MahaJyoti Free Tablet Yojana : 10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत Tab

MahaJyoti Free Tablet Yojana 2024 : यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. महाज्योती मोफत टॅबलेट या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? कुणाला टॅब मिळेल ? पात्रता काय आहे ? या बाबतची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातुन बघू या..

महाज्योती मोफत टॅबलेट योजना काय आहे ?

महाज्योती मोफत टॅबलेट या योजनेअंतर्गत इयत्ता 10 वी पास असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मोफत टॅब दिल्या जाते. योजनेअंतर्गत हे टॅबलेट विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याला JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 करीता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येते.

या टॅब मध्ये विद्यार्थ्याला प्रशिक्षणासाठी दररोज 6 GB इंटरनेट डेटा तसेच परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी ऑनलाईन क्लास तसेच शिक्षणासंबधित पुस्तके अपलोड करून दिल्या जाईल.


योजनेच्या पात्रता व निकष :-

👉 लाभार्थी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असायला पाहिजे.

👉 OBC, VJNT, SBC या प्रवर्गातील असावा.

👉 विद्यार्थ्याकडे नॉन-क्रीमिलेअर सर्टिफिकेट असायला हवे. ( नॉन-क्रिमिलेअर सर्टिफिकेट महा-ई सेवा सेतू सुविधा केंद्रावर मिळेल.

👉 विद्यार्थी हा सन 2024 मध्ये 10 वी पास झाला असावा. तरच विद्यार्थ्याला योजनेचा लाभ मिळेल.

👉 विद्यार्थ्याने इयत्ता 11 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

महाज्योती मोफत टॅबलेट, Mahajyoti Free Tablet Yojana

👉 योजनेसाठी विद्यार्थ्याची निवड हि इयत्ता 10 वी च्या परीक्षेत त्याला प्राप्त झालेल्या टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्गावरून व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

👉 शहरी भागातील विद्यार्थ्याला इयत्ता 10 वी मध्ये कमीत कमी 70% किंवा या पेक्षा जास्त टक्के असायला हवे.

👉 तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी मध्ये कमीत कमी 60% किंवा या पेक्षा जास्त टक्के असायला हवे.

👉 विद्यार्थी हा शहरी किंवा ग्रामीण भागात राहतो, हे त्याच्या आधारकार्ड वरील नमूद पत्यानुसार ठरवल्या जाईल.

👉 Mahajyoti Tab Registration 2024 last Date 10 September 2024


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे कार्ड असायला हवे : ABC ID Card

MahaJyoti Free Tablet Yojana Document :- कागदपत्रे

👉 लाभार्थी विद्यार्थ्याचे आधार कार्ड दोन्ही बाजूने ( Aadhar Card )

👉 तहसीलदारांचे रहिवाशी प्रमाणपत्र ( Domicile Certificate)

👉 कास्ट सर्टिफिकेट ( Cast Certificate )

👉 नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र ( Non-Creamy Layer Certificate)

👉 इयत्ता दहावीचे मार्कशीट ( SSC Marksheet )

👉 विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईट प्रमाणपत्र ( Bonafide Certificate )

👉 अपंग असल्याचा दाखला.

👉 अनाथ असल्याचा दाखला ( विद्यार्थी अनाथ असला तर, अन्यथा आवश्यकता नाही.)


महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला दिले जाणारे आरक्षण :-

महाज्योती मोफत टॅबलेट या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना दोन प्रकारे आरक्षण दिल्या जाते, ते पुढील प्रमाणे सामाजिक प्रवर्गासाठी आरक्षण व समांतर आरक्षण

1. सामाजिक प्रवर्ग :-

महाज्योती मोफत टॅबलेट या योजनेअंतर्गत OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D आणि SBC या प्रवर्गांना वेगवेगळे आरक्षण योजनेंअंतर्गत दिले आहे ते पुढील प्रमाणे :-

MahaJyoti Free Tablet Yojanaसामाजिक प्रवर्गानुसार आरक्षण
अं. क्र.सामाजिक प्रवर्गटक्केवारी
1OBC – इतर मागास वर्ग59%
2VJ-A – निरधीसुचती जमती – अ  10%
3VJ-B – भटक्या जमाती – ब8%
4VJ-C – भटक्या जमाती – क11%
5VJ-D – भटक्या जमाती – ड6%
6SBC – विशेष मागास प्रवर्ग6%
एकूण100%

2. समांतर आरक्षण :-

महाज्योती मोफत टॅबलेट या योजनेअंतर्गत समांतर आरक्षण हे महिलांना, दिव्यांग आणि अनाथांसाठी आरक्षण दिले आहे, ते पुढील प्रमाणे :-

  1. प्रवर्गानुसार मुलींना 30% आरक्षण राखीव.
  2. अपंग विध्यार्थ्यांना 4% आरक्षण राखीव.
  3. अनाथ विद्यार्थ्यांसाठी 1% आरक्षण राखीव.
    ( Note :- शहरी व ग्रामीण भागतील विध्यार्थ्याची निवड हि संख्या मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात येईल. )

महाज्योती फ्री टॅब योजनेसाठी अर्ज कसा करावा.

👉 महाज्योती फ्री टॅबलेट या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

👉 अर्ज भरण्यासाठी डायरेक्ट लिंक 👉 महाज्योती फ्री टॅबलेट योजना

👉 योजनेसाठी अर्ज करतांना विचाल्या प्रमाणे फॉर्म मध्ये योग्य ती माहिती भरून, सर्व कागदपत्रांवर स्वत:ची स्वाक्षरी करावी. त्यानंतर स्पष्ट दिसतील असे सर्व कागदपत्रे स्कॅन करून विचारल्या ठिकाणी अपलोड करावे.

महाज्योती फ्री टॅब योजनेच्या अटी व शर्ती :-

  1. महाज्योती फ्री टॅब योजनेची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
  2. योजनेसाठी पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारल्या जाणार नाही.
  3. महाज्योती फ्री टॅब योजनेची जाहिरात रद्द करणे, अर्ज नाकरणे व स्विकारणे, मुदत वाढ तसेच विद्यार्थी निवड पद्धत बदलणे याबबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापिय संचालक, महाज्योती यांच्या कडे राहील.
  4. विद्यार्थ्याने अंतिम निवड प्रकियेत चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली असेल तर त्या विद्यार्थ्याची निवड रक्क करण्यात येईल.
  5. महाज्योती फ्री टॅब योजनेसाठी अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास महाज्योती हेल्पलाईन क्र. 7122 8701 20 व 7122 8701 21 या नंबर वरती संपर्क साधावा.

MahaJyoti Free Tablet Yojana 2024 या योजनेची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तसेच नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल. अश्याच नवनविन अपडेट व कामाच्या माहितीसाठी marathibaba.com ला आवश्यक भेट देत जा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. महाज्योती फ्री टॅब योजनेचा अर्ज कुठे करावा ?

👉 महाज्योती फ्री टॅब योजनेचा अर्ज महाज्योती अधिकृत वेबसाईट वर जाऊन करता येईल. अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक 👉 MahaJyoti Free Tab Yojana Apply Online

2. महाज्योती फ्री टॅब योजना कुणासाठी आहे ?

👉 महाज्योती फ्री टॅब योजना हि दहावी पास झालेल्या OBC, VJ-NT, SBC च्या प्रवर्गातील विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

Leave a Comment