आचारसंहिता म्हणजे काय ? आचारसंहिता लागू झाल्यावर काय करावं आणि काय करू नये ? Achar Sanhita in Maharashtra – 2024

Achar Sanhita in Maharashtra : निवडणूक आयोगातर्फे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच निवडणूक आचारसंहिता लागू होते.

आचारसंहिता म्हणजे काय असते ? आचारसंहिता लागू झाल्यावर काय करता येत ? काय करता येत नाही ? ( Achar Sanhita 2024 ) आचारसंहितेचे नियम काय आहे ? या बद्दल संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ या.


महाराष्ट्र राज्यात निवडणुका जाहीर :- Achar Sanhita
2024

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन, महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात सन 2024 साठी विधानसभा निवडणुकीसाठी घोषणा केली.

निवडणूक आयोगाने घोषणे मध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक हि जारी केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वेळापत्रक :-

वेळापत्रकतारीखवार
अर्ज भरण्याची शेवटची तारीख29 ऑक्टोंबर 2024मंगळवार
अर्ज पडताळणी तारीख30 ऑक्टोंबर 2024बुधवार
अर्ज रिटर्न घेण्याकरीता शेवटची तारीख4 नोव्हेंबर 2024सोमवार
मतदानाचा दिवस20 नोव्हेंबर 2024बुधवार
मतमोजणी तारीख23 नोव्हेंबरशनिवार
Achar Sanhita 2024 | आचारसंहिता म्हणजे काय ? | Achar Sanhita in Maharashtra

आचारसंहिता म्हणजे काय ?

देशात स्वतंत्रपने आणि निष्पक्षपातीपने निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगाने ठराविक काळासाठी लावलेले काही नियम म्हणजे आचारसंहिता होय.

थोडक्यात राजकीय पक्ष आणि नेत्यांनी निवडणूक झाहीर झाल्यानंतर काय करायचं आणि काय करायचं नाही हे आचारसंहितेत सांगितले जाते.

आचारसंहिता केव्हा पासून सुरु करण्यात आली ?

सर्व प्रथम सन 1960 मध्ये केरळ राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी राज्य प्रशासनाने निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती.

त्यांतर 1962 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदा संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली. मुक्त वातावरणात आणि न्यायपूर्ण पद्धतीने निवडणुका व्हाव्यात यासाठी आचारसंहिता महत्वाची असते.


आचारसंहितेचा मुख्य उद्देश :- Achar Sanhita in Maharashtra

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, आदर्श लोकशाही देश म्हणून भारत देशाची जगभरात ओळख आहे.

त्यामुळेच लोकशाहीचे आदर्श पूर्ण करण्यासाठी, लोकशाहीचा पाया असलेल्या निवडणुकांमध्ये काही गैर प्रकार होणार नाही. या गोष्टीची काळजी घेण म्हणजेच आचारसंहितेचा मुख्य उद्देश होय.


आचारसंहिता केव्हा लागू होते ?

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होई पर्यंत आचारसंहिता लागू राहते.

आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक सरकारी उपक्रमांवर, योजनांवर आणि कामांवर आपोआप बंदी येते, तसेच कोणी आचारसंहितेचा भंग केल्यास त्याला थेट कारवाईला सामोरे जावे लागते.


आचारसंहिता कोणाला लागू होते ? Achar Sanhita 2024

आचारसंहिता हि फक्त राजकीय पक्ष, नेते यांनाच लागू होते असे नाही. मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा, मतदान केंद्रावर काय करता येत आणि काय नाही, निवडणुकादरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी, अश्या भरपूर नियमांचा आचारसंहितेत समावेश असतो.


आचारसंहिता लागू झाल्यावर सत्ताधारी पक्षाला काय करता येत नाही ?

सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरु करता येत नाही. तसेच त्यांना शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रम घेता येत नाही.

Achar Sanhita 2024, Achar Sanhita Maharashtra

आचारसंहिता नियम :- Achar Sanhita in Maharashtra

सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे लागते. या नियमांचा मुख्य उद्देश असा कि आचारसंहिता कालवधीत प्रचार, मतदान आणि मतमोजणी सुव्यवस्थित, योग्य आणि शांततेत पार पडावी.

1. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला धर्म, जाती, पंथ याद्वारे मतदारांना मत देण्याच अवाहन करू शकत नाही.

2. कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरसुद्धा राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रक असं काही लावण्यापूर्वी संबधित व्यक्तीची परवानगी घेणे गरजेच असत.

3. विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नसते.

4. प्रचार करण्याच्यावेळी किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्याची मनाई आहे.

5. मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करू शकत नाही.

6. तसेच प्रचाराची अवधी संपल्यानंतर हि प्रचार करत येत नाही.

7. मतदारांना मतदान केंद्र पर्यंत घेऊन जाणे किंवा परत आणणे, त्यांच्या जाण्या – येण्याची सोय करणे, यापैकी काहीही करण्यास आचारसंहिते नुसार बंदी आहे.


    आचारसंहितेत काय करावे ? किंवा करता येईल ?

    1. निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येऊ शकतात.

    2. पूर, घातक रोगाची साथ किंवा इतर नैर्सगिक आपत्ती यांच्यामुळे प्रभाविक झालेल्या क्षेत्रामध्ये जनतेसाठी पिडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता येते किंवा चालू ठेवता येते.

    3. गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेस रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येईल.

    4. राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टिका, त्यांची धोरणे, कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य या संबधित असला हवी.

    5. सभा घेण्याची जागा आणि वेळ याबाबतची माहिती स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घ्यावी.

    6. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी.

    7. मिरवणूक असेल तर, मिरवणूकीची वेळ व जागा, तसेच मिरवणुकीचा मार्ग आणि मिरवणूक जिथे संपणार तेथील वेळ आणि जागा अगोदर निच्छित करण्यात येईल आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी.

    8. मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या सध्या कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये.

    9. आचारसंहितेचे उलंघन किंवा नियम मोडणाऱ्या एखाद्या उमेदवाऱ्याला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. जर गोष्ट गंभीर असेल तर त्या उमेदवाऱ्यावर गुन्हा दाखल तसेच कारावासाची तरतूदही आहे.


       आचारसंहितेत काय करू नये ? किंवा काय करता येणार नाही ?

      1. निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप करता येणार नाही.

        2. कुठल्याही व्यक्तीकडे बेनामी रोकड तसेच गिफ्ट सामुग्री सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते.

        3. या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचारी बदली करता येत नाही. अत्यावश्यक असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची बदली करण्याबाबत परवनागी घ्यावी लागेल.

        4. मतदारांना लाच देणे, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे, किंवा मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासात सर्वजनिक सभा घेणे.

        5. मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे, यासारख्या भ्रष्ट गोष्टींना मनाई आहे.

        6. साउंड सिस्टीम एका जागी असो या चालत्या वाहनावर बसवली असो, त्यांना सकाळी 6 पूर्वी किंवा रात्री 10 नंतर आणि संबधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय वापर करण्यात येऊ नये.

        7. सत्ताधारी पक्ष यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात काढता येणार नाही.

        8.  मतदाराला, पैशाची किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. ( Achar Sanhita in Maharashtra )

        9. वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक यांच्यामधील विद्यमान मतभेत वाढतील किवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करतील असे कोणतेही काम करून नये.

        10. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सर्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूंवर टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

        11. मंदिर, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंव इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचारासाठी भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून वापर केला जाणार नाही.

        12. सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यात कोणताही अडथळा राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी निर्माण करू नये.

        13. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा असतील अश्या ठिकाणावरून मिरवणूक नेऊ नये.

        आचारसंहिता म्हणजे काय ? आचारसंहितेत काय करावे ? काय करू नये ? Achar Sanhita in Maharashtra याबद्दल माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल.

        Leave a Comment