MahaJyoti Mofat Pustak Sanch Yojana | JEE / NEET महाज्योती मोफत पुस्तक संच योजना

MahaJyoti Mofat Pustak Sanch Yojana : या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मोफत पुस्तक संच योजना साठी अर्ज कुठे करायचा ? पुस्तक संच कुणाला मिळेल ? योजनेची पात्रता काय आहे ? या बाबतची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण बघू या..

महाज्योती मोफत पुस्तक संच योजना काय आहे ?

महाज्योती मोफत पुस्तक संच या योजनेअंतर्गत सन 2024 मध्ये इयत्ता 10 वी पास झालेल्या OBC विद्यार्थ्याला मोफत पुस्तक संच दिला जातो. योजनेअंतर्गत हा पुस्तक संच JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्याला देण्यात येतो.


योजनेच्या पात्रता व निकष :-

1. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

2. लाभार्थी विद्यार्थी हा इतर मागास वर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असायला हवा.

3. लाभार्थी विद्यार्थ्याकडे नॉन-क्रिमिलेअर असायला हवे.

4. लाभार्थी विद्यार्थी हा सन 2024 मध्ये इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

5. विद्यार्थी इयत्ता 11 वी मध्ये सायन्स शाखेत शिक्षण घेत असावा.

6. विद्यार्थ्याला योजनेचा लाभ हा इयत्ता 10 च्या परीक्षेतील गुणाच्या आधारे तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार निवड करण्यात येईल.

7. लाभार्थी विद्यार्थी हा शहरी भागतील असेल तर त्याला 10 वी मध्ये कमीत कमी 70% तर ग्रामीण भागतील विद्यार्थ्याला 60% गुण असणे आवश्यक आहे.

8. लाभार्थी विध्यार्थी हा शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे त्याच्या आधार कार्ड वरील नमूद पत्यावरून ठरवण्यात येईल.


योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-

  1. आधार कार्ड ( Aadhar Card )
  2. रहिवाशी दाखला ( Domicile Certificate )
  3. जातीचा दाखला ( Cast Certificate )
  4. नॉन-क्रिमिलेअर ( Non-Creamy Layer Certificate)
  5. 10 वी उत्तीर्ण गुणपत्रिका ( SSC Marksheet )
  6. 11 वी ला सायन्स घेतल्याचा पुरावा ( Bonafide Certificate)
  7. अपंग असल्यास, दिव्यांग प्रमाणपत्र
  8. अनाथ असल्यास, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र

महाज्योती मोफत टॅब योजना OBC विद्यार्थ्याना मिळणार 60,000 रुपये

आरक्षण टक्केवारी :- Mahajyoti Free Book Set

महाज्योती मोफत पुस्तक संच योजना अंतर्गत विद्यार्थ्याला दोन प्रकारे आरक्षण दिल्या जाते. 1. सामाजिक प्रवर्गानुसार आरक्षण, 2. समांतर आरक्षण

1. सामाजिक प्रवर्गानुसार आरक्षण

अं. क्र.सामाजिक प्रवर्गटक्केवारी
1OBC – इतर मागास वर्ग59%
2VJ-A – निरधीसुचती जमाती-अ10%
3NT-B – भटक्या जमाती-ब8%
4NT-C – भटक्या जमाती-क11%
5NT-D – भटक्या जमाती-ड6%
6SBC – विशेष मगास प्रवर्ग6%
एकूण100%
Mahajyoti Free Book Set | MahaJyoti Mofat Pustak Sanch Yojana

2. समांतर आरक्षण

मोफत पुस्तक संच योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला पुढीलप्रमाणे समान आरक्षण दिल्या जाते.

1. अनाथ विद्यार्थ्याकरिता 1% जागा आरक्षित.

2. महिलांसाठी 30% जागा आरक्षित

3. दिव्यांग विद्यार्थ्याकरिता 5% जागा आरक्षित.


मोफत पुस्तक संच योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

1. मोफत पुस्तक संच योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. वेबसाईट लिंक👉 येथे क्लिक करा.

2. वेबसाईटवर गेल्यावर, होम पेज मधील “Notice Board” या ऑप्शन वर क्लिक करावे.

महाज्योती मोफत पुस्तक संच योजना | Mahajyoti Free Book Set

3. त्यांतर ‘Notice Board’ मधील “JEE/NEET परीक्षांकरीता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज” या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

4. अर्जामध्ये विचारल्या प्रमाणे योग्य ती माहिती भरावे व विचारल्या प्रमाणे कागदपत्रे स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

5. योजनेसाठी अर्ज करतांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास विद्यार्थ्याने महाज्योतीच्या Call Center वर संपर्क करावा.

6. महाज्योती हेल्पलाईन क्रमांक :- 7122 8701 20 / 7122 8701 21

7. महाज्योती Mail ID :- mahajyotingp@gmail.com

Majajyoti Mofat Pustak Sanch Yojana
योजनेचे नावमहाज्योती JEE/NEET मोफत पुस्तक संच योजना
विभागइतर मागास बहुजन समाज कल्याण विभाग
लाभJEE/NEET परीक्षेसाठी मोफत पुस्तक संच वाटप
लाभार्थीसन – 2024 मध्ये दहावी पास विद्यार्थी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
वेबसाईट https://mahajyoti.org.in/
राज्यमहाराष्ट्र
श्रेणीमहाराष्ट्र सरकार योजना
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2024
ई-मेलmahajyotingp@gmail.com
हेल्पलाईन नंबर7122-8701-20/21
Mahajyoti Free Book Set

अटी व शर्ती :- MahaJyoti Mofat Pustak Sanch Yojana

1. मोफत पुस्तक संच योजनेची शेवटची तारीख हि 15 सप्टेंबर 2024 आहे.

2. योजनेसाठी पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

3. योजनेचे अर्ज स्वीकारणे, तसेच विद्यार्थी निवड पद्धत बदलणे, मुदतवाढ देणे किंवा जहिरात रद्द करणे या बाबतचे सर्व अधिकार महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांचे राहतील.

4. विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास, सदर विद्यार्थ्याला योजनेचा लाभ दिला जाणार नाही.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. मोफत पुस्तक संच कुणाला मिळणार ?

👉 इयत्ता 11 मध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या OBC विद्यार्थ्याला महाज्योती मार्फत Mahajyoti Free Book Set मिळणार आहे.

2. महाज्योती मोफत पुस्तक संच योजना करीता अर्ज कुठे करावा ?

👉 Mahajyoti Free Book Set योजनेचा अर्ज महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक 👉https://neet.mahajyoti.org.in/2024_books/mobile_verification.php

Leave a Comment