Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana : दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना मधील निकषामध्ये सुधारणा तसेच नवीन घटकांचा समावेश करून त्यामध्ये मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी अर्ज कुठे करावा, योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागतात ? तसेच या योजना मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश करण्यात आला, तसेच या योजनेमध्ये कोणत्या घटकाला किती अनुदान मिळते. याबद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये बघू या.
बिरसा मुंडा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना काय आहे ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना हि अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येते.
योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना “ नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विज जोडणी आकार, इनवेल बोअरिंग, पंप संच, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन ” या बाबींसाठी अनुदान देण्यात येते.
तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरावी म्हणून Birsa Munda & Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana शासनामार्फत राबवली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना केव्हा पासून राबवण्यात येते ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना हि महाराष्ट्र राज्यात दिनांक 5 जानेवारी 2017 पासून राबवण्यात येते. आता या योजनेमध्ये आर्थिक निकषाचे बदल करण्यात आले, तसेच नवीन घटकांचा समावेश करून योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात 1 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय प्रसिद्धी करण्यात आला.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
योजनेमध्ये कोणते नवीन घटक समाविष्ट करण्यात आले :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मध्ये सुधारणा करून खालील नवीन घटक समाविष्ठ करण्यात आले.
- विद्युत पंपसंच / डिझेल इंजिन
- एचडीपीई/पीव्हीसी पाईप
- यंत्र सामग्री (बैलचलीत/ ट्रॅक्टर चलित अवजारे)
- परसबाग
- विंधन विहीर
योजने अंतर्गत कश्यासाठी किती अनुदान मिळते ?
आता, नव्या विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. या आधी नव्या विहिरीसाठी शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान मिळत होते.
आता, जुनी विहीर दुरुस्ती करीता 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. या आधी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळत होत.
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana मध्ये कोणत्या बाबी किती अनुदान मिळते ?
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana अंतर्गत 12 प्रकारच्या वेगवेगळ्या बाबीसाठी अनुदान मिळते, ते खालीलप्रमाणे 👇👇👇
अ.क्र | बाब | मिळणारे अनुदान |
1 | नवीन विहीर | 4,00,000 ( चार लाख रुपये ) |
2 | शेततळे प्लॅस्टिक अस्तरीकरण | 2,00,000 ( दोन लाख रुपये ) किंवा 90% खर्च यापैकी जे कमी असेल ते |
3 | जुनी विहीर दुरुस्ती | 1,00,000 ( एक लाख रुपये ) |
4 | ठिबक सिंचन | 97,000 ( सत्यानऊ हजार रुपये ) किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% यापैकी जे कमी असेल ते |
5 | एचडीपीई / पीव्हीसी पाईप | 50,000 ( पन्नास हजार रुपये ) पर्यंत |
6 | विंधन विहीर | 50,000 ( पन्नास हजार रुपये ) पर्यंत |
7 | यंत्र सामग्री (बैलचलीत/ ट्रॅक्टर चलित अवजारे) | 50,000 ( पन्नास हजार रुपये ) |
8 | सोलार पंपसंच | 50,000 ( पन्नास हजार रुपये ) किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% यापैकी जे कमी असेल ते |
9 | तुषार संच | 47,000 ( सत्तेचाळीस हजार रुपये ) किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% यापैकी जे कमी असेल ते |
10 | विद्युत पंपसंच / डिझेल इंजिन | 40,000 ( चाळीस हजार रुपये ) किंवा 10 एच.पी. पर्यंत किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% यापैकी जे कमी असेल ते |
11 | इनवेल बोअरिंग | 40,000 ( चाळीस हजार रुपये ) |
12 | विज जोडणी | 20,000 ( वीस हजार रुपये ) पर्यंत |
13 | परसबाग | 5,000 ( पाच हजार रुपये ) |
कागदपत्रे :- Birsa Munda & Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Required Documents
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जातीचा दाखला
- 7-12 व 8-अ उतारा
- उत्पन्न प्रमाण पत्र
टीप :- शेतकऱ्याने येथे लक्षात घ्यायचे आहे कि, योजने अंतर्गत निवड झाल्यास वरील सर्व कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाईन अपलोड करावे. तरच या योजनेचा लाभ दिला जाईल.
पात्रता :- Eligibility of Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
👉 लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी असावा.
👉 शेतकऱ्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
👉 लाभार्थी शेतकऱ्याकडे 7-12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.
👉 तसेच लाभार्थ्याकडे आधार संलग्न ( आधार लिंक ) बँक खाते असणे आवश्यक आहे.
👉 लाभार्थी शेतकरी दारिद्र रेषेखालील असेल तर त्यास प्रथम प्रधान्य दिल्या जाईल.
👉 सदर योजने मध्ये दीड लाख वार्षिक उत्पनाची अट रद्द करण्यात आली आहे.
👉 कमीत कमी शेतकऱ्याकडे 0.40 हेक्टर व जास्ती जास्त 6 हेक्टर शेतजमीन असावी.
👉 मात्र दुर्गम भागातील 0.40 पेक्षा कमी शेत जमीन असलेले दोन शेतकरी किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन योजनेचा लाभ घेऊ शकतात.
👉 दारिद्र रेषेखालील असलेल्या शेतकऱ्यांना 6 हेक्टर शेत जमिनीची अट लागू असणार नाही.
👉 एकदा संबधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यानंतर पुढील पाच वर्षे त्या शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana | |
योजनेचे नाव | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना |
सरकार | महाराष्ट्र सरकार |
विभाग | कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग |
योजनेची सुरवात | 5 जानेवारी 2017 |
लाभार्थी | राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी |
योजनेचा लाभ | शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, विज जोडणी आकार, पंप संच, शेततळे आस्तिकरण, सूक्ष्म सिंचन संच ई बाबी साठी अनुदान |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
श्रेणी | राज्य सरकार योजना |
योजनेचा अर्ज कुठे करावा ? How to Apply Birsa Munda & Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करता येतो किंवा तुम्ही हा अर्ज तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्र / सेतू सुविधा केंद्र किंवा CSC सेंटर वर जाऊन भरू शकतात.
तसेच शेतकरी स्वत: महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. अर्ज करण्यासाठी लिंक 👉 येथे क्लिक करा.
महा डीबीटी पोर्टवर शेतकऱ्याची नोंदणी नसेल तर त्याने आधी, नवीन नोंदणी करून, प्रोफाईल पूर्ण करावी, त्यानंतर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, समोर बाबी निवडा वर क्लिक करून योजनेसाठी अर्ज सादर करावा.
ज्या शेतकऱ्यांची महाडीबीटी शेतकरी पोर्टल आधीपासून नोंदणी असेल अश्या शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या लिंक वर जाऊन लॉगीन करावे व योजनेसाठी अर्ज करावा.