Favarni Pump Yojana Lottery List – 2024 | फवारणी पंप लॉटरी यादी

नमस्कार शेतकरी मित्रांणो , तुम्हाला बॅटरीवर चालणारा औषधी फवारणी पंप हवा आहे ? परंतु फवारणी पंप घ्यायला पैसे नाही ? तर चिंता करू नका, कृषी विभागामार्फत 100% अनुदानावर शेतकऱ्यांना बॅटरी चलीत फवारणी पंप देण्यात येत आहे. या करीत महा-डीबीटी शेतकरी ( Maha DBT Farmer ) पोर्टल वर Favarni Pump Yojana साठी अर्ज करण्यासाठी कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा या बद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.


फवारणी पंप लॉटरी यादी :- (Favarni Pump lottery List)

सन 2024-25 करीता कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना “ बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी ” दिनांक 31 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. फवारणी पंप योजनेसाठी अधिक शेतकऱ्यांची नोंदणी केली, परंतु फवारणी पंप सेट मर्यादित असल्यामुळे आखेर फवारणी पंपासाठी शेतकऱ्याची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली.

बॅटरी चलीत फवारणी पंप योजनेमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी बघा 👇

Favarni Pump lottery List Download

कापूस, सोयबीन व इतर तेलबिया आधारित पिक पद्धतीस चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पनात वाढ करण्यासाठी; कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांसाठी चालना देण्याच्या उद्देशाने, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना अंतर्गत “ बॅटरी चलीत फवारणी पंप योजना ” महा-डीबीटी पोर्टलवर सन 2024-25 करीता शासना मार्फत राबविण्यात येत आहे.

शेतकरी अपघात विमा योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना

Favarni Pump Yojana पात्रता :- Farmer Schemes

✅ लाभार्थी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे.

✅ लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे गरजेचे.

✅ या पूर्वी शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेतला नसावा.

✅ शेतकऱ्याने या पूर्वी कोणत्याही योजनेतून फवारणी पंपासाठी अनुदान घेतले नसावे.


फवारणी पंप योजना कागदपत्रे :- शेतकरी योजना

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ उतारा
  • बँक पासबुक
  • जातीचा दाखला ( लागू असल्यास )
  • मोबाईल नंबर
  • Pan कार्ड ( असेल तर )

महा-डीबीटी पोर्टल वर शेतकरी नोंदणी :-

👉 Favarni Pump Yojana साठी शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकतो. तसेच शेतकरी मोबाईल किंवा लॅपटॉप वरून सुध्दा अर्ज करू शकतो.

👉 अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्याला महा डीबीटी पोर्टल वर नोंदणी करावी लागेल.

👉 mahadbt.maharashtra.gov.in/Farmer 👈 या बेवसाईट शेतकऱ्याने नोंदणी करावी.

👉 Maha DBT Farmer पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे गरजेचे. अन्यथा शेतकऱ्याने CSC सेंटर किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करून घ्यावी.

👉 ज्या शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर अगोदर नोंदणी असेल त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचा युजर आयडी किंवा आधार क्रमांक टाकून लॉगीन करावे.

👉 लॉगीन केल्यानंतर, शेतकऱ्याने वैयक्तिक माहिती, पत्ता व शेतजमिनीचा तपशील भरून प्रोफाईल पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांची प्रोफाईल पूर्ण असेल त्यांना करायची गरज नाही.


असा करा अर्ज, Favarni Pamp Yojana Online :-

स्टेप 1 :- सर्वप्रथम शेतकऱ्याने mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या बेबसाईटवर जाऊन लॉगीन करून 👉 अर्ज करा या बटनावर क्लिक करावे.

स्टेप 2 :- त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावरील 👉 बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.

स्टेप 3 :- त्यानंतर, पुढील बाबी निवडा,

1मुख्यघटककृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य
2तपशीलमनुष्यचलित औजारे
3यंत्र सामग्री, अवजारे / उपकरणेपिक संरक्षण औजारे
4मशीनचा प्रकारबॅटरी संचलित फवारणी पंप
Maha DBT Framer Scheme

सर्व बाबी निवडल्या नंतर खाली दिलेला चेक्स बॉक्स वर मार्क करून 👉 जतन करा यावर बटनावर क्लिक करा. त्या नंतर मेन्यू व जा या बटनावर क्लिक करा.

स्टेप 4 :- त्या नंतर, 👉 अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून फवारणी पंपासाठी प्राधान्य क्रम द्या.

स्टेप 5 :- त्यानंतर अर्ज फी म्हणून 23 रुपये 60 पैसे एवढे शुल्क भरावे लागेल.

स्टेप 6 :- शुल्क भरल्यानंतर अर्जाची कॉपी आपणास प्राप्त होईल. अश्या प्रकारे तुम्ही फवारणी पंपासाठी अर्ज करू शकतात.

Favarni Pump Yojana
योजनेचे नावबॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप ( कापूस व सोयाबीन पिकासाठी )
सरकारमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
लाभबॅटरी चलित फवारणी पंप ( 100% अनुदान )
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
वेबसाईटhttps://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/
श्रेणीराज्य सरकार योजना
विभागकृषी विभाग
हेल्पलाईन नंबर022 61316429
शेतकरी योजना

Favarni Pump Yojana बद्दल माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल, हि माहिती जास्तीत जास्त शेअर करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा जेणेकरून या योजनेचा लाभ घेता येईल.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

1. फवारणी पंपासाठी किती अनुदान मिळणार आहे ?

👉 100% अनुदानावर शेतकऱ्याला फवारणी पंप मिळणार आहे.

2. फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

👉 14 ऑगस्ट 2024

3. फवारणी पंपासाठी अर्ज कुठे करावा ?

👉https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या वेबसाईट वरून शेतकऱ्यालाफवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

Leave a Comment