Amrut Yojana Maharashtra 2025 : जे विद्यार्थी शासकीय संगणक टंकलेखन कोर्स (GCC-TBC Typing Course ) किंवा लघुलेखन ( Shorthand ) परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. अश्या विद्यार्थ्यांनसाठी संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना आहे.
या योजनेअंतर्गत टायपिंग कोर्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला 6500 रु. अर्थसहाय्य व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला 5300 रु. अर्थसहाय्य दिल्या जाते. परंतु या योजनेसाठी कुठे अर्ज करावा ? पात्रता काय आहे ? लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागेल ? याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या या लेखाच्या माध्यमातून.
योजनेचा उद्देश :- Amrut Yojana Typing
ऑनलाईन लघुलेखन ( Shorthand ) परीक्षा आणि शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स परीक्षा GCC-TBC च्या माध्यमातून महाराष्ट्रामधील ओपन प्रवर्गातील अमृत लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे होय.

योजनेअंतर्गत लाभ किती दिला जाईल :- GCC TBC Typing Yojana
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, GCT-TBC कॉम्पुटर टायपिंग परीक्षा :-
जे विद्यार्थी मराठी / हिंदी / इंग्लिस : 30, 40, 50 व 60 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना एकरकमी रक्कम 6500/- रुपये एवढे अर्थसहाय्य देण्यात येते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, ऑनलाईन लघुलेखन परीक्षा ( Shorthand ) :-
जे विद्यार्थी मराठी / हिंदी 60, 80, 100, 120, 130, 140, 150 व 160 शब्द प्रती मिनिट परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना एकरकमी रक्कम 5300/- रुपये एवढे अर्थसहाय्य देण्यात येते.
सदर रक्कम हि लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येईल.
Typing Yojana | Amrut Yojana Maharashtra | GCC TBC Typing Yojana
Amrut Yojana Maharashtra 2025 Typing पात्रता :-
- अर्जदाराने परीक्षेसाठी इतर कोणत्याही संस्थेकडून अर्थसहाय्य घेतलेले नसावे.
- अर्जदार हा कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा.
- अर्जदार हा डिसेंबर 2024 मध्ये शासकीय टंकलेखन बेसिक कोर्स किंवा ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा. Amrut Yojana Maharashtra 2025

संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना साठी कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल
- वय अधिवास प्रमाणपत्र ( Nationality )
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र अथवा EWS चालू वर्षाचे
- बँक पासबुक / Cancel Cheque
- अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र ( स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा )
- संस्थाचालकाचे स्वयंघोषणापत्र ( संस्थाचालकाचे स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा )
- परीक्षा शुल्क पावती
- परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ( माहे डिसेंबर 2024 )
Amrut Yojana Maharashtra 2025 योजनेसाठी अर्ज कुठे करायचा :-
1. Amrut Yojana Maharashtra 2025 साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अमृत संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी ऑनलाईन करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला अमृत योजनेसाठी अर्ज करावा लागेल. नोंदणी (Registration) व अर्ज करण्यासाठी लिंक 👉 येथे क्लिक करा.
2. आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे / दस्तावेज ऑनलाईन अपलोड करावे.
3. त्यानंतर अर्जाची प्रत व योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड ( Self-Attested ) करून मुदतीच्या आत अमृत संस्थेच्या ऑफिसला पाठवणे आवश्यक असेल.
Amrut Yojana Typing | |
योजना | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना |
स्वायत्त संस्था ( Amrut ) | Academy of Maharashtra Research, Upliftment and Training |
लाभार्थी | GCC-TBC व ऑनलाईन लघुलेख परीक्षा पास झालेले विद्यार्थी |
लाभ | GCC-TBC परीक्षा उत्तीर्ण विध्यार्थ्यांना 6500 रु. लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण विध्यार्थ्यांना 5300 रु. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 एप्रिल 2025 |
अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र | येथे क्लिक करा |
संस्थाचालकाचे स्वयंघोषणापत्र | येथे क्लिक करा |
प्रसिद्धी पत्र बघण्यासाठी | येथे क्लिक करा |
विभानुसार संपर्क | येथे क्लिक करा |
ई मेल आयडी | info@mahaamrut.org.in |
पत्ता | महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, 5 वा मजला, औंध, पुणे 411067 |
अमृत लक्ष गट :-
ओपन प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनेचा लाभ भेटत नाही.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, GCC-TBC व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-
1. संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
👉 अर्जदार हा कमीत कमी 10 वी पास असावा.
2. एक लाभार्थी एकाचवेळी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यास दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल का ?
👉 होय, एका सत्रात टंकलेखनसाठी 3 विषय व लघुलेखनसाठी 3 विषय अनुज्ञेय राहील.
3. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे व्यतिरिक्त इतर संस्थेमार्फत परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी योजनेस पात्र असेल का ?
👉 नाही, फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यता प्राप्त संस्थेमार्फत परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी योजनेस पात्र असतील.
4. संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो ?
👉 डिसेंबर 2024 मध्ये शासकीय टंकलेखन व लघुलेखन परीक्षा पास झालेले उमेदवार या योजने अर्ज करू शकतात.