Ahilyadevi Holkar Mahila Startup yojana : महिला स्टार्टअप योजना, 25 लाख रुपया पर्यंत अर्थसहाय्य

Ahilyadevi Holkar Mahila Startup yojana In Marathi : व्यवसाय, उद्योग तसेच स्टार्टअपला पाठबळ देण्यासाठी व महाराष्ट्र राज्याची ओळख, देशामध्ये सर्वाधिक जास्त महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून व्हावे, याकरीता शासना मार्फत अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु करण्यात आली.

Ahilyadevi Holkar Mahila Startup yojana काय आहे ?

महाराष्ट्र राज्यातील ज्यांनी नवीन व्यवसाय, उद्योग तसेच स्टार्टअप स्टार्ट केलाय आणि त्या स्टार्टअप मध्ये महिला नेतृत्व करत आहे, अश्या महिलांना एकवेळचे अर्थ सहाय्य Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup yojana द्वारे केले जाणार आहे. हे अर्थ सहाय्य महाराष्ट्र सरकार द्वारे 1 लाख रुपये पासून 25 लाख रुपयांपर्यंत दिल्या जाणार आहे.

सदर अर्थ सहाय्य प्राप्त करण्यासाठी स्टार्टअप मध्ये महिला नेतृत्व करत असावी. तसेच स्टार्टअप मध्ये महिलीचे 51% पेक्षा जास्त भागेदारी असायला हवी.

योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो ? Ahilyadevi Holkar Mahila Startup yojana

जर तुम्ही एखादा नवीन बिझनेस, उद्योग किंवा स्टार्टअप सुरु केलाय आणि त्या स्टार्टअप मध्ये महिलेची 51% भागीदारी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. सदर स्टार्टअप नोंदणीकृत असावे.

तसेच महिलेने स्टार्टअप चे नेतृत्व कमीत कमी एक वर्षा पासून करत असावी. तसेच नेतृत्व करत असतांना स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल हि 10 लाख ते 1 कोटी रुपये पर्यंत असावी.

पात्रता :- Ahilyadevi Holkar Mahila Startup yojana Eligiility

1. स्टार्टअप हे DPIIT ( Department for Promotion of Industry & internal trade ) मान्यताप्राप्त असावे.

2. स्टार्टअप हे महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत असावे.

3. स्टार्टअप कंपनीत 51% पेक्षा जास्त महिला भागीदार असाव्यात.

4. स्टार्टअप मध्ये एक वर्षा पेक्षा जास्त काळ महिला कार्यरत असाव्यात.

5. स्टार्टअप मध्ये महिलांच्या नेतृत्वाचे एकूण उत्पन्न हे 10 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान असावे.

6. स्टार्टअपने महिलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही घेतला नसावा.

अर्ज करण्याची पद्धत :-

1. Ahilyadevi Holkar Mahila Startup yojana करीता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी https://www.msins.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

2. ऑनलाईन अर्ज करतांना कोणतीही शुल्क लागत नाही, सदर योजनेचा अर्ज हा निशुल्क आहे.

3. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या वेळी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे, (MCA, DPIIT ) मान्यता प्रमाणपत्रे ई. कागदपत्रे जवळ असायला हवे.

4. योजनेसाठी आलेल्या अर्जांपैकी आश्वासक, नाविन्यपूर्ण व प्रभावी (Promising, Innovative & High impact ) या स्टार्ट अप्सला प्रधान्य देण्यात येणार.

5. तसचे जे स्टार्टअप जास्त रोजगार निर्मिती करणार त्या स्टार्टअप ला विशेष प्रधान्य देण्यात येणार.

6. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजने मध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे तसेच योजनेचा आढावा घेण्यासाठी एक विशेष समिती गठीत करणार आहेत. या समितीचे नाव “ सनियंत्र व आढावा समिती” असे ठेवण्यात आले आहे.

7. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा प्रचार व प्रसिद्धी साठी 1% निधी खर्च करण्यात येणार आहे.

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :-

1. कंपनीचे प्रेझेंटेशन ( Pitch Deck )

2. MCA कंपनी नोंदणी क्रमांक

3. DPIIT प्रमाणपत्र

4. Audit Report

5. कंपनी लोगो

6. संस्थापकाचा फोटो

7. उत्पादनाचा फोटो ( Product/ Service Photo )

    Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana In Marathi
    योजनेचे नावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
    लाभार्थीमहाराष्ट्रातील महिला
    विभागकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
    लाभ1 ते 25 लाख रुपये अर्थ सहाय्य
    अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
    वेबसाईटयेथे क्लिक करा
    शेवटची तारीख14 ऑगस्ट 2024
    श्रेणीमहाराष्ट्र सरकार योजना
    वर्ष2024

    योजनेचे उद्दिष्ट :-

    1. महाराष्ट्र राज्यातील ज्या स्टार्टअपचे नेतृत्व महिला करत असतील, त्या स्टार्टअप ला पाठबळ देणे.

    2. ज्या स्टार्टअप मध्ये कोणतीतरी नवीन संकल्पना आहे. तसेच व्यवसाय वृद्धी किंवा विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे.

    3. महिला स्टार्टअपला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.

    4. देशात सर्वात जास्त महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख निर्माण करणे.

    5. Ahilyadevi Holkar Mahila Startup yojanaच्या  माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणे व बेरोजगारी कमी करणे.

    6. योजनेअंतर्गत मागास वर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिला वर्गासाठी 25 टक्के राखीव ठेवण्यात येईल.

    7. स्टार्टअप मधील परंभिक टप्यात उलाढालीनुसार किमान 1 लाख ते कमला 25 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.   

    निष्कर्ष :-

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत महिलांना पाठबळ देणे व त्यांना अर्थसहाय्य करणे हा मुख्य उद्देश आहे.

    Leave a Comment