Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana : – महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, आहे तरी काय ? या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ? योजनेसाठी पात्रता काय आहे ? कोणत्या विद्यार्थ्याला किती शिष्यवृत्ती मिळेल ? सर्व काही आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे तरी काय ?
“ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना “ हि महाराष्ट्र सरकारद्वारे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थांसाठी सुरु करण्यात आलेली शिष्यवृत्ती योजना आहे. या योजने अंतर्गत विद्यार्थाला 60,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
या योजनेचा थेट फायदा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
योजनेअंतर्गत जे विद्यार्थी 12 नंतरचे उच्च शिक्षण घेत असेल त्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे पर्यंत योजनेचा घेता येईल. तसेच जे विद्यार्थी इंजिनियरिंग किंवा वैद्यकीय शिक्षण घेत असेल, अश्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 6 वर्षे या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना :-
जसे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना, एस.टी व एस.सी. कॅटेगिरी करता आणि खुल्या (Open) प्रवर्गासाठी पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना, महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आली होती. त्याच प्रमाणे 2024 मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना “ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना “ सुरु करण्यात आली.
पात्रता :- Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
👉 लाभार्थी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
👉 लाभार्थी विद्यार्थी हा १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
👉 योजनेअंतर्गत अर्जदाराला जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
👉 योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला 60% किंवा त्या प्रमाणात CGPA गुण असणे आवश्यक आहे. यासाठी 12 वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेण्यात येईल.
👉 75% पेक्षा जास्त महाविद्यालयीन हजरी असावी.
👉 कुटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसावे.
👉 जर विद्यार्थी अनाथ प्रवर्गातून योजेसाठी अर्ज करत असेल तर, त्याला महिला बालकल्याण विभागाचे अनाथ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
👉 जर विद्यार्थी अपंग प्रवर्गातून योजेसाठी अर्ज करत असेल तर, तो ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असावा व सोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील ?
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- उत्पन्न दाखला
- रहिवाशी प्रमाणपत्र
- नॅशनॅलिटी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- जन्म दाखला किंवा बोनाफाईड
- 10 वी आणि 12 वी चे उत्तीर्ण प्रमाणपत्र
- स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी सह
- भाडेचिठ्ठी व भाडे करारपत्र / करारनामा
- मागील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याचे शपतपत्र
- स्वयंघोषणापत्र ( माहिती खरी व अचूक असल्याबाबत )
- ग्याप प्रमाणपत्र ( शिक्षणामध्ये ग्याप असेल तर )
- अपंग प्रमाणपत्र ( अपंग असेल तर )
- अनाथ प्रमाणपत्र ( अनाथ असेल तर )
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत मिळणारे अनुदान :-
मुंबई, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 रु, अनुदान देय राहील.
छ. संभाजी नगर, कोल्हापूर नाशिक या शहरामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 51,000 रु, अनुदान देय राहील.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 43,000 रु, अनुदान देय राहील.
तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत वार्षिक 38,000 रु, अनुदान देय राहील.
खालील चार्टच्या माध्यमातून समजून घेऊ या कोणत्या भागात किती भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत दिला जातो.
अं.क्र | शहरानुसार उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास अनुज्ञेय रक्कम | भोजन भत्ता | निवास भत्ता | निर्वाह भत्ता | एकूण रक्कम |
1 | मुंबई शहर, पुणे, नागपूर शहराकरीता | 32,000 | 20,000 | 8,000 | 60,000 |
2 | क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शहराकरीत | 28,000 | 15,000 | 8,000 | 51,000 |
3 | इतर जिल्हा करीता | 25,000 | 12,000 | 6,000 | 43,000 |
4 | तालुका करीता | 23,000 | 10,000 | 5,000 | 38,000 |
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी 600 विद्यार्थ्याची निवड करून, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेअंतर्गत सन 2024-25 करीत प्रथम, दृतीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाला शिक्षण घेत असलेले प्रत्येक 150 विद्यार्थी असे मिळून 600 मुलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला अनुदान वितरण :-
पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत टप्याटप्याने DBT प्रणाली द्वारे चार हप्तांमध्ये अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान विद्यार्थाला त्याचा आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात मिळणार आहे. या योजनेमध्ये लाभास प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना इतर दुसरा कोणताही भत्ता मिळणार नाही.
पहिला हप्ता वितरण :-
माहे जून ते ऑगस्ट या महिन्या मध्ये विद्यार्थ्याचा पहिला हप्ता मंजूर होतो. ज्या दिवशी विद्यार्थ्याचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज मंजूर होतो, त्या पुढील ७ दिवसामध्ये पहिल्या हप्त्याचे अनुदान विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होते.
दुसरा हप्ता वितरण :-
माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधी मध्ये दुसरा हप्ता विद्यार्थ्याला शासन निर्णयानुसार वितरीत करण्यात येईल.
तिसरा हप्ता वितरण :-
माहे डिसेंबर ते माहे फेब्रुवारी या कालावधी मध्ये तिसरा हप्ता विद्यार्थ्याला शासन निर्णयानुसार वितरीत करण्यात येईल.
चौथा हप्ता वितरण :-
माहे मार्च ते मे या कालावधी मध्ये चौथा हप्ता विद्यार्थ्याला शासन निर्णयानुसार वितरीत करण्यात येईल.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Offline Form :-
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा :-
• ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
• ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
• ऑफलाईन अर्जाची प्रिंट काढून, अर्जामध्ये विचारल्या प्रमाणे योग्य ती माहिती भरा व योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावे.
• विद्यार्थ्याने त्याच्या जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण मंडळ येथे जाऊन अर्ज सबमिट करावा.
• जे विद्यार्थी उच्च शिक्षणाकरीता दृतीय, तृतीय किंवा अंतिम वर्षाला आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.
• जे विद्यार्थी प्रथम वर्षामध्ये उच्च शिक्षण घेत आहे अश्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana – 2024 | |
योजनेचे नाव | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना |
सरकार | महाराष्ट्र सरकार |
विभाग | इतर मागास बहुजन कल्याण विभाग |
योजनेची सुरवात | 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्रातील OBC विद्यार्थी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
ऑफलाईन अर्ज डाउनलोड करा | येथे क्लिक करा |
अर्ज कुठे करावा | जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण मंडळ येथे |
श्रेणी | राज्य सरकार योजना |
अपात्रता :-
• अर्जदार विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्या विद्यार्थ्याला योजनेसाठी अपात्र धरण्यात येईल.
• ३० वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर त्या विद्यार्थ्याला योजनेसाठी अपात्र धरण्यात येईल.
• योजनेचा गैरवापर केल्यास विद्यार्थ्याला योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल.
निष्कर्ष :-
या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे कि, उच्च शिक्षण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्षम करणे आणि समाजीक आणि आर्थिक दरी कमी करणे होय. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-
1. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल ?
👉 या योजनेचा लाभ OBC, VJNT, SBC या कास्ट मधील मुलांना मिळेल.
2. योजनेचा लाभ प्रत्येकी जिल्ह्यातून किती विद्यार्थ्यांना मिळेल ?
👉 प्रत्येकी जिल्ह्यातून ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
3. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत विद्यार्थ्याला किती लाभ दिला जाईल ?
👉 योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ हा ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे तेथील महानगर, शहर, तालुक्यातील महागाई नुसार साठ हजार पासून ते अडोतीस हजार रु. पर्यंत लाभ दिला जाईल.
4. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हि कोणामार्फत चालवण्यात येते ?
👉 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हि महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत चालवण्यात येते.