गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Shetkari Apaghat Vima Yojana – 2023-24 )

नमस्कार मिंत्रानो, आज आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Shetkari Apaghat Vima- 2023-24) या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेची पात्रता, कागदपत्रे, मिळणारी रक्कम आणि नियम अटी काय असनार आहे, तसेच या योजनेसाठी अर्ज कुठे आणि अपघात विमा कोणत्या कंपनीद्वारे मिळणार यांची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Table of Contents

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे ? सरकारने हि योजना का आणली ?

शेती व्यवसाय करत असतांना होणारे अपघात, जसे कि वीज पडणे, विहरीत पडणे, पूर, विजेचा शॉक बसने, साप किंवा विंचू चावणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात. तसेच रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू होतो किंवा त्याला अपंगत्व येते. अश्या अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण होते. अपघातामुळे करत्या व्यक्तीचे उत्पादन साधन बंद होऊन कुटुंबात आर्थिक अडचणीची स्थिती निर्माण होते. अश्या कुटुंबाना आर्थिक लाभ देण्यासाठी सरकारने हि योजना आमलात आणली.   

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना केव्हा पासून सुरु करण्यात आली ?

शेती करतांना शेतकऱ्यांसोबत होणारे अपघात लक्षात घेऊन शासनाने या योजनेची सुरवात सन २००५ साली सुरु करण्यात आली, परंतु तेव्हा या योजनेचे नाव हे “ शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना ” या नावाने होते. त्यानंतर सन २००९ साली सदर योजनेचे नाव हे “ शेतकरी जनता अपघात विमा योजना “ असे करण्यात आले. बदल्या काळानुसार शासनाने या योजनेत बदल करून सदर योजना हि “ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना “ या नावाने राबवण्यात आली.

                गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना हि विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनीमार्फत राबवण्यात येत होती. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची विमा कंपनीद्वारे शेतकऱ्यांने मांडलेले प्रस्ताव अनआवश्यक कारणास्तव नाकारणे, वेळेत शेतकऱ्याचे दावे मंजूर न करणे इत्यादी कारणामुळे शेतकरी / शेतकरी कुटुंब आर्थिक लाभापासून वंचीत राहत होते. सदर शेतकऱ्याची होणारी फसवणूक लक्षात घेता या योजनेत सुधारणा करून परत “ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना “ दि. १७/०३/२०२३ रोजी या योजनेची मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शासन परिपत्रक :- Gopinath Munde Shetkari Apaghat Vima Yojana

शेतकरी हा वहितीधारक खातेदार असावा अथवा वहितीधारक खातेदार नोंद नसलेला  शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य ( जसे :- आई- वडील, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी या पैकी कोणताही एक व्यक्ती )  असे १० ते ७५ वयोगटामधील एकूण दोन जनांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येणार आहे.

योजनेसाठी लाभ प्रदान करण्यासाठी शेतकऱ्याच्या कुटुंब व्याखेमध्ये ( आई -वडील, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी ) यापैकी कोणतीही एक व्यक्ती ग्राह्य धरण्यात येणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
Gopinath Munde Shetkari Apaghat Vima Yojana

अपघातग्रस्त शेतकऱ्यांला किंवा त्याच्या कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक मदत किती केली जाईल ?

१. जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख रु विमा दिला जातो.

२. शेतकऱ्याचा अपघातात दोन अवयव किंवा दोन डोळे निकामी झाले असेल, तर त्या शेतकऱ्याला दोन लाख रु विमा दिला जातो.

३. शेतकऱ्याचा अपघातात एक अवयव व एक डोळा निकामी झाला असेल तर त्या शेतकऱ्याला २ लाख रु विमा दिला जातो.

४. अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा गमवला लागला तर त्याला एक लाख रु विमा दिला जातो.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाचा लाभ  घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील ?

  • सातबारा
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • पोलीस पाटील यांचा अहवाल / घटनास्थळ पंचनामा
  • एफ आय आर प्रत
  • ड्रायव्हिंग लायसन्स  ( वाहन चालवतांना अपघात झाल्यास )
  • वयाचा पुरावा ( आधार कार्ड / पॅन कार्ड / टी. सी.)
  • मृत्यु दाखला व पोस्टमॉर्टम रिपोर्ट( शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यास )
  • अपंगत्वचा पुरावा. ( अपघाता दरम्यान अपंगत्व आल्यावर )
  • कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र

योजनेमध्ये कोणकोणते अपघात समाविष्ट आहे?

१. विजेचा धक्का

२. विषबाधा

३. साप किंवा विंचू चावल्यास

४. जवळच्या नसलेल्या व्यक्तीकडून खून

५. उंची वरून पडून झालेला अपघात

६. विज पडून मृत्यू

७. रेल्वे / रस्ता अपघात

८. पाण्यात बुडून मृत्यू

९. जनावरांमुळे जख्मी किंवा मृत्यु झाल्यास

१०. दंगल

११. अन्य अपघात

योजनेमध्ये समाविष्ट नसलेले अपघाती मृत्यू ?

१. नैसर्गिकरीत्या मृत्यू

२. अपघाता पूर्वचे अपंगत्व

३. आत्महत्या किंवा स्वत: ला जखमी करून घेणे

४. जवळच्या लाभार्थी किंवा वारसांकडून हत्या

५. बाळंतपणात मृत्यू

६. सैन्यातील नोकरी

७. युद्ध

८. गुन्ह्यच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात

९. वाहन रेसिंग अपघात

१०. भ्रमिष्ठपणा   

११. ड्रग्ज सेवनामुळे अपघात

१२. अंतर्गत रक्तस्त्राव

गोपीनाथ मुंडे अपघात योजना
योजनाचे नावगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान  योजना  
सरकारमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील शेतकरी
विभागकृषी विभाग, महाराष्ट्र
लाभएक ते दोन लाख रु.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
वेबसाईटयेथे क्लिक करा
श्रेणीराज्य सरकार योजना
वर्ष२०२३-२४

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान  योजना ऑफलाईन फॉर्म :-

निष्कर्ष :-

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत शेतकऱ्याला शेती व्यवसाय करतांना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व येते, अश्या शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला एक ते दोन लाख रु सरकार आर्थिक मदत करते.

मित्रांनो, या लेख मध्ये आम्ही तुम्हाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना  या योजने बद्दल महिती दिली आहे. मला आशा आहे कि हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल व या योजनेची माहिती शेअर करून जास्त लोकांन पर्यंत पोचवाल.

धन्यवाद .. 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. अपघात झाल्यानंतर क्लेम करण्यासाठी अंतिम तारीख काय असेल ?

👉 अपघात झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्या सादर करणे बंधनकारक आहे.

2. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमासाठी कोठे अर्ज सादर करावा ?

👉 जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा.

Leave a Comment