ABHA Card In Marathi : आभा कार्ड काय आहे ? कसे काढायचे ? फायदे काय ? | Benefits of ABHA card

Abha Card in Marathi : आभा कार्ड, हा शब्द तुम्ही कुठेना कुठे एकला असेलच, परंतु हे ABHA Card काय आहे? हे कार्ड कसे बनवायचे? आभा कार्डचे फायदे काय ? शिवाय आभा कार्डला बनवण्यासाठी कोणती कागदे लागतात? चला तर मग या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या.

आभा (ABHA) कार्ड काय आहे ?

आभा हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट होय. आभा हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. ज्यात नागरिकांच्या आरोग्यासंबधी माहिती नोंदवली जाते.

आभा कार्ड हे एक आधार कार्ड सारखे असून या कार्ड मध्ये १४ अंकी ओळख क्रमांक असतो. या क्रमांकाच्या मदतीने डॉक्टरांना काही न सांगता, तुमच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती मिळून जाते, त्यामुळे वेळेची बचत होते. 

आभा कार्ड मध्ये असेल हि माहिती :- Abha Card in Marathi

  • रुग्णाचा कोणत्या आजारावर उपचार झाला ?
  • कधी व कोणत्या दवाखान्यात उपचार झाला ?
  • रुग्णाने कोणकोणत्या टेस्ट केल्यात ?
  • कोणत्या औषधी देण्यात आल्या ?
  • रुग्णाला आरोग्यासंबधी कोणत्या समस्या आहेत ?

आभा कार्ड बनवण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात ?

आभा कार्ड हे दोन पद्धतीने तयार करता येते. आधार कार्डद्वारे किंवा ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे, आभा कार्ड बनवता येते.

आधार कार्डद्वारे आभा कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार क्रमांक
  • आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर

 ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे आभा कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • नाव
  • जन्म तारीख

Abha Card in Marathi

आयुष्यमान भारत योजना : ५ लाखापर्यंत मोफत उपचार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना Whatapp Group Join

असे बनवा तुमचे आभा कार्ड :- ABHA Card Registration

  • स्टेप १ :- सर्वप्रथम अर्जदाराला https://abha.abdm.gov.in/abha/v3/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • स्टेप २ :- त्यानंतर आभा क्रमांक तयार करा ( Create ABHA Number ) या बटनावर क्लिक करा.
  • स्टेप ३ :- आता तुम्हाला आभा कार्ड तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.
    • अ)आधार कार्ड
    • ब) ड्रायव्हिंग लायसन्स,

जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स या पर्यायाने आभा कार्ड काढू शकतात, अन्यथा आधारकार्ड हा पर्याय निवडा. ( ABHA Card Registration )

Abha Card in Marathi
  • स्टेप ४ :- त्यानंतर विचारल्याप्रमाणे तुमचा आधार कार्ड नंबर रकान्यात भरावा आणि मला मान्य आहे ( I Agree ) या वर क्लिक करून कॅप्चा कोड भरून पुढे जा ( Next ) या बटनावर क्लिक करा.
ABHA Card Registration
  • स्टेप ५ :- त्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वरती सहा अंकी OTP गेला असेल, तो OTP पृष्टी करा या रकान्यात भरून, त्याखालील रकान्यात आधार लिंक मोबाईल नंबर भरून, पुढे जा बटनावर क्लिक करा.
Abha Card process
  • स्टेप ६ :- आभा कार्डला तुम्ही तुमचा ईमेल आयडी जोडू शकता, अन्यथा त्या स्टेपला स्किप करा.
  • स्टेप ७ :- त्यानंतर तुम्हाला आभा पत्ता तयार करा असे विचारले जाईल, आभा पत्ता तयार करण्यासाठी कमीत कमी ८ अक्षरे/नंबर जास्तीत जास्त १८ अक्षरे वापरता येतात.

तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आभा पत्ता तयार करू शकतात, त्यानंतर आभा तयार करा (Create ABHA) या बटनावर क्लिक करा. ( आभा पत्ता ई-मेल आयडी सारखा असतो. )

Abha Card Adderss
  • स्टेप ८ :- आता तुमच्या समोर आभा कार्ड दिसेल. ते आभा कार्ड तुम्ही डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतात.

आभा कार्डचे फायदे काय ? Benefits of ABHA Card ?

👉 तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती आभा कार्ड मध्ये इलेक्ट्रोनिक पद्धतीने नोंदवता येते.

👉 रुग्णालयात प्रवेश फॉर्म भरण्याच्या रांगेत उभे राहण्याची गरज रहाणार नाही.

👉 डॉक्टरांना तुमच्या आरोग्याची माहिती त्वरित ऍक्सेस करता येते, त्यामुळे अधिक अचूक आणि वेळेवर उपचार करतात येते.

👉 तुमच्या आरोग्याची माहिती तुमची संमती असेल तरच, माहिती शेअर केली जाते.

👉 या कार्ड मध्ये तुमच्या आरोग्याची हिस्ट्री, मागील उपचार, औषधे, टेस्ट, डिस्चार्ज सारांश इत्यादी माहिती डॉक्टरांना मिळून जाते, त्यामुळे वेळेवर उपचार मिळण्यास मदत होते.

👉 आभा कार्डमुळे तुम्हाला इतर कोणतीही कागदे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोबत घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही.

👉 डॉक्टरला आभा कार्ड वरून तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती मिळून जाते. त्यामुळे वेळेची व पैशांची बचत होईल.

Benefits of ABHA card | आभा कार्डचे फायदे

Abha Card In Marathi
योजनाआभा हेल्थ कार्ड
विभागआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
लाभार्थीभारताचा नागरिक
वेबसाईटhttps://abha.abdm.gov.in/
अॅपhttps://play.google.com/store/apps/details?id=in.ndhm.phr&pli=1
हेल्पलाईन1800 11 4477
श्रेणीभारत सरकार

भविष्यात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये तपासणी किंवा शासकीय अनुदाना आधारे उपचार करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आभा कार्ड आहे का ? असे विचारल्या जाऊ शकते, त्यामुळे आपले आभा कार्ड आजच बनवून घ्या व इतरांना हि माहिती शेअर करून आभा कार्ड बद्दलची माहिती द्या.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. आभा क्रमांक काय आहे ?

👉 आधार कार्ड प्रमाणे, एक 14 अंकी क्रमांक आहे, या क्रमांकाच्या मदतीने डॉक्टरांना न सांगता तुमच्या आरोग्याविषयी या आधीची माहित मिळून जाते.

2. आभा कार्ड सर्वांसाठी आहे का ?

👉 हो, आभा कार्ड हे भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे.

3. आधार कार्डला आभा कार्ड कसे लिंक करावे ?

👉 जेव्हा तुम्ही आभा कार्ड काढता तेव्हाच ते आपोआप तुमच्या आधार कार्डला लिंक होऊन जाते.

4. आयुष्यमान भारत कार्ड ( गोल्डन कार्ड ) आणि आभा कार्ड एकाच आहे का ?

👉 नाही, आभा कार्डचा वापर वैद्यकीय नोंदणीसाठी केला जातो. आयुष्यमान भारत हि एक सरकारी विमा योजना आहे.

5. आभा कार्ड खाजगी रुग्णालयात वापरता येते का ?

👉 हो

6. १८ वर्षाखालील मुलांचे आभा कार्ड काढता येईल का ?

👉 हो

7. आभा कार्ड कसे डाउनलोड करावे ?

👉 https://abha.abdm.gov.in/abha/v3/login या वेबसाईट वर जाऊन तुम्ही मोबाईल नंबर, आधार नंबर किंवा आभा नंबर वरतून तुम्ही आभा कार्ड काढू शकतात.

1 thought on “ABHA Card In Marathi : आभा कार्ड काय आहे ? कसे काढायचे ? फायदे काय ? | Benefits of ABHA card”

Leave a Comment