E Rickshaw Yojana |अपंगाना मोफत ई रिक्षा, लगेच करा अर्ज – 2025

E Rickshaw Yojana Maharashtra 2025 :- महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय करण्यासाठी मोफत इलेक्ट्रिक वाहन (ई-व्हेईकल) दिल्या जाते. योजनेसाठी अर्ज कुठे करावा? योजनेचे कागदपत्रे काय ? पात्रता काय ? या बद्दलची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ या.

या दिव्यांगाना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

ज्या दिव्यांगी या योजनेसाठी सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षामध्ये नोंदणी केली आहे. परंतु त्या दिव्यांग व्यक्तीस लाभ न मिळाल्या मुळे त्या व्यक्तीचे अर्ज २०२४-२५ साठी वर्ग करण्यात आले आहे. म्हणून त्या दिव्यांगाना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अश्याच दिव्यांगानी सन 2024-25 करीत नोंदणी करावी.


ई श्रम कार्ड चे फायदे PM विश्वकर्मा योजना

Apang E Rickshaw Yojana :-

योजनेचा उद्देश :-

  • दिव्यांग व्यक्तींला रोजगार निर्मिती करण्यास व सोयी सुविधा उपलब्ध करून चालना देणे.
  • दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्यास सक्षम करणे.
  • दिव्यांग व्यक्तीचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करणे.

योजनेच्या अटी व शर्ती/ पात्रता :-

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा.
  • अर्जदाराकडे कमीत कमी ४०% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असावे.
  • अर्जदाराकडे दिव्यांग असल्याचे UDID कार्ड असावे.
  • अर्जदाराचे वय कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ५५ असावे.
  • दिव्यांग व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखां पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
  • जर अर्जदार दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.

लाभार्थी निवड :- अपंगाना मोफत ई रिक्षा

  • लाभार्थी निवड करतांना जास्त दिव्यांग असलेल्या अर्जदारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्जदार मतीमंद असेल तर, त्या बाबतीत त्यांचे पालक कायदेशीर अर्ज करण्यास सक्षम असतील.
  • अर्जदाराने राज्यातील इतर कोणत्याही योजनेंतर्गत मोफत ई-व्हेईकलचा लाभ घेतला असेल तर, त्यास अपात्र ठरविण्यात येईल.
  • अतितीव्र दिव्यांग असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा वाहन चालवण्याचा परवाना नाकारला असेल, तरी देखील दिव्यांग व्यक्तीच्या सोबतच्या (Escort)  सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिल्या जाईल.
 अपंगाना मोफत ई रिक्षा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो व सही
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • रहिवाशी पुरावा
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • UDID प्रमाणपत्र
  • बँक पासबुकचे पहिले पान

योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

जर दिव्यांग व्यक्तीला मोफत ई रिक्षा योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, https://register.mshfdc.co.in/home या संकेतस्थळावर जाऊन दिव्यांगाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

अर्जदार ऑनलाईन नोंदणी स्वत: किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन करू शकतो.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही स्टेप :-

  • दिलेली सूचना वाचणे.
  • ऑनलाईन अर्ज भरा व कागदपत्रे अपलोड करा.
  • भरलेल्या फॉर्मचे पुनरावलोकन करा, घोषणा तपासा, आणि फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती

योजनेचे सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती परिपूर्ण असेल तरच आपला फॉर्म सबमिट होईल याची खात्री करावी. फॉर्म सबमिट झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच इ मेल पत्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. भविष्यात तुम्हाला अर्जाची तपासणी करायची असल्यास, तुम्हाला प्राप्त झालेल्या रजिस्ट्रेशन नंबर द्वारे अर्जाची तपासणी करता येईल.

अपंगाना मोफत ई रिक्षा ( E Rickshaw Yojana Maharashtra )
योजनाचे नावमोबाईल शॉप ऑन व्हेईकल योजना
सरकारमहाराष्ट्र
लाभार्थीदिव्यांग व्यक्ती
विभागमहाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग
लाभदिव्यांगाना मोफत इलेक्ट्रिक गाडी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
शेवटची तारीख१० फेब्रुवारी २०२५, दुपारी १२ पर्यंत
वेबसाईटhttps://register.mshfdc.co.in/home
हेल्पलाईन नंबर9090118218 / 7820904081
ई मेलevechicle.mshfdc@gmail.com
शासन निर्णयhttps://register.mshfdc.co.in/about
श्रेणीराज्य सरकार योजना
वर्ष2025

e rickshaw yojana Maharashtra :-

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) 3.75 लाख एवढे अनुदान दिव्यांगाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


अर्ज भरताना चुकला असेल तर हे करा.

जर अर्ज कर्त्यावेळी अर्ज चुकला असेल किंवा तुम्हाला अर्जामध्ये बदल करायचे असेल तर, तुम्हाला अर्ज रद्द करण्यासंबंधी लेखी स्वरुपात अर्ज द्यावा लागेल.

लेखी अर्ज आणि नोंदणी केलेल्या अर्जाची PDF तुम्हाला evehicle.mshfdc@gmail.com या वरती मेल करावा लागेल.


Important Links :- E Rickshaw Yojana Maharashtra

योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शासन निर्णय :- https://register.mshfdc.co.in/about

नोंदणी करण्यासाठी :- https://register.mshfdc.co.in/apply

अर्ज ट्रेस करण्यासाठी :- https://register.mshfdc.co.in/trackApplication

अप्लिकेशन नंबर शोधण्यासाठी :- https://register.mshfdc.co.in/findMyApplicationId

लाभार्थी यादी बघण्यासाठी :- https://register.mshfdc.co.in/viewBeneficiary

अर्ज रद्द करण्यासाठी सॅम्पल अर्ज :- https://register.mshfdc.co.in/cancelRegistration


नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न

1. योजनेसाठी पात्र लाभार्थ्याला किती अनुदान दिल्या जाईल?

👉 लाभार्थ्याला फिरत्या वाहनावरील दुकानसाठी ३.७५ लाख प्रती लाभार्थी अनुदान देण्यात येईल.

2. अर्ज चुकला आहे दुरुस्ती कसा करावा ?

👉 evehicle.mshfdc@gmail.com या मेल वरती लेखी स्वरुपात अर्ज लिहून मेल करावा. तसेच सोबत चुकलेल्या अर्जाची pdf मेल करावी.

3. दिव्यांगाना ई रिक्षा कोणत्या प्रकारची मिळणार ?

👉 दिव्यांगाना मोफत ईलेक्ट्रिक ई रिक्षा मिळणार,

Leave a Comment