Farmer id card Maharashtra : भारत हा देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, भारत देशामध्ये शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. परुंत योजना राबवण्यासाठी सरकारकडे शेती विषयी किंवा शेतकऱ्यांविषयी अचूक माहिती उपलब्ध होत नसे. त्यामुळे भारत सरकारने शेतकऱ्यांची अचूक माहिती मिळावी म्हणून “अॅग्रीस्टॅक” योजना सुरु केली.
१४ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्र राज्यासह देशातील इतर २४ राज्यांमध्ये फार्मर आयडी म्हणजेच अॅग्रीस्टॅक योजना योजना लागू करण्यात आली. परंतु अॅग्रीस्टॅक हि योजना काय आहे ? योजनेचे फायदे काय ? नोंदणी कुठे करायची ? कागदपत्रे कोणती लागतात ? याची संपूर्ण माहिती बघू या लेखाच्या माध्यमातून.
अॅग्रीस्टॅक योजना काय आहे ? Agristack Maharashtra
अॅग्रीस्टॅक हे एक भारत सरकाच्या कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले डिजिटल प्लॅटफॉर्म होय. याचा उद्देश शेतकरी, ग्राहक, विक्रेती आणि सरकार यांना एकत्र आणणे आहे. Farmer id card Maharashtra यामध्ये सर्व शेतकरी बांधवाना आधार सारखा एक युनिक विशिष्ठ क्रमांक देण्यात येणार आहे, त्या क्रमांस फार्मर आयडी असे म्हणतात. Agristack या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे सातबारे आधार कार्ड सोबत लिंक करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम स्वीकारला असून, या उपक्रमाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक उत्पादन कसे काढता येईल व फायदेशीर शेती कशी केली जाईल यासाठी मदत केली जाणार आहे.

केंद्र व राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शेती विषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने लाभ पोहचवने हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, थेट लाभ हस्तांतरण योजना, कृषी विभागाच्या इतर योजनासाठी तसेच जमीनविषयक माहितीसाठी हि योजना फायद्याची ठरणार आहे.
शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक :- Farmer id Registration Maharashtra
ज्याच्या नावाने शेती आहे अश्या प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यामध्ये शेतीची कामे करण्यासाठी अडचण येणार नाही. फार्मर आयडी नसेल तर पिक विमा, पीएम किसान या सारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही असे शासनाने जाहीर केले आहे.
विहीर योजना शेतकरी अपघात विमा योजनाFarmer id card Maharashtra काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- ई केवासीसाठी आधार लिंक मोबाईल नंबर
- ७-१२ उतारा
- कास्ट सर्टिफिकेट ( लागू असल्यास )
Farmer id card Maharashtra | |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी | CSC सेंटर/ तालुका कृषी कार्यालय/ तलाठी कार्यालय |
पात्रता | महाराष्ट्रातील शेतकरी |
अर्जाची स्थिती बघण्यासाठी | येथे क्लिक करा |
फार्मर आयडीसाठी कुठे नोंदणी करावी ? Agristack Registration ( शेतकरी ओळखपत्र )
फार्मर आयडीसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटर, आपले सेवा केंद्र, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल. नोंदणी करत्यावेळी तुम्हाला ७-१२ उतारा, आधार कार्ड व आधारला लिंक मोबाईल नंबर सोबत घेऊन जावा लागेल.
अशी बघा तुमच्या अर्जाची स्थिती :- Agristack Maharashtra Portal Check Status
Farmer id card Maharashtra साठी तुम्ही अर्ज केला आहे परंतु तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही ते बघायचे असेल, तर खालील सोपी पद्धत वापरा. 👇👇
1️⃣ https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/checkEnrolmentStatus या संकेतस्थळावर क्लिक करा.
2️⃣ आता तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाका
3️⃣ तुमच्या रजिस्टर नंबरवर आलेला ओटिपि (OTP) टाकून तुमचे खाते व्हेरीफाय करा.
4️⃣ त्यांतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकतात.
✅ तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर, Approved अस दाखवेल.
✅ तुमचा अर्ज प्रक्रियेत असेल तर, Under Process अस दाखवेल.
✅ तुमचा अर्ज चुकला असेल तर, Correction Required अस दाखवेल.
Agristack Maharashtra Check Status
अॅग्रीस्टॅक या उपक्रमाचे फायदे व वैशिष्टे :- Benefits of Farmer Id
👉 डिजिटल शेतकरी डेटाबेस :-
- प्रत्येक शेतकऱ्याची माहिती डिजिटल पद्धतीने संग्रहित केली जाणार.
- शेत जमिनीची माहिती, पिक तसेच हवामान अंदाज याचा डेटाबेस एकाच ठिकाणी राहणार.
👉 सरकारी योजनेचा लाभ :-
- पीएम किसान योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना तसेच कृषी विषयक इतर योजनेची थेट माहिती भेटेल.
- योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत सोपी होईल, तसेच शासनाला जलद गतीने शेतकऱ्याला अनुदान वाटप करता येईल.

👉 हवामानाची माहिती व पिक व्यवस्थापन :-
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बद्दलची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यत पोहचवली जाईल.
- तसेच कोणत्या जमिनीसाठी कोणते पिक योग्य राहील याची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहचवली जाईल.
👉 विक्रीसाठी बाजारपेठ व व्यवस्थापण :-
- शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- थेट ग्राहकांशी संपर्क करता येणार, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात माल विक्री करता येईल.
👉 स्मार्ट कृषी उपाय AI चा वापर :-
- ड्रोन तंत्रज्ञान द्वारे फवारणी, सेन्सर द्वारे सिंचन आणि कृत्रिम बुद्धीचा (AI) वापर करून शेती अधिक सोपी व फायदेशीर केली जाणार.
👉 सरकारी कर्यालयांना वारंवार भेटी न देता डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल.
👉 शेतकऱ्यांना नव्या योजनांची माहिती तात्काळ मिळणार.
महाराष्ट्रातील अॅग्रीस्टॅक उपक्रमामुळे शेतकऱ्यांना डिजिटल सेवा :- AgriStack Maharashtra
महाराष्ट्र सरकारने अॅग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून राज्यामधील शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला. विशेषता हा उपक्रम मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनसाठी उपयुक्त ठरणार आहे.
✅ पिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
✅ सरकारी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
✅ शेत कर्ज आणि विमा योजनेबाबत पारदर्शकता वाढेल.
✅ शेती विषयक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
अॅग्रीस्टॅक या उपक्रमामध्ये भविष्यामध्ये जोडल्या जाणाऱ्या योजना :-
- शेतकरी आणि शेतजमीन प्लॉट रजिस्ट्रीज
- युनिफाइड फार्मर सर्व्हिस इंटरफेस ( UFSI )
- पिक पेरणी नोंदणी
निष्कर्ष :-
Farmer id card Maharashtra: अॅग्रीस्टॅक हा उपक्रम महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल क्रांती उपक्रम ठरणार आहे. यामुळे शेती अधिक स्मार्ट, उत्पादक आणि फायदेशीर होणार. शेतीविषयक कोणतीही शासकीय अनुदान घ्याचे असतील तर फार्मर आयडी आवश्यक असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्म आयडी ( AgriStack ) साठी नोंदणी करावी.
Very Nice Information For Farmer’s