नमस्कार मिंत्रानो, आज आपण 5 लाख रुपये पर्यंत वैद्यकीय उपचार मोफत म्हणजेच “आयुष्मान भारत योजना ” (Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023-24) या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.
आयुष्यमान भारत योजना (PMJAY) काय आहे ?
आयुष्मान भारत योजने अंतर्गत लाभार्थ्याला दर वर्षी ५ लाख रुपये पर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. या योजने अंतर्गत तुम्ही कोणत्याही सूचित झालेल्या Government किवा Private हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करू शकतात. नुकतीच सरकारने आयुष्यमान भारत या योजने अंतर्गत नवीन वेबसाईट पोर्टल लॉन्च केलय. २८ जुलै २०२३ GR ( शासन निर्णय ) नुसार, आता सर्व रेशनकार्ड धारक आयुष्यमान भारत कार्ड ( गोल्डन कार्ड ) काढू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबर रोजी पंडीत दीन दयाल उपाध्य यांच्या जयंतीदिनी आयुष्यमान भारत योजना ( प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ) देशभरात लागू केली. दिनांक २८ जुलै २०२३ GR नुसार सर्व रेशनकार्डधारकांना या योजनेत समाविष्ठ करण्यात आले आहे.
लाभार्थीना online अर्ज https://beneficiary.nha.gov.in या नवीन संकेतस्थळावर करू शकतो. या योजना मुळे देशातील कोणताही नागरिक आर्थिक अडचणीमुळे उपचार घेण्यापासुने वंचित राहणार नाहीत, या योजनेचे हे मुख्य वैशिष्ट आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकच :-
प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महत्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना शासना मार्फत एकीकृत पद्धतीने राबवण्यात येत असून, महाराष्ट्रातील थेट १२ कोटी नागरीकांना एकाच कार्ड द्वारे लाभ मिळणार आहे. महात्मा ज्योतीराव फुले हि महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांशी आरोग्य विमा योजना आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना ( PMJAY ) या दोन्ही योजनांमध्ये सामाविष्ट असलेल्या सर्व उपचाराचा लाभ आता लाभार्थ्याला घेता येणार आहे.
MSRTC Scheme : एस टी बस योजना ( लालपरी )
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने मध्ये आधी ९९६ उपचार समाविष्ठ आहेत. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजने मध्ये १२०९ उपचार समाविष्ट आहे. आता दोन्ही योजने मध्ये समविष्ट असलेल्या आजारांच्या संख्यांमध्ये भर घालून १३५६ इतकी करण्यात आली आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजने मध्ये स्माविष्ट असलेल्या हॉस्पीटलांची हि संख्या एक हजार पेक्षा जास्त करण्यात आली आहे. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये प्रति रुग्णाला २.५ लक्ष रु एवढा लाभ मिळायचा. सदर लाभ हा आता वाढवून तो आता ५ लक्ष रु पर्यंत करण्यात आला आहे.
आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ? Ayushman Bharat Yojana Maharashtra
तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्र किवा CSC सेंटरला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज शकतात किंवा तुम्ही स्वत: जवळ असलेल्या Android मोबाईल वरून खालील स्टेप फॉलो करून सुद्धा या योजनेला अर्ज करू शकतात व आयुष्मान भारत कार्ड (गोल्डन कार्ड काढू शकतात.
असा करा तुमच्या Android मोबाईल वरून अर्ज :-
• सर्वात आधी https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावर (वेबसाईट) जावे लागेल.
• त्यानंतर Login as => Beneficiary या Tab वर जाऊन मोबाईल नंबर Verify या वर क्लिक करा.
• आता तुमच्या मोबाईल नंबर वर OTP येईल तो, स्क्रीनवर दिलेल्या रकान्यात भरा आणि सोबत खालच्या रकान्यात स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड तासाचा तसा भरा व खाली देलेल्या Login या बटनावर क्लिक करा.
• आता तुमच्या स्क्रीन वर नवीन पेज उघडेल. तिथे तुम्हाला तुमचे राज्य व जिल्हा यांची निवड करावी.
• त्यानंतर तुम्हाला Search By या ड्रोपडाऊन लिस्ट मध्ये, Family ID (Ration Card No) 2. आधार नंबर 3. नाव, यापैकी कोणतेही एक ऑपशन निवडून, खालील दिलेल्या रकान्यात रेशन नंबर किवा आधार नंबर भरावे.
Ayushman Bharat Yojana In Marathi
• त्यानंतर त्यासमोर search या आयकॉन वर क्लिक करावे.
• त्यांतर तुम्हाला रेशनकार्ड मध्ये समाविष्ट असलेल्या परिवाराची माहिती दिसेल, ती संपूर्ण माहिती आधारकार्ड प्रमाणे नाव व पत्ता बरोबर आहे का तपासून घ्यावे.
• त्यानंतर Action या Tab मध्ये आइकॉन (KYC) दिसेल तेथे क्लिक करावे.
• त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, तिथे तुमचा आधार नंबर दिलेला असेल त्यासमोर वेरीफाय या वर क्लिक करा.
• त्यानंतर Consent म्हणून एक नवीन विंडो ओपन होईल ते वाचून खाली => Yes I Wish to Create/ Link my ABHA with PMJAY ID. या वर क्लिक करून खाली दिलेल्या Allow या बटनावर क्लिक करा.
• त्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP जाईल तो प्रविष्ठ करून AUTHENTICATE या वर क्लीक करा.
• त्यानंतर तुम्हाला खाली E-KYC साठी तीन ऑपशन दिसतील. त्या पैकी आधार OTP या ऑपशन वर क्लिक करून Verify करून Allow घ्यावे.
• त्यानंतर पुन्हा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबरला OTP जाईल, तो OTP रकान्यात टाकावा, त्यानंतर Automatic तुमची माहिती येईल, पूर्ण माहिती बरोबर आहे का तपासून घ्यावी.
• त्यानंतर Capture Photo वर क्लिक करावे, Permission Allow करावी, तुमचा कॅमेरा ओपेन होईल त्यानंतर कार्डधारकाचा पासपोर्ट साईज एवढा लाईव्ह फोटो Capture करावा आणि PROCEED या बटनावर क्लिक करावे.
• त्यानंतर Matching Score दिसेल तो, ग्रीन (हिरवा) कलर मध्ये आला पाहिजे, तरच तुम्ही हे कार्ड काढू शकनार आहे.
• त्यानंतर कार्डधाकारचा मोबाईल नंबर टाकून Verify करून OTP टाकून घ्यावा.
• कार्डधाकचे जन्म वर्ष आणि Head Of Family यांच्याशी असलेले रिलेशन टाकून घ्यावे.
• त्यानंतर तुमचा पिनकोड, जिल्हा, Rural / Urban (ग्रामीण / शहरी ), तालुका, गाव सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करावे.
• आता तुमचा अर्ज हा Approval साठी पुढे सेंड केला जातो, Approval जसे आले तसे तुम्ही हे कार्ड डाऊनलोड करू शकतात.
आयुष्मान भारत या योजने मध्ये समाविष्ठ झालेले हॉस्पिटल लिस्ट कशी बघायची ?
• सर्व प्रथम आयुष्यमान भारत योजने मध्ये समाविष्ठ झालेले हॉस्पिटल लिस्ट बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.
• आता आपल्या समोर एक पेज ओपन होईल, त्या पेजवरील Find Hospital या Tab वर क्लिक करावे.
• आता राज्य, जिल्हा, हॉस्पिटल इ. माहिती भरून कॅपच्या कोड टाकून Search करावे.
• सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हॉस्पिटलची पूर्ण माहिती Email, Phone Number व उपलब्ध कोणकोणत्या सुविधा आहे याची पूर्ण माहिती मिळेल.
Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023 | |
योजनेचे नाव | आयुष्मान भारत योजना – PMJAY |
वैद्यकीय लाभ | प्रति वर्ष ५ लाख रु |
हेल्पलाईन नंबर | 14477 |
हॉस्पिटल लिस्ट | येथे क्लिक करा |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
Android App | येथे क्लिक करा |
कार्ड | आयुष्मान भारत / गोल्डन कार्ड |
शासन निर्णय | २८ जुलै २०२३ |
आयुष्मान भारत योजनेचे लाभ व विशेषता :-
• आयुष्मान भारत हॉस्पिटल लिस्ट २०२३ अंतर्गत, ज्या हॉस्पिटलचे नाव या योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे त्या हॉस्पिटलमध्ये ५ लाख रु. पर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.
• आयुष्यमान भारत योजनेमधील समाविष्ठ हॉस्पिटल बघण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही, घरी बसल्या बसल्या इंटरनेट द्वारे संकेतस्थळावर आपण पाहू शकतो.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे PMJAY – आयुष्मान भारत कार्ड (गोल्डन कार्ड ) असणे गरजेचे आहे.
सारांश :-
मित्रांनो, या लेख मध्ये आम्ही तुम्हाला आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana Maharashtra ) या योजने बद्दल महिती दिली आहे. नक्की तुम्हाला हि माहिती उपयोगी पडेल, मला आशा आहे कि हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल व या योजनेची माहिती शेअर करून जास्त लोकांन पर्यंत पोचवाल.
धन्यवाद ..
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
1. आयुष्मान भारत (गोल्डन कार्ड) कोण काढू शकतो?
👉 २८ जुलै २०२३ GR (शासन निर्णय ) नुसार सर्व रेशनकार्ड धारक हे कार्ड काढू शकतात.
2. आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढायला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे असणे आवश्यक आहे का ?
👉होय, तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असणे गरजेचे आहे नसेल तर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन लिंक करून घ्यावा किवा जवळच्या महा ई सेवा केंद्र किवा CSC सेंटर मध्ये जाऊन अंगठा देऊन कार्ड काढू शकतात.
3. आयुष्मान भारत या योजने मध्ये माझे नाव दिसत नाही आहे, काय करावे लागेल ?
👉 तहसील कार्यलयात जाऊन आपले रेशन कार्डची online नोंद करून १२ अंकी नंबर घ्यावा तरच तुमच नाव आयुष्मान भारत योजने मध्ये येईल.
4. KYC करतांना Matching Score किती पाहिजे ?
👉 जर तुमचा Matching Score हिरव्या कलर मध्ये आला तर कार्ड काढावे नाहीतर कार्ड काढू नये.
5. रेशन कार्ड वरील माहिती आणि आधार कार्ड वरील माहिती जुळत नसेल तर ?
👉 रेशनकार्ड आणि आधार कार्ड वरील नाव सेम असेल तरच कार्ड काढा अन्यथा कार्ड काढून नये.
6. Face did not match असा प्रॉब्लेम येतोय ?
आधार कार्ड वरील फोटो अपडेट करवा. आधार कार्ड आणि Capture केलेला फोटो सेम असावा.
7. अप्लिकेशन Submit केलाय पण कार्ड Download होत नाही आहे ?
👉 पुन्हा लॉगिन करून KYC जवळ डाऊनलोड ऑप्शन आहे तेथून डाऊनलोड करा, त्यानंतरही डाऊनलोड होत नसेल तर हिच प्रोसेस लैपटॉप किवा कॉम्पुटर वर करावी.
8. माझे कार्ड पेंडींग मध्ये पडलेले आहे ?
👉 तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड वरील सर्व माहिती सारखी करून घ्या आणि नंतर परत KYC करा.
9. कुटुंबामधील काही व्यक्तीची नावे दिसत नाही आहे?
👉 Add Member चा ऑप्शन दिला आहे त्यावर क्लीक करून तुम्ही कुटुंबातील व्यक्तीची नावे जोडू शकतात.
10. मोबाईल वरून पण आयुष्मान भारत ( गोल्डन कार्ड ) काढता येते का ?
👉 हो, मोबाईल वरून आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी आमचा आयुष्यमान भारत योजना 👈 हा लेख वाचा.