China HMPV Virus all details in marathi : करोना नंतर चीनमध्ये धुमाकूळ घालणारा HMPV व्हायरस काय आहे ? हा आजार कसा पसरतो ? हा आजार किती घातक आहे ? लक्षणे काय आहे ? सर्वाधिक धोका कुणाला ? तुमच्या मनातील प्रश्न व त्याची उत्तरे बघा.
चीन मध्ये धुमाकूळ घालणारा HMPV व्हायरसने भारतामध्ये एन्ट्री केली. सर्वात आधी कर्नाटक राज्यात त्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्यामध्ये HMPV लागण असलेले रुग्ण सापडले. या रुग्णामध्ये सर्वात जास्त संख्या हि लहान मुलांची आहे, विशेषता लागण झालेल्या रुग्णाची कोणतीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाही.
HMPV व्हायरस काय आहे ?
HMPV म्हणजेच ह्युमन मेटा न्युमो व्हायरस, हा एक श्वसन विषाणू आहे. या विषाणूमुळे श्वसनाचे आजार होतात.
HMPV हा विषाणू साधारणता हिवाळ्यामध्ये आणि वसंत ऋतूमध्ये अधिक प्रमाणात पसरतो.
HMPV व्हायरस नवा आहे का ?
HMPV व्हायरस हा सध्या चर्चेचा विषय आहे, परंतु हा व्हायरस नवा नाही तर जुनाच आहे.
या विषाणूची सर्वप्रथम 2001 मध्ये ओळख करण्यात आली होती. HMPV व्हायरस हा नेदरलँड मध्ये एका व्यक्तीमध्ये आढळला होता. म्हणजेच हा विषाणू 2001 पासून अस्तित्वात आहे. त्या मुळे घाबरण्याचे जास्त कारण नाही. परंतु या व्हायरस च्या अजून पर्यंत लस निघाली नाही.
HMPV व्हायरस किती घातक आहे ?
जर एखाद्या व्यक्तीला HMPV आजाराची लागण झाली तर, त्या व्यक्तीला बरे होण्यासाठी साधारणता 1 ते 2 आठवडे लागतात. तसेच HMPV ची लागण झालेल्या त्या व्यक्तीने व्यवस्तीत विश्रांती तसेच इतर काही औषधं घेतली तर हा आजार लवकर बरा होतो. HMPV हा विषाणू नवीन नाही.
HMPV आजार जरी कोविड सारखा असला तरी हा आजार कोविडच्या गटामधील नाही. या आजाराची तीव्रता COVID पेक्षा कमी आहे. तसेच HMPV या आजाराचा मृत्यू दरही कमी आहे. त्यामुळे हा आजार तितका धोकादायक किंवा घातक नाही. फक्त लहान मुले व कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांसाठी हा विषाणू धोकेदाय ठरतो.
HMPV व्हायरस मुळे जागतिक महामारी येऊ शकते का ?
तज्ञांच्या म्हण्यानुसार HMPV Virus हा 50-60 वर्षापासून अस्तित्वात आहे. परंतु त्याची ओळख हि 2001 मध्ये झाली होती. त्यामुळे एवढ्या जुन्या व्हायरस मुळे जागतिक महामारी येऊ शकत नाही. परंतु या विषाणू मध्ये काही जनुकीय बदल झाल्यास जागतिक महामारी येऊ शकते.
HMPV विषाणू कसा पसरतो ?
HMPV विषाणू शक्यतो हिवाळ्यामध्ये आणि वसंत ऋतूमध्ये जास्त पसरतो, प्रामुख्याने हा आजार संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. म्हणजेच हा आजार एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीला होतो.
एकदा HMPV संक्रमित व्यक्ती खोकलतो किंवा शिंकतो तर, त्या व्यक्तीच्या शरीरामधून निघणाऱ्या बारीक कानांच्या माध्यमातून वातावरणात पसरतो. त्या वातावरणात एखादा व्यक्ती आला तर त्याला हि या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
HMPV व्हायरस चे लक्षणे ?
सामान्य लक्षणे :-
- सर्दी होणे किंवा शिंका येणे.
- खोकला येणे
- घसा खवखवणं
- ताप येणे
गंभीर लक्षणे :-
- चक्कर येणे.
- श्वास घेण्यास त्रास होणे
- आजाराची तीव्रता वाढल्यास न्युमोनिया होण्याची लक्षणे दिसतात.
HMPV विषाणू होऊ नये म्हणून काय करावे ? काय करू नये ?
काय कराव ?
- सहसा गर्दी असलेल्या ठिकाणी जाने टाळावे.
- सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दी असलेल्या ठिकाणी मास्क लाऊन जावे.
- बाहेरून घरी आल्यावर हाताला सॅनिटायझर लावावे.
- खोकला किंवा शिंकाआल्यावर, तोंडावर, नाकावर रूमला किंवा टिश्यू पेपर लावावा.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारीत सॅनिटायझरने हात धुवावेत.
- भरपूर पाणी प्या व पोष्टिक अन्न खा.
काय करू नये ?
- पुन्हा पुन्हा टिश्यू पेपर किंवा रुमालाचा पुनर्वापन करू नये.
- आजारी लोकांशी एकदम जवळचा संपर्क साधू नका.
- तोंड ,नाक आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये, स्पर्श केल्यास HMPV होण्याची शक्यता वाढते.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावेत.
- अंदाजपंजे औषधे घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
HMPV Virus चा कोणाला जास्त धोका आहे ?
- HMPV व्हायरस ची लागण कोणालाही होऊ शकते.
- जास्त करून HMPV विषाणूची लागण छोट्या मुलांना, वय वृद्ध लोकांना किंवा कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोंकाना होते.
- विशेषता 5 वर्षा खालील मुलांना या विषाणूचा धोका आहे.
HMPV बाबत तुम्हाला हे माहित आहे का ?
1. HMPV विषाणू गंभीर नाही, तरी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे.
2. HMPV विषाणू ची अजून पर्यंत लस निघाली नाही.
3. रोगप्रतिकार शक्तीने हा आजार बरा होतो.
4. या विषाणूला नागरिकांनी घाबरू नये, या विषाणूपासून मृत्यूचा धोका खूप कमी आहे.
5. सर्दी, ताप, खोकला हि या व्हायरसची लक्षणे आहे.
6. पाच वर्षाखालील सर्वच मुलांना HMPV जास्त धोका असतो.
7. नऊ महिन्याच्या आत जन्मलेल्या बाळांना, तसेच दमा असलेल्यांना या व्हायरसचा अधिक धोका आहे.
8. HMPV व्हायरसची पहिल्यांदा 2001 मध्ये ओळख पटली, मात्र हा व्हायरस किमान मागील 50-70 वर्षापासून अस्तित्वात असल्याच तज्ञांच मत
China HMPV virus all details in marathi