E Shram Card Benefits in Marathi : ई श्रम कार्ड योजना आहे तरी काय ? ई श्रम कार्डचे फायदे काय ? कागदपत्रे, पात्रता, तसेच ई श्रम कार्ड काढण्यासाठी नोंदणी कुठे करावी ? ई श्रम कार्ड डाउनलोड कसे करावे ? याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत या लेखाच्या माध्यमातून.
ई श्रम कार्ड योजना काय आहे ? E Shram Card in Marathi
भारत सरकारने, असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम कार्ड योजना आणली. या योजने अंतर्गत नोंदणीकृत असंघटित कामगाराला 2 लाख रुपये पर्यंत लाभ मिळू शकणार आहे. तसेच भविष्यात भारत सरकार द्वारे असंघटीत कामगारांसाठी कोणतीही योजना सुरु केल्यास त्याचा थेट लाभ ई श्रम कार्ड आधारे योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस म्हणजेच ई श्रम कार्ड होय. ई श्रम कार्ड अंतर्गत .असंघटीत कामगारांना आधार कार्ड सारखा 12 अंकी UAN क्रमांक दिला जातो. E Shram Card in Marathi
ई श्रम कार्डचे फायदे ? E Shram Card Benefits in Marathi
👉 ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रामधील कामगाराला, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करता येतो, या योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड धारकाला वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते
👉 ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत, कामगाराचा मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपये आर्थिक मदत देण्याची तरतूद. तसेच कामगाराला काम करत असतांना अंशत: अपंगत्व आल्यास 1,00,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.
👉 ई श्रम कार्ड धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदाराला किंवा जोडीदाराला योजनेचे सर्व फायदे दिल्या जातील. | E Shram Card Benefits in Marathi
👉भविष्यात असंघटीत कामगारांसाठी कोणतीही योजना सुरु करायची असेल तर, भारत सरकार द्वारे ई श्रम कार्ड धारकाला याचा थेट फायदा मिळेल.
👉 काही राज्यांमध्ये पीएम किसान योजने प्रमाणे प्रत्येकी तीन महिन्यानंतर ई श्रम कार्ड धारकाला 1,000 रुपयेचा हप्ता दिला जातो.
👉 ई श्रम कार्ड संपूर्ण भारतात वैद्य आहे. विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ई श्रम कार्ड असणे गरजेचे आहे. नोकरी शोधण्यासाठी, पात्र योजना शोधण्यासाठी. | E Shram Card Benefits in Marathi
ई श्रम कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ?
👉 आधार कार्ड
👉 आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक
👉 बँक पासबुक
👉 जातीचा दाखला ( लागू असल्यास )
आयुष्यमान भारत योजना ( गोल्डन कार्ड ) : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार प्रधानमंत्री किसान मानधन योजना : 3,000 प्रती महिना
ई श्रम कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे ? ई श्रम कार्ड कोण काढू शकतो ?
• लाभारार्थी हा गृह-आधारित कामगार, स्वयंरोजगार कामगार किंवा असंघटीत क्षेत्रातील कामगार असावा.
• लाभार्थी EPF किंवा ESIC चा सदस्य नसावा.
• लाभार्थी भारतीय नागरिक असावा तसेच त्याने भारतात काम केले असावे.
• लाभार्थी आयकर दाता नसावा.
• लाभार्थ्याचे वय 16-59 या वयोगटातील असावे.
• लाभार्थ्याकडे बँक पासबुक व आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.
ई श्रम कार्ड साठी नोंदणी कुठे करावी ?
तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरला भेट देऊन ई श्रम कार्ड बनवू शकतात. तसेच तुम्ही स्वत https://register.eshram.gov.in/#/user/self 👈 या वेबसाईट वर जाऊन ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.
नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराला एक युनिव्हर्सल 12 अंकी नंबर आणि ई श्रम कार्ड दिल्या जाते. सदर कार्ड संपूर्ण देशभरात वैद्य आहे.
असे करा, आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर ने ई श्रम कार्ड डाउनलोड ? E Shram Card Download
आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून ई श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत पोर्टल https://register.eshram.gov.in/#/user/aadhaar-login 👈या वेबसाईट वर जावे.
त्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर टाकून Captcha कोड टाकून Send OTP बटनावर क्लिक करावे. व त्यानंतर आधारला लिंक असलेल्या नंबरवरील OTP टाकून Submit बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर आधार नंबर, OTP या पर्यायावर क्लिक करून, Captcha कोड टाकून सबमिट करावे. त्यानंतर आधार लिंक नंबर वरील OTP टाकून Validate या बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर Download UAN Card हा पर्याय तुम्हाला समोर दिसेल, तिथून तुम्ही E Shram Card Download करू शकतात.
E Shram Card Benefits in Marathi | |
योजनेचे नाव | ई श्रम कार्ड योजना ( E Shram Card in Marathi ) |
विभाग | कामगार आणि रोजगार मंत्रालय |
योजनेची सुरवात | 26 ऑगस्ट 2021 |
लाभार्थी | असंघटित कामगार |
वेबसाईट | https://eshram.gov.in/indexmain |
नोंदणी करण्यासाठी | https://register.eshram.gov.in/#/user/self |
हेल्पलाईन | 14434 |
मेल आयडी | eshramcare-mole@gov.in |
श्रेणी | भारत सरकार |
ई श्रम कार्ड हेल्पलाईन संपर्क :-
टोल फ्री क्रमांक ( सोमवार ते रविवार ) – 14434
मेल आयडी – eshramcare-mole@gov.in
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-
1. ई श्रम कार्ड UAN Number वरून कसे डाउनलोड करावे ?
👉 UAN Number वरून ई श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी https://register.eshram.gov.in/#/user/uan-login या अधिकृत वेबसाईट लिंक वरतून तुम्ही तुमचा UAN Number व Date of Birth टाकून ई श्रम कार्ड डाउनलोड करू शकतात
2. ई श्रम कार्ड साठी आतापर्यंत किती लोकांनी नोंदणी केली ?
👉 भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारी नुसार, आतापर्यंत देशभरात 25 कोटींहून अधिक कामगारांनी ई श्रम कार्ड साठी नोंदणी केल्याचं म्हटल आहे