. या बजेट मध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले, तसेच या बजेट मध्ये कोणत्या योजनांची घोषणा करण्यात आली, बघू या लेखाच्या माध्यमातून.
महिलांसाठी विविध योजना :- Maharashtra Arthsankalp 2024
1. मुख्यमंत्री माझी लाडली बहिण योजना :-
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी “ मुख्यमंत्री माझी लाडली बहिण ” या योजनेची घोषणा केली.
मुख्यमंत्री माझी लाडली बहिण योजना अंतर्गत महिलांना दर महिना 1,500 रु. देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला पात्र असतील.
” मुख्यमंत्री माझी लाडली बहिण योजना ” साठी दरवर्षी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध करण्यात येईल. अशी माहिती अर्थमंत्री अजित पावर यांनी Maharashtra Arthsankalp 2024-25 मांडताना दिली.
2. पिंक ई-रिक्षा योजना :- महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024 – 2025
चालू वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांनासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी “ पिंक ई-रिक्षा योजना ” या योजनेची घोषणा करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यातील 17 जिल्ह्यात राबवणार “ पिंक ई-रिक्षा योजना ”. या योजनेसाठी राज्यातील 10 हजार महिलांना मिळणार रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य.
यासाठी 80 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी माहिती अर्थमंत्री अजित पावर यांनी Maharashtra Budget 2024-25 चे मांडताना दिली.
3. शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह योजना :-
शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह योजनेसाठी मुलींना देण्यात येणारे अनुदान हे दहा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले.
4. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना :-
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी “ मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ” या योजनेची घोषणा केली.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी पात्र असतील. या योजनेची अंबलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.
5. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना :-
महिला लघु उद्योजकांसाठी सन 2024-2025 या आर्थिक वर्षापासून “ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना “ सुरु करण्यात येणार आहे.
या करीता अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल. अशी माहिती अर्थमंत्री अजित पावर यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024 चे मांडताना दिली.
6. मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% फी माफीची घोषणा :- ( मुलींना मोफत उच्च शिक्षणासाठी योजना )
राज्यातील व्यवसायिक क्षेत्रामध्ये मुलींचे प्रमाण वाढावे, तसेच इंजेनिअरिंग, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यवसायिक पदवी-पदविका शिक्षण घेणाऱ्या पात्र मुलींना 100% फी माफी देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी Maharashtra Arthsankalp 2024 मांडताना केली.
राज्यातील दोन लाख पाच हजार मुलींना याचा लाभ होईल. शेक्षणिक वर्ष 2024-25 पासून हि योजना लागू होईल.
या योजने मुळे दरवर्षी 2000 कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. अशी माहिती दिनांक 28 जून 2024 रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडताना दिली.
शेतकऱ्यांसाठी विविध योजना :-
1. नानजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प :-
नानजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यामध्ये शासन राबविणार. या प्रकल्पासाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी.
2. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तनासाठी प्रकल्प :-
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 1 हजार 561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
3. गाव तिथे गोदाम योजना :-
शेतमालाची स्थानीक पातळीवर साठवणुकीसाठी “ गाव तिथे गोदाम “ हि ( Shetkari Yojana ) योजना राबविण्यात येत आहे.
गाव तिथे गोदाम या योजने अंतर्गत पहिल्या टप्यात 100 नवीन गोदाम बांधण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी गोदाम आहे, त्या ठिकाणच्या गोदामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
4. कापूस, सोयाबीन उत्पादनासाठी योजना :-
कापूस, सोयाबीन व अन्य तेलबियांच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी शासना मार्फत सन 2024-25 करिता 341 कोटी रुपयांचे निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटीचा निधी.
5. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 हजार रुपये मदत :-
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादीत प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी Maharashtra Budget 2024-25 चे मांडताना केली. हे अर्थसहाय्य खरीप हंगाम 2023-24 करीता देण्यात आले.
6. अटल बांबू समृद्धी योजना :-
अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला बांबूच्या प्रति रोपासाठी 175 रुपये अर्थ सहाय्य मिळणार. तसेच या योजनेतून 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे.
7. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई :-
वन्य प्राण्यांच्या हल्यात जीवित हानी झाल्यास नुकसान भरपाई म्हणून आधी 20 लाख रुपये मिळत होते. ते वाढवून 25 लाख रुपये करण्यात आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्यात कायमचे अपंगत्व आल्यास आधी नुकसान भरपाई 5 लाख रुपये मिळत होती, ती वाढवून आता 7 लाख 50 हजार रुपये करण्यात आली.
वन्य प्राण्यांच्या हल्यात गंभीर जखमी झाल्यास, 1 लाख 25 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळत होते, आता ती रक्कम वाढवून 5 लाख रुपये इतकी करण्यात आली.
वन्य प्राण्यांच्या हल्यात किरकोळ जखमी झाल्यास, आधी 20 हजार रुपये मिळत होते. आता ती आता ती रक्कम वाढवून 50 हजार रुपये इतकी करण्यात आली.
वन्य प्राण्यांमुळे शेत पिकाचे नुकसान झाल्यास, आधी 25 हजार रुपये मिळत होते. ती रक्कम वाढवून 50 हजार रुपये इतकी करण्यात आली. तसेच पशुधन हानीच्या नुकसान भरपाई मध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे.
अशी माहिती अर्थंमंत्री अजित पवार यांनी या Shetkari Yojana, महाराष्ट्र बजेट 2024-25 मांडताना दिली.
8. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना :-
“ मुख्यमंत्री बळीराजा विज सवलत योजना “ अंतर्गत राज्यातील शेती पंपाना पूर्ण पणे मोफत विज पुरवल्या जाईल. या योजनेचा लाभ 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांना दिला जाईल.
या योजनेसाठी 14 हजार 761 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देणार आहे.
9. सिंचन प्रकल्प :-
राज्य सरकारमार्फत “महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम” हाती घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत 155 कालवे सुधारण्यात येणार आहे. तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. याचा फायदा येत्या तीन वर्षात 4 लाख 28 हजार हेक्टर शेत जमीनीला होणार.
10. “ मागेल त्याला सौरऊर्जा पंप ” या योजने अंतर्गत 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध होणार.
11. “ जलयुक्त शिवार अभियान – 2 ” साठी 650 कोटी रुपयांचा निधी.
12. कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी कांदा खरेदीसाठी 200 कोटीचा फिरता निधी.
13. राज्यात “दुध व्यवसाय उद्योजकात प्रकल्प” सुरु करण्यात येणार.
14. नोंदणी कृत दुध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपयांप्रमाणे जुलै, 2024 पासून अनुदान मिळणार.
15. मेंढी-शेळी व कुक्कुटपालनसाठी राज्यात नवीन दोन योजना राबविण्यात येणार.
16. “ गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” या योजने अंतर्गत राज्यात 338 जलशयांतून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. लोक सहभागातून आतापर्यंत 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला. अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी Maharashtra Budget 2024-25 चे मांडताना दिले.
सरकारी योजनांचा खजिना शेतकरी योजनांचा खजिना
आरोग्यासाठी विविध योजना :-
Maharashtra Budget 2024 मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना सर्व कुटुंबाना लागू.
आरोग्य विमा संरक्षण रक्कम 1 लाख 50 हजार रुपये वरून 5 लाख रुपये एवढी करण्यात आली.
युवा वर्गासाठी विविध योजना :- ( Maharashtra Budget 2024 )
1. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना :-
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10 हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे.
2. अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना.
3. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कुबा ड्रायव्हिंग केंद्र सुरु राज्य शासन करणार.
4. थ्रस्ट सेक्टरमध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची गुतंवणूक, यामुळे 50 हजार रोजगार निर्मिती होईल.
5. हरित हायड्रोजन मध्ये 2 लाख 11 हजार 400 कोटी गुतंवणूक, यामुळे 55 हजार 900 रोजगार निर्मिती होईल.
6. नवी मुंबई “ इंडिया जेम्स अॅ न्ड ज्वेलरी पार्क “ नियोजित – 2 हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांचा समावेश, 50 हजार कोटींची गुतंवणूक करणार. यामुळे एक लाख रोजगार निर्माण होईल.
7. मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे, येथील तंत्रशिक्षण संस्थेमध्ये “ सेंटर ऑफ एक्सलन्स” स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
दुर्बल घटकासाठी विविध योजना :-
1. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना मध्ये 50% वाढ :-
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजनेसाठी साठी आर्थिक दुर्बल घटकातील निराधार, विधवा, दिव्यांग व वृद्ध नागरिकांना आधी दर महा एक हजार रुपये अर्थ सहाय्य करण्यात येत होते. आता ते वाढवून दीड हजार रुपये करण्यात आले.
2. धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना :-
दिव्यांग व्यक्तीसाठी “ धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना ” राज्यात राबविण्यात येणार. या योजनेच्या पहिल्या टप्यात 34 हजार 400 घरे बांधणार.
3. घरकुल योजना :- Maharashtra Budget 2024
प्रधानमंत्री आवास योजना, रमाबाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इत्यादीच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35 लाख 40 हजार 491 घरकुल मंजूर करण्यात येईल.
4. स्वच्छ भारत अभियान या योजनेचा 2 टप्पा ग्रामीण भागात राबवणार. यासाठी 1 हजार 886 कोटी 84 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.
5. दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहने मिळणार.
पायाभूत सुविधा आणि अन्य महत्वाच्या योजना :-
1. मुख्यमंत्री सडक योजनेच्या तिसऱ्या टप्यात 23 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल.
2. भगवान बिरसा मुंडे जोडरस्ते या योजनेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
3. संत सेवालाल महाराज जोडरस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोडरस्ते योजनेची लवकरच आंबलबजावणी सरकार मार्फत करण्यात येणार.
4. एकोणवीस महानगरपालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविण्यात येणार.
वारकऱ्यांसाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय :-
👉 मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडल स्थापन करणार. ( Maharashtra Budget 2024 )
👉 पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालखीतील दिंडीना प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी मिळणार.
👉 “ निर्मल वारी ” साठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी.
👉 देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य मार्गावर मोफत आरोग्य तपासणी आणि औषध उपचार करणार.
ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना :-
आपला महाराष्ट्र हा संताची भूमी म्हणून ओळखला जातो, दरवर्षी अनेक जन तीर्थस्थळांना भेट देतात. जेष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात येणार आहे.
“मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन मिळणार. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 29 जून 2024 रोजी विधानसभेत केली. लवकरच या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून जेष्ठ नागरिकांना शासनामार्फत तीर्थस्थळी दर्शनासाठी नेण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.