HSRP Number Plate Maharashtra : HSRP| नंबर प्लेट नसेल तर भरावा लागेल दंड

HSRP Number Plate Maharashtra : राज्य सरकारद्वारे वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम दिनांक 30 जून 2025 आहे, त्यानंतर HSRP नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर RTO च्या नियमानुसार जो दंड असेल तो भरावा लागेल.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल HSRP नंबर प्लेट काय आहे ? नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च येतो ? HSRP नंबर प्लेट कशी बसवायची ? नंबर प्लेटसाठी अर्ज कुठे करायचा ? या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊ या. 


Table of Contents

HSRP नंबर प्लेट काय आहे ? HSRP Number Plate Maharashtra

HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट होय. हि नंबर प्लेट अल्युमिनियम या धातू पासून बनवली असते, या नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोड असतो. तसेच नंबर प्लेटमध्ये छेडछाड होऊ नये म्हणून प्लेटवर वर्ण नक्षीदार आणि काळ्या फॉइलसह हॉट-स्टॅम्प केलेला असतो. तसेच या नंबर प्लेटवर स्टीकर सारखा एक होलोग्राम असतो त्या होलोग्राम मध्ये वाहनाचा तपशील असतो.


HSRP नंबर प्लेट बद्दल थोडक्यात माहिती

HSRP नंबर प्लेट हि सर्व वाहनांना 1 जुलै 2025 पासून कम्पल्सरी करण्यात येणार आहे. जर तुम्ही तुमच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवली नाही, तर तुम्हाला RTO च्या नियमानुसार जो दंड असेल तो तुम्हाला भरावा लागणार आहे.

जर तुम्हाला HSRP नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवायची असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. तसेच तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट सुद्धा बुक करू शकतात. तसेच काही पिन कोडला HSRP नंबर प्लेट होम डिलिव्हरी हा ऑप्शन सुद्धा आहे. 


HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी शासकीय फी किती आकारण्यात येते ?

👉 टू-व्हीलर :- 531 रु

👉 थ्री व्हीलर :- 590 रु

👉 फोर व्हीलर/ हेवी कमर्शियल व्हेविकल :- 879 रु.


HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ?

  • आर सी बुक
  • आधार कार्ड

HSRP Number Plate Maharashtra

व्यवसाय करण्यासाठी लागणारे शासकीय परवाने

या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याची आवश्यक्यता नाही

दिनांक 01-04-2019 किंवा त्यांतरच्या नोंदणीकृत वाहनांना HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करण्याची आवश्यक्यता नाही, त्या वाहनांना अगोदरच HSRP नंबर प्लेट बसवलेली आहे.

HSRP नंबर प्लेट कोणत्या वाहनांना बसवणे बंधनकारक HSRP number plate maharashtra for old vehicle

भारत सरकारच्या नियमानुसार, जे वाहन दिनांक 1 एप्रिल 2019 च्या अगोदरचे आहेत, अश्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.

सन 2019 आधीच्या वाहनावरील नंबर प्लेटवर अगदी सहजपणे काढता व आणि बदलवता येत होती. त्यामुळे वाहन चोरी जाने या सारख्या घाटनात जास्त वाढ होत होती. त्यामुळे भारत सरकारने 2019 मध्ये HSRP नंबर प्लेट लागू केली.

HSRP नंबर प्लेट एकदा काढल्यानंतर पुन्हा बसवता येत नाही, तसेच या नंबर प्लेट सारखी दुसरी बनावट नंबर प्लेट बनवता येत नाही, त्यामुळे वाहन चोरीच्या घटना कमी होऊ लागल्या. तसेच नंबर प्लेटवरील युनिक लेझर कोड मुळे सरकारला वाहन ओळखणे सोपे झाले. त्यामुळे सरकारने HSRP नंबर प्लेट अनिवार्य केली.

HSRP number plate maharashtra for old vehicle


HSRP नंबर प्लेटसाठी कुठे अर्ज करावा ? HSRP number plate maharashtra online

HSRP नंबर प्लेटसाठी प्रथम तुम्हाला मोटर वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1125/HSRP या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. तसेच तुम्ही जवळच्या सेतू सुविधा / महा ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

ऑनलाईन नोंदणी करतांना तुम्हाला वाहन क्रमांक, इंजिन नंबर, चेसिस नंबर, पत्ता इ. माहिती भरावी लागेल. त्यामुळे अर्ज भरत्यावेळी तुमचे आरसी बुक व आधार कार्ड सोबत ठेवावे. HSRP Number Plate Maharashtra

ऑनलाईन नोंदणी करतांनाच तुम्हाला HSRP नंबर प्लेटची फी ऑनलाईनच भरावी लागेल.

त्यानंतर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करत्यावेळी अपॉइंटमेंट बुक केली असेल तर, तुम्हाला HSRP नंबर प्लेट बसवायला अपॉइंटमेंटमध्ये दिलेल्या पत्यावर जावे लागेल व HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल.

जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करत्यावेळी होम डिलिव्हरी हा ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला घरपोच नंबर प्लेट मिळून जाईल.    

HSRP number plate maharashtra online


HSRP नंबर प्लेट भारत सरकारने का अनिवार्य केली ?

  • वाहन चोरी जाणाच्या घटना रोखण्यासाठी
  • बनावट नंबर प्लेट टाळण्यासाठी
  • वाहतूक नियमांचे पालन व्हावे
  • वाहतूक रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी
HSRP number plate Maharashtra
विभागमोटार वाहन विभाग
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
वेबसाईटhttps://transport.maharashtra.gov.in/1125/HSRP

HSRP नंबर प्लेटचे हि आहे वैशिष्ट :-

न काढला जाणारा स्नॅप लॉक :-

वाहनावरती नवीन HSRP नंबर प्लेट बसवतांनी स्नॅप लॉकने नंबर प्लेट फिट केली जाते. त्यामुळे नंबर प्लेट तुटली की पुन्हा लावता येत नाही, या मुळे नंबर प्लेटची चोरी व अनधिकृत हस्तांतरण रोखण्यास मदत होते.

लेझर व पर्मनंट आयडेटीफिकेशन नंबर :-

नंबर प्लेटवर लेझर ने कोरलेला १० अंकी युनिक कोड असेल जो वाहनांच्या इंजिन आणि चेसेस नंबरशी जोडला असेल. हा युनिक कोड एका केंद्रीय डेटाबेसमध्ये स्टोअर केला जातो, त्यामुळे जलद गतीने वाहनाची ओळख पटवण्यास मदत होते.

क्रोमियम-आधारित अशोक चक्र होलोग्राम :-

नंबर प्लेटच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात अशोक चक्राचा क्रोमियम होलोग्राम प्लेटला जोडला आहे, या होलोग्रामची कॉपी बनवणे कठीण आहे. त्यामुळे बनावटी वस्तू बनवण्या पासून रोखले जाते.

हॉट- स्टॅम्प “IND” मार्किग :-

नंबर प्लेटवरती डाव्या बाजूला हॉट-स्टॅम्प केलेले, निळ्या रंगाचे ‘IND’ नावचे शिलालेख आहे, जे प्रमाणित राष्ट्रीय स्वरूपाचे प्रतिक आहे. ‘IND’ या नावाचे स्टॅम्प असलेले नंबर प्लेट वाहन हे अंतरराष्ट्रीय वाहन नोंदणीचे पालन करते असे सुनिश्चित होते.

रिल्फेक्टीव्ह शिटिंग :-

संपूर्ण नंबर प्लेट हि उच्च गुणवत्तेच्या परावर्तीत मटेरियल ने झाकलेली आहे, ज्यामुळे नंबर प्लेटची रात्रीची दृश्यमता वाढते. या वैशिष्ट्यामुळे वाहन ओळखण्यासह, रस्ता सुरक्षितेत वाहनाची दृश्यमता वाढते.


HSRP नंबर प्लेटमुळे हे होतील फायदे :-  

  • वाहन चोरीला जाण्याच्या घटना कमी होतील.
  • लेझर द्वारे वाहनांची ओळख करता येईल.
  • बेकायदेशीर नंबर प्लेट्स गुन्हेगारांकडून विकल्या आणि वितरीत केल्या जाणार नाही.
  • वाहनाचा अपघात झाल्यास HSRP नंबर प्लेटद्वारे वाहनाच्या मालकाची माहिती लगेच मिळून जाईल.

नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न :-

1. HSRP नंबर प्लेट नसल्यावर किती दंड आकारल्या जाऊ शकतो ?

👉 HSRP नंबर प्लेट नसल्यावर साधारणता ५०० रुपये पासुन ५००० रु पर्यंत दंड आकाल्या जाऊ शकतो.

2. माझी नंबर प्लेट हरवली आहे ? नवीन HSRP नंबर प्लेट कशी मिळेल ?

👉 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार जर नंबर प्लेट हरवली असेल तर, तुम्हला हरवलेल्या नंबर प्लेटची FIR लागेल. तरच तुम्हला नवीन HSRP नंबर बसवता येईल.

Leave a Comment